लोकमत वृत्ताची दखल : तातडीची बैठक घेऊन आमदारांनी दिल्या सूचनाराजकुमार चुनारकर ल्ल खडसंगीताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या बफर झोनमध्ये वसलेल्या कोलारा गावाला व्याघ्र प्रकल्पामुळे महत्त्व प्राप्त झाले आहे. प्रकल्पास देश- विदेशातील पर्यटक पर्यटनासाठी येत असल्यामुळे कोलारा जगाच्या पटलावर आले आहे. गाव जगाच्या पटलावर असले तरी या गावाचा पाहिजे तसा विकास नाही. हागणदारीयुक्त रस्त्यावरून पर्यटकांना व्याघ्र प्रकल्पात प्रवेश करावा लागतो. याबाबत लोकमतने सतत दोन दिवस वृत्त प्रकाशित केले. याची आमदारांकडून दखल घेण्यात आली असून याबाबत संबंधितांना दिशानिर्देश देण्यात आले आहे.कोलारी गावाला बफर झोनचे क्षेत्र नसल्याने व कोअरझोन लगतच शेतजमिनी असल्यामुळे येथील शेतकऱ्यांना वन्यप्राण्यांच्या दहशतीत शेतीची मशागत व राखण करावी लागते. त्यामुळे या गावातील अनेकांना वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात बळी पडावे लागत आहे. या प्रकारामुळे अजूनही ‘भय इथले संपत नाही असा प्रकार या गावात सुरू आहे.‘विदेशी पर्यटकांना काढावी लागते हागणदारीतून वाट’ या शिर्षकाखाली दैनिक लोकमतने वृत्त प्रकाशित करीत प्रशासनासह जनप्रतिनिधीनीचे लक्ष वेधले. या वृत्ताची दखल चिमूर विधानसभेचे आमदार किर्तीकुमार भांगडिया यांनी घेतली. त्यांनी तातडीने तहसील कार्यालयात याबाबत आढावा बैठक घेतली. कोलारा गावाला हागणदारीमुक्त, स्वच्छ व सुंदर करण्याच्या दृष्टीने रोडच्या लगतचे शेनखताचे खड्डे हटवित रोड चकाचक करण्याच्या सूचना या बैठकीत अधिकाऱ्यांना व गावाच्या सरपंचांना दिल्या. यामुळे कोलारा गावातून व्याघ्र प्रकल्पाकडे जाणारा रस्ता आता चकाचक होणार असून पर्यटकांना घाणीपासून मुक्ती मिळणार आहे.ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाची प्रसिद्धी साता समुद्रापलिकडे पोहचली असली तरी प्रकल्पाला लागून असलेल्या दोन हजार लोकसंख्याच्या गावाला अनेक समस्यांनी वेढले आहे. त्यामध्ये प्रामुख्याने रस्ते, नाल्या, स्वच्छता, लाईटची व्यवस्था या प्राथमिक सुविधेसह रोजगाराचीसुद्धा समस्या मोठ्या प्रमाणात आहे. व्याघ्र प्रकल्पामुळे काही युवकांना जिप्सी व गाईडच्या माध्यमातून रोजगार मिळाला. मात्र गावातील मजुरांना बांबूचा पुरवठा करता येत नसल्याने बांबूवर अवलंबून असलेल्या मजुरांवर बेरोजगार होण्याची वेळ आली आहे. गावाला बफर झोनचे क्षेत्र नसल्यामुळे एखादी दुर्घटना झाल्यास मोबदलासुद्धा मिळत नाही. मात्र गावाकऱ्यांना शेतीसाठी व इतर कामासाठी बफर झोनमध्ये जावेच लागते. यामुळे गावकऱ्यांची इकडे- आड- तिकडे विहीर, अशी अवस्था झाली आहे. यासह नळाच्या पाण्याची समस्यासुद्धा अनेक दिवसांपासून गावात आहे. तसेच आरोग्य उपकेंद्र नावालाच असल्याने आरोग्यासह शिक्षणाचीसुद्धा मोठी समस्या गावकऱ्यांपुढे आहे.जगाच्या पटलावर आलेल्या कोलारी गावाच्या समस्यांबाबत लोकमतने सातत्याने दोन दिवस वृत्त प्रकाशित केले. याची प्रशासनानेही दखल घेत कोलारा गावाच्या प्राथमिक सुविधा सोडविण्यास पुढाकार घतला असून गावाचा मुख्य रस्ता स्वच्छ - सुंदर करण्यासाठी त्यांच्याकडून प्रयत्न केला जाणार आहे. कोलारा गावावरुन देश-विदेशातील पर्यटक ताडोबा व्याघ्र प्रकल्पात येतात. त्यामुळे या गावातील मुख्य रस्त्याच्या लगत असलेले खताचे खड्डे हटवून महसूल विभागाची दुसरी जागा देण्यात येणार आहे. गावापासून गेटपर्यंत दोन्ही बाजूने वृक्ष लावण्यात येणार आहेत. तसेच गावातील पाठी पुरवठा योजनाही कार्यान्वित करण्याच्या सूचना संबंधित विभागाला दिल्या आहेत. या गावाकडे विशेष लक्ष देवून स्वच्छ सुंदर व हागणदारी मुक्त करण्याचा प्रयत्न गावकऱ्यांच्या सहभागातून करणार आहोत.- कीर्तीकुमार भांगडिया, आमदार,चिमूर विधानसभा क्षेत्र
अखेर कोलारी गाव होणार चकाचक !
By admin | Published: December 07, 2015 5:16 AM