चंद्रपूर : यंदाच्या पावसाळ्यात जिल्ह्याच्या काही भागात मुसळधार, तर काही ठिकाणी अत्यल्प पावसाने हजेरी लावली होती. यामुळे खरिपाचा हंगाम फारसा चांगला गेला नाही. रब्बीवरच शेतकºयांची भिस्त होती. सुरूवातीला चांगले वातावरण होते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून ढगाळ वातावरण आहे. त्यामुळे भाजीपाल्यासह विविध पिकांवर कीडीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे.
जिल्ह्यात रब्बीचे क्षेत्र ९५ हजार हेक्टर आहे. रब्बी हंगामात प्रामुख्याने ज्वारी, गहू आणि हरभराचे पीक घेतले जाते. रब्बी हंगामाच्या पार्श्वभूमीवर शेतकºयांनी मोठ्या उत्साहाने जय्यत तयारी केली होती. मात्र, गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण जिल्हाभरच ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे. अशा ढगाळ वातावरणामुळे थंडी कमी होऊन रब्बी पिकांवर परिणाम होऊ शकतो. जिल्ह्यात सर्वाधिक क्षेत्रात हरभराचे पीक आहे. ते ३२ हजार ५८३ हेक्टर इतके आहे.
बॉक्स
गव्हाचे क्षेत्र २७ हजार ८२६ हेक्टर
गव्हाचे क्षेत्र २७ हजार ८२६ आहे. ज्वारीचे क्षेत्र सहा हजार ५७३ हेक्टर इतके आहे. नोव्हेंबर महिन्यात पेरणीची टक्केवारी कमी होती. अनेक ठिकाणी धान कापणी सुरु होती. कापसाची वेचणीचाही हंगाम सुरू आहे. रब्बी पिकांच्या पेरणीची कामे मागे पडली होती. मात्र बदललेल्या वातावरणाचा फटका शेतकºयांना बसत आहे.