शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकन भारतात पैसा गुंतवतात; मुकेश अंबानींनी अमेरिकेत केलं मोठं डील
2
PM Modi Salary: पंतप्रधान मोदींना दर महिन्याला सत्कार भत्ता म्हणून मिळतात केवळ 3000 रुपये, जाणूनघ्या किती आहे सॅलरी?
3
“आधी CM राज्यात ठरायचा आता दिल्लीत निर्णय होतो, अजितदादांनी वेगळा अनुभव घ्यावा”: काँग्रेस
4
विराट कोहली सोबत World Cup ची ट्रॉफी उंचावणाऱ्या भारतीय खेळाडूचा क्रिकेटला रामराम
5
शाही जामा मशिदीच्या सर्वेक्षणाविरोधात मशीद समितीची सर्वोच्च न्यायालयात धाव; उद्या सुनावणी
6
"घुमटात मंदिराचे अवशेष..., तळघरात आजही गर्भगृह विद्यमान"; अजमेर शरीफ दर्ग्यासंदर्भात हिंदू सेनेनं केले आहेत मोठे दावे
7
कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाईंचा ND स्टुडिओ आता 'गोरेगाव फिल्मसिटी'च्या ताब्यात!
8
“भाजपा नेहमीच नवीन नेतृत्वाचा शोध घेत असते, राजस्थान-मध्य प्रदेशप्रमाणे...”: चंद्रकांत पाटील
9
"शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही", उदय सामंतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण 
10
बाईकची टाकी फुल ठेवा, जास्त मायलेज मिळवा...! खरोखरच असे होते? तुम्हीही १००-२०० चेच भरता का...
11
IND vs PAK: भारताचा १३ वर्षीय वैभव सूर्यवंशी आता पाकिस्तानला चोपणार, सामना कधी?
12
पत्रकारानं थेट प्रश्न विचारला, अजित दादांनी मिश्किल उत्तर दिलं; म्हणाले, "मी काही ज्योतिष नाही..."! नेमकं काय घढलं?
13
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
14
बांगलादेशात 'इस्कॉन'च्या चिन्मय कृष्ण दास यांना अटक, शेख हसिना यूनुस सरकाविरोधात आक्रमक
15
भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...
16
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
17
७.८३ टक्के मतं कशी वाढली? नाना पटोलेंच्या आरोपांवर निवडणूक आयोग म्हणतं, "हे सामान्य आहे कारण..."
18
EVM वर पराभवाचे खापर, धनजंय मुंडेंचे काँग्रेसला खुले आव्हान; म्हणाले, “मान्य करा की...”
19
मृत्यूच्या १५ मिनिटं आधी सृष्टी आई, मावशीशी आनंदाने बोलली अन्...; कुटुंबीयांचा गंभीर आरोप
20
अजित पवारांची राष्ट्रवादी मोठा विस्तार करणार, दिल्लीतही निवडणूक लढणार; प्रफुल्ल पटेलांची मोठी घोषणा

गुंडप्रवृत्तीवर प्रतिबंध घालण्यासाठी कोठारी बंद

By admin | Published: June 14, 2014 11:27 PM

येथील नितीन रमेश खाडीलकर या युवकावर गावातील काही गुंड प्रकृतीच्या तरुणांनी त्याच्याच उपहारगृहात पैसे देण्याचा वाद उपस्थित करुन जबर मारहाण केली. सदर प्रकरणी पोलिसांना तक्रार देण्यात आली.

कोठारी : येथील नितीन रमेश खाडीलकर या युवकावर गावातील काही गुंड प्रकृतीच्या तरुणांनी त्याच्याच उपहारगृहात पैसे देण्याचा वाद उपस्थित करुन जबर मारहाण केली. सदर प्रकरणी पोलिसांना तक्रार देण्यात आली. मात्र यावर योग्य कारवाई करण्यात आली नाही. उलट आरोपींना बचावात्मक कारवाई करण्यात आल्याने गावकऱ्यांत संतापाचे वातावरण निर्माण झाले. या प्रकरणी पोलीस प्रशासनाविरुद्ध व गुंड प्रवृतीच्या टोळक्यांवर कडक कारवाई करावी यासाठी कोठारी बंद ठेवून घटनेचा निषेध करण्यात आला.कोठारी बस स्थानक परिसरात नितीन खाडीलकर यांचे कोल्ड्रीक्स व उपहार गृह आहे. ९ जून च्या रात्री ८ वाजताच्या दरम्यान अक्रम युनूस शेख याने आपल्या सहकार्यासह शितपेय घेतले. त्याची जूनी उधारी थकित होती. त्याची मागणी करताच त्याने नितीन खाडीलकर याला मारहाण केली. थोड्याचवेळात अक्रमचा भाऊ शारीफ व इरफान त्याठिकाणी येवून नितीनचे वडील रमेश व आई सुंदराबाई यांना सामूहिकपणे फायटर हत्याराने मारपिट केली. यात नितीन तसेच त्याच्या आईवडील जखमी झाले. याबाबतची तक्रार कोठारी पोलीस ठाण्यात करण्यात आली. रात्री तीन वाजता आरोपींना जामिनावर सोडण्यात आले. मारपीट करुन गावात दहशत पसरविणे तसेच गावात अवैध व्यवसाय करण्याचा या टोळक्यांचा व्यवसाय आहे. त्याच्या विरोधात बोलणाऱ्यास धमक्या देवून मारहाण करण्यात येते. अशा युवकांवर कडक कारवाई करणे आवश्यक आहे. असे असताना पोलिसांनी त्यांना पाठिशी घालून बचाव केला. सदर प्रकरणाने संतापलेल्या कोठारीकरांनी शनिवारी कोठारीत कडकडीत बंद ठेवून मोर्चाचे आयोजन करण्यात आले. पोलीस प्रशासनाविरुद्ध नारेबाजी करण्यात आली. यात मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले.राजुरा उपविभागीय पोलीस अधिकारी राजरत्न बन्सोड, कोठारीचे ठाणेदार अरुण खुटेमाटे यांना निवेदन देवून प्रतिबंधात्मक कारवाईची मागणी कोठारीचे व्यापारी, समाजसेवी संस्था, पक्षीय पदाधिकाऱ्यांनी केली. यात शिवसेना जिल्हा उपाध्यक्ष राजू दारी, मनसे तालुका प्रमुख विष्णू बुजोणे, शिवसेना तालुका प्रमुख आशिष देवतळे, शहर अध्यक्ष बाबा साहू, संजय खाडीलकर, मोरेश्वर लोहे, सुरेश तपासे किशोर कोटरंगे, सुरेश चहारे, शंकर भरारकर आदींनी निवेदन दिले. तीन दिवसात पोलिसांनी ठोस कारवार्ई करुन आरोपींना जेरबंद न केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा ग्रामस्थांनी यावेळी पोलिसांना दिला आहे. (वार्ताहर)