पती-पत्नी सुदैवाने बचावले : घर पानटपरीचे नुकसानघुग्घुस : पैनगंगा कोळसा खाणीतून कोळसा घेऊन घुग्घुसकडे येत असताना नकोडा गावातील रस्त्यालगत एका पानटपरीचा चुराडा करत १८ चाकी ट्रक घरात घुसला. मात्र आवाजमुळे घरात असलेले पती-पत्नी घराबाहेर पडल्याने ते थोडक्यात बचावले. या अपघातात पानटपरी व घराचे नुकसान झाले. ही घटना बुधवारी रात्री ९ वाजताच्या सुमारास घडली. वेकोलि वणी क्षेत्राच्या मुंगोली कोळसा खाण ते घुग्घुस रेल्वे सायडींगवर रात्रंदिवस रोडशेल च्या ट्रक धावत असतात. या रस्तावर अनेकदा अपघात घडून घरांचे नुकसान झाले. ग्रामपंचायत तथा नकोडावासीयांनी रस्ता रोको आंदोलन करून गावाबाहेरून रस्ता काढण्याची मागणी केली आणि व्यवस्थापनाने मागणी मान्यही केली. मात्र अजूनही रस्त्याचे काम रखडलेले आहे. काही दिवसांपासून पैनगंगा कोळसा खाणीची कोळसा वाहतूक याच मार्गाने केली जात आहे. त्यामुळे प्रदूषण अधिक वाढले आहे. वेकोलिच्या दुर्लक्षतेमुळे सदर प्रकार घडला असून पानटपरी चालक व घर मालकास नुकसान भरपाई देण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. (वार्ताहर)
कोळशाचा १८ चाकी ट्रक घरात शिरला
By admin | Published: March 31, 2017 12:41 AM