सुधीर मुनगंटीवार : भाजपचा वचनपूर्ती मेळावागोंडपिपरी : विकासापासून कोसो दूर असलेल्या चंद्रपूर जिल्ह्याचा सर्वांगीण विकास साधण्याचा हेतु तसेच चंद्रपूर भूमीपुत्र या नात्याने अतिदुर्गम आदिवासी बहुल क्षेत्राला विकास गंगेच्या प्रवाहात आणण्यासाठी आपण सदैव प्रयत्नशील राहील, असे प्रतिपादन राज्याचे अर्थ, नियोजन व वनमंत्री ना. मुनगंटीवार यांनी व्यक्त केले. ते गोंडपिपरी येथे आयोजित वचनपूर्ती सोहळा व कार्यकर्ता मेळाव्याप्रसंगी उद्घाटक म्हणून बोलत होते. कार्यक्रमाचे उद्घाटन ना. मुनगंटीवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी अध्यक्ष म्हणून केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी आ. अॅड. संजय धोटे, बल्लारपूरचे नगराध्यक्ष हरीश शर्मा, माजी जि.प. अध्यक्ष संतोष कुंभरे, तालुकाध्यक्ष बबन निकोडे, भाजपचे जेष्ठ कार्यकर्ते दीपक बोनगीरवार, रवी पावडे, नगरपंचायत उपाध्यक्ष चेतनसिंह गौर, सभापती राकेश मून, प्रवीण नरहरशेट्टीवार, निर्मला खेवले, नगरसेवक अश्वीन कुसनाके, सुरेश चरडे, सपना साखलवार, किरण नगारे, पुणेकर आदी उपस्थित होते.ना. मुनगंटीवार म्हणाले की, राजकारण हे सत्तेपुरते न ठेवता सत्यासाठी करावे. गेली १५ वर्षूे सत्ता उपभोगलेले ज्यावेळी आमच्यावर निष्क्रीयतेचे आरोप करतात, त्यांना आत्मचिंतनाची गरज असल्याचा टोलाही त्यांनी लगावला. बल्लारशा ते गोंडपिपरी चोपदरीकरणासह सिमेंट रस्ता होईल. तसेच मागेल त्याला विहिरी, सिंचनाच्या सुविधा देऊ असेही ते म्हणाले.केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी सांगितले की, तालुक्याच्या सीमावर्ती भागात चवेला धरण निर्मितीमुळे भीतीचे वातावरण पसरले होते. त्यातून सीमावर्ती भागातील नागरिकांची सुटका झाली असून चवेला धरणाची उंची कमी केल्याने कुठलेही गाव बाधीत होणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.आ. अॅड. संजय धोटे यांनी विरोधी पक्ष काँग्रेसच्या माजी आमदारांनी सत्तेच्या केलेला दुरूपयोगाची उदाहरणे देऊन माजी आमदारांच्या स्वस्वार्थीपणाच्या सक्रीयतेवर निशाना साधला. तर भाजप जिल्हाध्यक्ष हरीश शर्मा यांनी आगामी होऊ घातलेल्या जि.प. व प.स. निवडणुकीसाठी तत्पर असल्याचे आवाहन केले.कार्यक्रमाचे संचालन सचिन फुलझेले, प्रास्ताविक नगराध्यक्ष संजय झाडे तर आभार उपाध्यक्ष चेतनसिंह गौर यांनी मानले. (तालुका प्रतिनिधी)
गोंडपिपरीच्या विकासासाठी कटिबद्ध
By admin | Published: January 14, 2017 12:39 AM