लोकमत न्यूज नेटवर्कमूल : गावातील जनतेचे आरोग्य चांगले राहावे यासाठी ग्रामस्वच्छता अभियान राबविण्यात येते. ग्रामस्वच्छता अभियानापासून जनतेला स्वच्छतेचे महत्त्व पटवून देण्याचा प्रयत्न शासनस्तरावर केले जात असताना देखील मूल तालुक्यातील कोसंबी गावात अस्वच्छतेने कळस गाठल्याचे दिसून येते. याकडे ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष होत असल्याने गावात आरोग्याचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता बळावली आहे.दिल्लीपासून तर गल्लीपर्यंत केंद्रशासन स्वच्छतेवर भर देवून जनतेचे आरोग्य सुधारण्याचा प्रयत्न करीत आहे. उघड्यावर शौचास बसणाºयांवर दंड आकारण्याचा फतवा देखील काढण्यात आला असून शौचालय बांधण्यावर भर दिला जात आहे. गावातील रस्त्याच्या कडेला अस्वच्छता दिसायला नको यासाठी शासनस्तरावर मार्गदर्शन केले जात आहे. मात्र मूल तालुक्यातील कोसंबी गाव अपवाद आहे. गावात अस्वच्छता असून जागोजागी शेणाचे ढिग दिसत आहेत. घराजवळच शेणाचे ढिग असल्याने आरोग्याचा प्रश्न निर्माण होणे स्वाभाविकच आहे.दरवर्षी २ आॅक्टोबर रोजी महात्मा गांधी यांच्या जयंतीपासून ग्रामस्वच्छता अभियान राबविण्यात येते. स्वच्छतेचा मूलमंत्र देण्याचा प्रयत्न शासन स्तरावरुन केला जात असतो. मात्र याकडे दुर्लक्ष केल्या जात असल्याने जनतेच्या आरोग्याशी खेळण्याचा प्रकार यानिमित्ताने दिसून येत आहे. गावात स्वच्छता राहावी यासाठी कोसंबी गावात ग्रामपंचायतीने पुढाकार घेवून स्वच्छता अभियान राबवावा, जेणेकरून भविष्यातील लहान मुलांवर स्वच्छतेचे महत्त्व तसेच चांगले आरोग्य राखण्यासाठी स्वच्छता मदत होईल. त्यामुळे येथे स्वच्छता अभियान काळाची गरज असल्याचे या निमित्ताने नागरिकांना कळायला लागले आहे.
कोसंबी गावात अस्वच्छतेचा कळस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 03, 2017 9:51 PM
गावातील जनतेचे आरोग्य चांगले राहावे यासाठी ग्रामस्वच्छता अभियान राबविण्यात येते. ग्रामस्वच्छता अभियानापासून जनतेला स्वच्छतेचे महत्त्व पटवून देण्याचा प्रयत्न शासनस्तरावर केले जात असताना देखील .....
ठळक मुद्देग्रामपंचायतचे दुर्लक्ष : नागरिकांचे आरोग्य धोक्यात