शहरं
Join us  
Trending Stories
1
नालासोपाऱ्यात कॅश ड्रामा! पैसे वाटपाच्या आरोपांवरून विनोद तावडेंना घेरले; तीन गुन्हे दाखल
2
Maharashtra Assembly elections 2024: कोणत्या मुद्द्यांभोवती फिरली प्रचारचक्रे ? 
3
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतदान; काँग्रेस-भाजपमध्ये लढत 
4
झारखंड : दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला; अंतिम टप्प्याचे आज ३८ जागांवर मतदान
5
ज्यांच्या बळावर मतदान, त्यांचाच हिरावला अधिकार; दोन हजार पोलिसांचे बॅलेटच आले नाहीत
6
विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज; किती वाजता सुरू होणार मतदान? ‘या’ गोष्टी लक्षात ठेवाच
7
हल्ले, मारहाणीच्या घटनांनी राजकीय वातावरण तापले; प्रचारादरम्यान काय-काय घडलं?
8
३५ हजार पोलिसांचा फौजफाटा मुंबईत सज्ज; चार हजार जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई
9
मुंबईकरांना पहाटेच भाजीपाला पोहोचणार; धान्य, मसाला, फळ मार्केट राहणार बंद
10
वरळीतील १,३३९ मतदारांच्या सोयीसाठी; चक्क उड्डाणपुलाखाली दोन मतदान केंद्रे
11
मतदान शांततेत पार पाडा, जबाबदारी निभावा; पोलिस महासंचालक संजय वर्मा यांचे आवाहन
12
सुप्रिया सुळे, नाना पटोलेंनी बिटकॉइन स्कॅम केला, निवडणुकीत परदेशी चलनाचा वापर; भाजपाचा आरोप
13
डहाणूचा बविआ उमेदवार भाजपात आला, त्याचाच राग ठाकूर पिता-पुत्रांनी काढला? चर्चांना उधाण
14
रोहित पवारांच्या कारखान्यातील अधिकाऱ्याला पैसे वाटताना पकडले; पोलिसात गुन्हा दाखल
15
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
16
भाई ठाकूर यांचे भाऊ ते बविआ प्रमुख; विरारमधील 'राडा' प्रकरणाने चर्चेत आलेले हितेंद्र ठाकूर कोण?
17
“निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यास त्याचे खापर विनोद तावडेंवर फोडले जाईल”: पृथ्वीराज चव्हाण
18
मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याने कारस्थान रचलं? विनोद तावडे म्हणाले, "मी तिकडे जाणार हे..."
19
Vinod Tawde: त्या हॉटेलात महिला, कोपऱ्या कोपऱ्यात लपलेल्या; क्षितीज ठाकुरांचे खळबळजनक आरोप
20
Maharashtra Assembly Election 2024 : लोकसभेवेळी धक्का देणारा मराठवाडा भाजपाला देणार साथ? हे मुद्दे ठरू शकतात 'मास्टर स्ट्रोक'

रविवारपासून सर्व व्यापारी प्रतिष्ठाने बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2020 6:00 AM

जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निवृत्ती राठोड यांनी दिलेल्या माहितीनुसार जिल्ह्यात शुक्रवारी कोणत्याही रुग्णांची नोंद झाली नाही. जिल्ह्यात आजच्या स्थितीत एकही कोरोना पॉझिटीव्ह रूग्ण नसून गुरुवारपर्यंत असणाº्या ४५ विदेशातून आलेल्या नागरिकांपैकी १४ दिवस निरीक्षण कालावधी पूर्ण केलेल्या आठ नागरिकांचे होमकॉरेन्टाईन संपुष्टात आले.

ठळक मुद्दे‘गो कोरोना’साठी प्रशासन गंभीर : आदेशाची काटेकोर अंमलबजावणी करा

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : कोरोना विषाणू संसर्गावर प्रतिबंध करण्यासाठी जिल्ह्यामध्ये पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्या मार्गदर्शनात जिल्हा प्रशासन आता सक्तीने अनेक क्षेत्रात कार्यवाही करीत आहे. शुक्रवारपासून १४४ कलम जिल्ह्यात लागली असून शनिवारी रात्रीपासून पुढील आदेश येईपर्यंत चंद्रपूर शहर व जिल्ह्यातील सर्व व्यापारी प्रतिष्ठाने बंद ठेवण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी दिले आहेत.रविवारी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी नागरिकांचा कर्फ्यू पाळण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे रविवारी सर्वांनी घराबाहेर पडूच नये, असे स्पष्ट निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहे.जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निवृत्ती राठोड यांनी दिलेल्या माहितीनुसार जिल्ह्यात शुक्रवारी कोणत्याही रुग्णांची नोंद झाली नाही. जिल्ह्यात आजच्या स्थितीत एकही कोरोना पॉझिटीव्ह रूग्ण नसून गुरुवारपर्यंत असणाº्या ४५ विदेशातून आलेल्या नागरिकांपैकी १४ दिवस निरीक्षण कालावधी पूर्ण केलेल्या आठ नागरिकांचे होमकॉरेन्टाईन संपुष्टात आले.जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी आज स्वत: रेल्वे स्थानकाची पाहणी केली. या ठिकाणी त्यांनी ऑटो चालकांची संवाद साधला. त्यांना मास्क वाटप केले. या कठीण परिस्थितीत ग्राहकांची सेवा करीत असल्याबद्दल त्यांचे आभार मानून त्यांना स्वच्छता राखून प्रशासनाला माहिती पुरविण्याचेही त्यांनी ऑटो चालकांना सांगितले.दरम्यान, गेल्या काही दिवसात ११ ते ६ पर्यंत व्यापारी प्रतिष्ठाने सुरू होती. उद्या शनिवारपर्यंत व्यापारी प्रतिष्ठाने सुरू राहतील. मात्र रविवार सकाळपासून पुढील आदेश येईपर्यंत व्यापारी प्रतिष्ठाने उघडण्यात येऊ नये, असे सक्त निर्देश जिल्हा प्रशासनाने आज दिले आहेत.पुणे, मुंबई व अन्य भागातून येणाऱ्या विद्यार्थी व नागरिकांनी घाबरून न जाता या काळामध्ये घरीच अलिप्त राहणे योग्य ठरेल. सामान्य नागरिकांना आपल्या आरोग्य संदर्भात कोणतीही भीती वाटल्यास जिल्हा सामान्य रुग्णालयातील ०७१७२-२७०६६९, जिल्हा परिषद आरोग्य विभागामध्ये ०७१७२-२६१२२६ व चंद्रपूर महानगरातील नागरिकांनी चंद्रपूर महानगरपालिका क्षेत्रातील ०७१७२-२५४६१४ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.जीवनावश्यक वस्तू सर्वांना मिळणारयाकाळात जीवनावश्यक वस्तू विक्री करणाºया दुकानांना मात्र नियमितपणे सुरू ठेवण्यात येणार आहे. नागरिकांनी अधिकचा साठा करण्याची घाई करू नये. सर्वांना जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा होईल, अशा पद्धतीने सर्व किराणा दुकान, दूध केंद्र, पेट्रोल पंप व अन्य जीवनावश्यक वस्तू पुरवठा करणारे केंद्र सुरू राहील, असेही जिल्हाधिकाऱ्यांनीस्पष्ट केले आहे.हॉटेल्समधून जेवण मिळणार पार्सलशहरांमध्ये रस्त्याच्या कडेला असणारे व रेस्टॉरंट आणि हॉटेल्समध्ये खाद्य तयार करणाºया संस्था बंदमधून वगळण्यात आल्या आहेत. मात्र या ठिकाणावरून केवळ पार्सल सुविधा किंवा होम डिलेवरी करता येईल. याठिकाणी ग्राहकांना जेवण देता येणार नाही. असे आढळल्यास कार्यवाही करण्यात येईल.पालकमंत्र्यांनी घेतला आढावादरम्यान, राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी शुक्रवारी जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार व अन्य वरिष्ठ अधिकाºयांशी संपर्क साधून जिल्ह्यातील कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांची माहिती जाणून घेतली. जिल्ह्यात जमावबंदी लागू केल्यानंतर सर्व शासकीय कार्यक्रम रद्द करण्यात आले असून जिल्हा प्रशासनाने पुढील काही दिवस अतिशय कठोरपणे ही मोहीम राबवावी, असे आवाहन त्यांनी केले आहे. सोबतच जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा पडू नये, नागरिकांमध्ये भीती निर्माण होऊ नये तथापि, या काळामध्ये नागरिकांनी घरीच राहणे सोयीचे राहील, असेदेखील त्यांनी स्पष्ट केले आहे.पुण्याहून आलेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांनो, घाबरू नका - डॉ. निवृत्ती राठोडचंद्रपूर : पुण्याहून विशेष रेल्वे गाडीने दोन दिवसांपूर्वी सुमारे ८०० विद्यार्थी पुण्यातून चंद्रपूर जिल्ह्यात दाखल झाले. हे सर्व विद्यार्थी आपल्या घरी पोहचले आहे. या विद्यार्थ्यांना घरीच राहण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले होते. मात्र यातील अनेक विद्यार्थी नियंत्रण कक्षाशी संपर्क साधत असल्यामुळे आरोग्य यंत्रणा चिंतेत पाडली आहे. याबाबत जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निवृत्ती राठोड यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी पुण्याहून आलेल्या विद्यार्थ्यांना व त्यांच्या पालकांना घाबरण्याचे काहीएक कारण नसल्याचे म्हटले आहे. या विद्यार्थ्यांना पुढील १४ दिवस घरीच सुरक्षित राहायचे आहे. त्यांनी सोबत आणलेल्या वस्तू देखील वेगळ्या ठेवायच्या आहे. या विद्यार्थ्यांनी बाहेर फिरू नये, कुणाच्याही संपर्कात येऊ नये, असेही यावेळी डॉ. राठोड यांनी स्पष्ट केले.

कोरोना अपडेटरविवारचा जनतेचा कर्फ्यू पाळण्याचे जिल्हा प्रशासनाचे आदेशचंद्रपूर जिल्ह्यात एकही पॉझिटिव्ह रुग्ण नाहीनवीन कोणत्याही रुग्णाची जिल्ह्यामध्ये नोंद नाहीपालकमंत्र्यांनी घेतला जिल्ह्यातील परिस्थितीचा आढावाविदेशातून आलेले ३७ नागरिक अजूनही होम कॉरेनटाइनलग्नसमारंभाच्या आयोजनावर पूर्णपणे बंदीफक्त शनिवारी ११ ते ६ दुकाने उघडी राहतीलरेस्टॉरंट हॉटेल्समधून फक्त पार्सल सुविधा व होम डिलिव्हरीला परवानगीएमआयडीसी व अन्य ठिकाणच्या उद्योगांना बंद ठेवण्याचे आदेशजीवनावश्यक वस्तूंची दुकाने उद्योग सुरू राहतीलनागरिकांना नियमित जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा होईलजीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करणारी दुकाने नियमितपणे उघडे राहतील

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसMarketबाजार