शहरं
Join us  
Trending Stories
1
सहानुभूतीवर नाही, मविआचं जागावाटप मेरिटवरच होणार; नाना पटोलेंची रोखठोक भूमिका
2
PDP सोबत युती करणार का? निवडणूक निकालापूर्वी फारुक अब्दुल्लांचे सूचक वक्तव्य; म्हणाले...
3
"रामराजेंनी मला फोन केला, उद्या त्यांच्याशी..."; अजित पवारांनी सोडलं मौन
4
अमेरिकेने शेख हसिनांचं सरकार कसं उलथवलं? गोपनीय रिपोर्टमधून धक्कादायक गौप्यस्फोट
5
'डॉली चायवाला' विसरा; आता आली 'मॉडेल चायवाली', सोशल मीडियावर घातलाय धुमाकूळ
6
पाक बॅटरला खुन्नस देणं पडलं महागात; Arundhati Reddy वर झाली 'ही' कारवाई
7
"महाराष्ट्रात 'खोके आणि धोके' सरकार"; प्रियंका गांधींचं टीकास्त्र, व्हिडीओ केला शेअर
8
आमचं ‘जीना यहां, मरना यहां’, पण हर्षवर्धन पाटलांंचं तसं नाही, चंद्रकांत पाटील यांची खोचक टीका
9
PM नरेंद्र मोदींची घटनात्मक पदावर २३ वर्षे पूर्ण, २००१ मध्ये पहिल्यांदा मुख्यमंत्री बनले!
10
अकोल्यात किरकोळ कारणांवरून दोन गटात वाद, हरिहर पेठ येथे दगडफेक, तणावपूर्व परिस्थिती
11
₹15 चा शेअर खरेदी करण्यासाठी गुंतवणूकदारांची झुंबड...! लागलं 20% चं अप्पर सर्किट, जबरदस्त आहे कारण
12
 उद्धव ठाकरेंची कार्यशैली म्हणजे ‘आपला तो बाब्या, दुसऱ्याचं ते कारटं’, श्रीकांत शिंदेंची टीका
13
"महत्वाच्या टप्प्यावर पोहोचले युद्ध!", इकडे झेलेंस्कींनी घोषणा केली; तिकडे युक्रेननं रशियाचा तेल डेपो उडवला!
14
इस्रायलवर दुहेरी वार! हिज्बुल्ला अन् हमासने एकत्रितपणे केला मिसाईल हल्ला; अनेक जण जखमी
15
मुंबई लुटतच नाहीत तर फुकटात द्यायचं काम होतंय; आदित्य ठाकरेंचा CM शिंदेंवर गंभीर आरोप
16
माओवाद्यांची पुरवठा साखळी तोडण्यात महाराष्ट्राला मोठे यश; मुख्यमंत्री शिंदेंचा दावा
17
धक्कादायक! हिमाचल प्रदेशमध्ये चीनने पाठवले ड्रोन, भारताच्या हद्दीत हेरगिरीचा प्रयत्न?    
18
रिओ ऑलिम्पिकचे पदक थोडक्यात हुकलेली जिम्नॅस्ट दीपा कर्माकरची ३१व्या वर्षी निवृत्तीची घोषणा
19
वैद्यकीय क्षेत्रातील 'नोबेल' जाहीर! अमेरिकन शास्त्रज्ञ व्हिक्टर अम्ब्रोस, गॅरी रुवकुन यांची निवड
20
"...म्हणून पांडुरंगाने ते (घड्याळ) काढून घेतलं"; इंदापुरात सुप्रिया सुळेंनी काय सांगितलं?

कोळसा कामगारांना हवा दहावा वेतन आयोग

By admin | Published: September 19, 2016 12:56 AM

कोलकात्ता येथे मुख्यालय असलेल्या कोल इंडिया लिमिटेडअंतर्गत कोळसा कामगारांचा नववा वेतन आयोग संपुष्टात ...

कामगारांची मागणी : ३ लाख ५० हजार कामगारगोडेगाव : कोलकात्ता येथे मुख्यालय असलेल्या कोल इंडिया लिमिटेडअंतर्गत कोळसा कामगारांचा नववा वेतन आयोग संपुष्टात येऊन दोन महिने उलटले आहेत. दहावा वेतन आयोगाची १ जुलै २०१६ रोजीपासून सुरुवात झाली. मात्र अद्यापही या वेतन समझोत्याबाबत कामगारांना माहिती नाही.कोळसा व्यवस्थापन, केंद्रीय कोळसा मंत्रालय व कामगारांच्या ट्रेड युनियनचे प्रतिनिधी यांच्या संयुक्त बैठकीदरम्यान वेतन समझोता मंजूर होतो. मात्र अद्याप तरी एकही बैठक झाली नाही. कोळसा कामगार भूगर्भात हजारो फूट जमिनीखाली जाऊन कोळसा उत्पादन करतात. शूर सैनिकाप्रमाणे जिवाची पर्वा न करता कामगार कर्तव्य बजावतात. मात्र या कामगारांना योग्य न्याय, योग्य वेतनाचा निर्णय वेळेवर होत नाही.केंद्र सरकारच्या कोल इंडिया कंपनीअंतर्गत एकूण नऊ कंपन्या कार्यरत आहेत. राष्ट्रीय पातळीवर हजारो कोळसा खाणी आहेत. खुली कोळसा खाण व जमिनी खालील कोळसा खाणीत एकूण ३ लाख ५० हजार कामगार कार्यरत आहेत. या कोळसा कामगारांच्या नवव्या वेतन कराराची मुदत ३० जून २०१६ रोजी संपली आहे. तर १ जुलै २०१६ पासून दहावा वेतन आयोग लागू व्हायला पाहिजे होता. मात्र या वेतन समझोत्याबाबत बैठक झाली नसल्याने कामगार आश्चर्य व्यक्त करीत आहेत. राष्ट्रीय कोळसा क्षेत्रात कामगारांच्या बीएमएस, इंटक, एचएमएस, आयटक व सीटू या पाच ट्रेड युनियन कार्यरत असून कामगारा संघटना कोल इंडिया व्यवस्थापन व भारत सरकार यांनी नववा वेतन समझोता संपताच संयुक्त बैठका घेतल्या असत्या तर आतापर्यंत निर्णय होऊन कोळसा कामगारांना नवीन वेतनवाढीसह सोयी, सवलती व विविध योजनांचा लाभ घेता आला असता. वेतन समझोत्याच्या पहिल्याच महिन्यात दहावा वेतन आयोग सुरू होणार, अशी अफवा काही नेते मंडळी पसरवित होते. तर कामगार वर्ग करार होतो की, केवळ बैठकीच होत राहणार, अशी चर्चा करीत होते. शेवटी कोळसा कामगारांची शंका खरी ठरली. त्यामुळे कोळसा व्यवस्थापन, केंद्र सरकार व कामगार संघटना यांनी लवकरात लवकर योग्य निर्णय घेऊन दहावा वेतन कराराचा कामगारांना लाभ मिळवून द्यावा, अशी कोळसा कामगारांची मागणी आहे. (वार्ताहर)५० टक्के वाढीची अपेक्षाकोळसा कराराचा योग्य व वेळेवर न्याय मिळेल, अशी कोळसा कामगारांना अपेक्षा होती. कोळसा उत्खननात कामगारांचे परिश्रम आणि दिवसागणिक वाढ होणारी महागाई लक्षात घेता मूळ वेतनात किमान ५० टक्के वाढ मिळावी, अशी अपेक्षा या कामगारांना आहे. याशिवाय महागाई भत्ता, नगर भत्ता, इंधन भत्ता, प्रभार भत्ता, अतिरिक्त वेतन, यातायात उपपूरक, प्रवास भत्ता, पार्क भत्ता, घरभाडे, विशेष भत्ता, रात्र भत्ता, वार्षिक अतिरिक्त वाढीव वेतन, धुलाई भत्ता, प्रदूषण भत्ता या संदर्भात आणि विविध योजना तसेच सोयीसुविधांबाबत येणाऱ्या ट्रेड युनियनने सामंजस्य बाळगून करार करणे गरजेचे आहे.