शहरं
Join us  
Trending Stories
1
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
2
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
3
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
4
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
5
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
6
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
7
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
8
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
9
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
10
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
11
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
12
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
13
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
14
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
15
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
16
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
17
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
18
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
19
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
20
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला

मानव-वन्यजीव संघर्ष टाळण्यासाठी ग्रामस्थांशी संवाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2018 10:45 PM

मानव-वन्यजीव संघर्ष टाळण्यासाठी हॅबीटॅट सोसायटीने चारगाव परिसरातील शेतकऱ्यांशी संवाद साधला. वन्यप्राण्यांचा संचार वाढल्याने चारगाव येथील शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. परिसरातील शेतकरी शेतीवर निर्भर आहे. पण उभे पीक असल्याने ऐन हंगामाच्या वेळेवर वाया जाते. शेतकरी ताजने यांच्या शेतालगतच्या तळ्यात वाघाने भरदिवसा रानटी डुकराची शिकारी केली.

ठळक मुद्देहॅबीटॅट सोसायटीचा उपक्रम : वन विभागाने पर्यायी उपाययोजना करण्याची गरज

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : मानव-वन्यजीव संघर्ष टाळण्यासाठी हॅबीटॅट सोसायटीने चारगाव परिसरातील शेतकऱ्यांशी संवाद साधला.वन्यप्राण्यांचा संचार वाढल्याने चारगाव येथील शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. परिसरातील शेतकरी शेतीवर निर्भर आहे. पण उभे पीक असल्याने ऐन हंगामाच्या वेळेवर वाया जाते. शेतकरी ताजने यांच्या शेतालगतच्या तळ्यात वाघाने भरदिवसा रानटी डुकराची शिकारी केली. शिवाय काही दिवसांपूर्वी बैलांवर वाघाने हल्ला केला होता. परिणामी, शेतकरी शेतात जायला घाबरत आहेत. शेतीवरील संकट दूर करण्यासाठी प्रभावी उपाययोजना करण्याची गरज आहे, अशी मागणी शेतकºयांनी केली. संस्थेच्या तज्ज्ञांनी सरपंच व गावकºयांसोबत चर्चा केली. वनकर्मचारी गोधने व हॅबिटॅट कॉन्सर्व्हशन सोसायटीच्या सदस्यांनी समस्यावर तोडगा काढण्याचेच आश्वास दिले. महाऔष्णिक केंद्राच्या पाईप लाईन परिसरात काटेरी वनस्पती व झुडूपी जंगलाचे प्रमाण वाढले. शेतीचे नुकसान करत आहेत व वाघसुद्धा शिकारीसाठी रानटी डुक्करांच्या मागे गावाजवळ येत आहे. काही परिसर हा प्लाट करून विक्री झालेला आहे. तेथे कचरा खूप वाढल्याने आम्हाला धोका निर्माण झाला आहे. तरी हा परिसर स्वच्छ केल्यास वन्यप्राणी गावाजवळ येणार नाही, असे ग्रामस्थ म्हणाले.चारगाव परिसर हा पुनर्वसन होऊन तिथेच बाजूला वसलेला आहे. पुनर्वसन झालेल्या परिसरातच काटेरी वनस्पती वाढलेली असल्याने महाऔष्णिक केंद्राने तो परिसर स्वछ करावा अशी मागणी केली. त्यासाठी हॅबिटॅट कॉन्सर्व्हशन सोसायटीच्या वतीने महाऔष्णिक केंद्राचे मुख्यअभियंता जयंत बोबडे यांना निवेदन देण्यात आले. त्यांच्याकडून एकदा परिसर बघून खात्री करून तो परिसर स्वछ केल्या जाईल, असे सांगण्यात आले.चंद्रपूर वनविभाग हा ऊर्जानगर वसाहत, विचोळा, छोटा नागपूर, पाईप लाईन, अवंडा डॅम, तिरवंजा या परिसरात वर्षभरापासून वाघ-बिबट यांच्या हालचालीवर नजर ठेऊन आहे. हॅबिटॅट कॉन्सर्व्हशन सोसायटीचे दिनेश खाटे, रविकिरण गेडाम, प्रणय मगरे, चैतन्य खरतड, केशव कुळमेथे उपस्थित होते.