शहरं
Join us  
Trending Stories
1
तुम्ही कितीही झेंडे दाखविले तरी मविआच येणार निवडून; प्रियांका गांधी यांचे भाजप कार्यकर्त्यांना प्रत्युत्तर
2
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
3
महागाई नियंत्रणात आणू, मुलांना मोफत शिक्षण देऊ; उद्धवसेनेचे पक्षप्रमुख ठाकरे यांचे आश्वासन
4
Maharashtra Vidhan Sabha 2024: ‘टॉप फाइव्ह’मध्ये मुंबई, ठाणे का नाही?
5
"एमएमआरमध्ये आणले सात लाख कोटींचे प्रकल्प"; देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई, कोकणातील प्रचारात फोकस
6
डॉलरची दादागिरी; जगाकडे पर्याय दिसत नाही!
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोकणात आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
8
विशेष लेख : तुमचे मत हेच तुमचे सरकार!
9
१५ टक्के ओलावा असलेल्या सोयाबीनची हमीभावाने खरेदी; केंद्रीय कृषी मंत्रालयाचा आदेश
10
तणाव वाढला! मणिपूरमध्ये ‘एनपीपी’ने काढला सरकारचा पाठिंबा; काँग्रेस आमदारांची राजीनाम्याची तयारी
11
Maharashtra Election 2024: प्रचाराचा संडे का फंडा! शेवटच्या रविवारी उमेदवारांचे ‘लक्षवेधी’ नियोजन
12
सणासुदीत वाहन विक्रीने रचला विक्रम; बाइकची विक्री १३.७९ टक्क्यांनी वाढून ३३.११ लाखांवर
13
प्रवेश परीक्षा नियोजनात विद्यापीठ नापास; पेट, एलएलएम परीक्षेत गोंधळ
14
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
15
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
16
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
17
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
18
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
19
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
20
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात

सर्व नागरिकांना कापडी मास्क अनिवार्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 07, 2020 5:00 AM

चंद्रपूर व जिल्ह्यातील अन्य शहरातील नागरिक तसेच ग्रामीण भागातील सर्व नागरिकांनी १४ एप्रिलपर्यंत आता घराबाहेर निघणे पूर्णत: बंद करावे. नागरिक घराबाहेर पडूच नाही, या पद्धतीच्या सुविधा देण्याचा प्रयत्न शासन करत आहे. कोरोना आजाराचा झपाट्याने राज्यात व जगात प्रसार वाढत आहे. आता या आजाराचा गुणाकार सुरू झाला असून पुढील काही दिवस अतिशय जबाबदारीने वागण्याची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

ठळक मुद्देकुणाल खेमनार : किराणा दुकाने फक्त ३ वाजेपर्यत सुरु राहतील

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यामध्ये एकही कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण नाही. त्यामुळे लगतच्या सर्व जिल्हा सीमा कडेकोट सीलबंद करण्यात येत आहे. १४ एप्रिलपर्यंत आता रस्त्यावरील गर्दी अतिशय कमी झाली पाहिजे. यासाठी जीवनावश्यक वस्तूंची दुकानेदेखील दुपारी फक्त ३ वाजेपर्यंत उघडी ठेवली जातील. रस्त्यावर दिसणाऱ्यांना आता सक्तीने पोलीस ताब्यात घेतील. त्यामुळे पुढील काही दिवस नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी केले आहे.चंद्रपूर व जिल्ह्यातील अन्य शहरातील नागरिक तसेच ग्रामीण भागातील सर्व नागरिकांनी १४ एप्रिलपर्यंत आता घराबाहेर निघणे पूर्णत: बंद करावे.नागरिक घराबाहेर पडूच नाही, या पद्धतीच्या सुविधा देण्याचा प्रयत्न शासन करत आहे. कोरोना आजाराचा झपाट्याने राज्यात व जगात प्रसार वाढत आहे. आता या आजाराचा गुणाकार सुरू झाला असून पुढील काही दिवस अतिशय जबाबदारीने वागण्याची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.रस्त्यावर दुचाकींची संख्या हळूहळू वाढायला लागल्यामुळे मंगळवारपासून जीवनावश्यक वस्तूची दुकाने दुपारी ३ वाजेपर्यंत उघडे ठेवण्याची परवानगी देण्यात येत आहे. अनावश्यकपणे फिरणाºया लोकांवर सक्त कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहे. गेल्या काही दिवसात १८० वाहने जप्त करण्यात आली असून ९१ जणांवर कारवाई करण्यात आली आहे. विनाकारण रस्त्यावर फिरता कामा नये, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.ज्येष्ठ नागरिकांसाठी असणाºया विविध योजनेंतर्गत बँकेमध्ये पैसे जमा करण्यात आले आहे. त्यामुळे गर्दी न करता या सेवेचा लाभ घ्यावा. आवश्यकता नसेल तर बँकेचे व्यवहार पुढील काही दिवस टाळावे, असे आवाहन देखील त्यांनी केले आहे.कोरोना आजाराचा संभाव्य प्रादुर्भाव व त्यासाठीच्या उपाययोजनांसाठी मोठ्या प्रमाणात आर्थिक मदत आवश्यक आहे. मुख्यमंत्री सहायता निधी प्रमाणेच आज जिल्ह्यासाठी सहाय्यता कोष निर्माण करण्यात आला आहे. कलेक्टर चंद्रपूर कोव्हिड-१९ या नावाने जिल्ह्यातील अग्रणी बँक आॅफ इंडियामध्ये खाते उघडण्यात आले आहे. खाते क्रमांक ९६०३१०२१०००००४८ आहे. जिल्ह्यातील नागरिकांनी सढळ हस्ते या बँक खात्यामध्ये कोरोना संदर्भात लढण्यास जिल्हा प्रशासनाला मदत करावी, असे आवाहनही जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.२०२ रुग्णांचे क्वारंटाईन पूर्णआरोग्य विभागाकडून आलेल्या नव्या मार्गदर्शक सूचनेनुसार आता सर्व नागरिकांनी कापडापासून तयार करण्यात आलेले साधे मास्क वापरणे अनिवार्य आहे. मंगळवारपासून याचा वापर करावा. दरम्यान जिल्हयात होम क्वारंटाईन पूर्ण केलेल्या रुग्णांची संख्या २०३ असून केवळ एक रुग्ण १४ दिवसांच्या होम क्वारंटाईनमध्ये आहे. १५ रुग्णांपैकी १३ रुग्णांचे तपासणी अहवाल निगेटिव्ह निघाले आहेत. त्यामुळे चंद्रपूर जिल्हा सध्या कोरोना आजारापासून मुक्त आहे. मात्र यासाठी जिल्ह्यातील सर्व जनतेने सामाजिक दुरीता राखणे गरजेचे आहे.हॉटेल्स रात्री उशिरापर्यंत सुरूज्येष्ठ नागरिकांच्यासाठी त्यांच्या पैशातून घरपोच अन्नधान्य पोहोचवण्याची व्यवस्था महानगरपालिकेने केलेली आहे. त्याचा लाभ घ्यावा व आवश्यक दूरध्वनी करावे. तसेच शहरातील सर्व हॉटेल्स रात्री उशिरापर्यंत सुरू ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे. मात्र या ठिकाणी जेवणावळी चालणार नाहीत. फक्त किचन सुरू असेल. सर्व पार्सल सुविधा उपलब्ध असून नागरिकांनी त्याचा लाभ घ्यावा, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.निवारागृहात पाच हजार नागरिकजिल्ह्यातील निवारा कक्षामध्ये पाच हजाराच्या आसपास नागरिक असून त्यांच्या खान -पानापासून आरोग्यापर्यंत सर्व काळजी घेतली जात आहे. तसेच नागरिकांना अन्नधान्याचे वितरणही सुलभ पद्धतीने जिल्ह्यात सुरू झाले आहे. भाजीपाल्याची आवक मोठया प्रमाणात असून भाजी बाजारांमध्ये कोणत्याही परिस्थितीत सामाजिक दुरीत्व राखून सामान खरेदी करण्यात यावे, असे आवाहन त्यांनी केले आहे. बेघर, निराश्रित नागरिकांना जेवण देण्यासाठी शिवभोजन योजना कार्यान्वित असून महानगरपालिकेमार्फत स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने भोजनदान सुरू असून त्याचा लाभ त्यांच्यासाठी ही योजना आहे, त्यांनी घ्यावा असे आवाहनही करण्यात आले आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या