लोकमत न्यूज नेटवर्कराजुरा : विवाह सोहळे कमी खर्चात व्हावेत, याकरिता सामूहिक विवाहाची पद्धत आता सर्वच समाजात रूढ झाली आहे. या उपक्रमाद्वारे समाज संगठीत होत असून वैचारिक देवाणघेवाण होत आहे. यातून चांगला संदेश जातो. या कार्यासोबतच शैक्षणिक जनजागृती समाज संघटनांनी करावी. शासनाच्या बऱ्याचशा लोकोपयोगी सवलतीच्या विकास योजना जनतेकरिता आहेत. कार्यकर्त्यांनी त्याचा अभ्यास करून आपल्या समाज बांधवांना त्याचा फायदा करून द्यावा. सभा, संमेलने, मेळावे हे त्याचे माध्यम ठरू शकतात, असे प्रतिपादन केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी केले.राजुरा येथील नक्षत्र लॉनच्या प्रांगणात राजुरा तालुका खैरे कुणबी समाज मंडळाच्या वतीने आयोजित सामूहिक विवाह सोहळ्यात ते बोलत होते. मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी माजी आ. सुभाष धोटे होते. स्वागताध्यक्ष म्हणून नगराध्यक्ष अरुण धोटे तर मुख्य अतिथी म्हणून मुनेश्वर आरिकर, माणिकराव रोकडे महाराज, चंद्रपूर मनपाचे उपमहापौर अनिल फुलझेले, खुशाल बोंडे, डॉ. विजय देवतळे, जि. प. सदस्य आसावरी देवतळे, गोंडपिपरी पं.स.चे सभापती दीपक सातपुते, मूलच्या नगराध्यक्ष रत्नमाला भोयर, माजी सभापती सरिता कुडे, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख नितीन पिपरे, महात्मा गांधी महाविद्यालय गडचांदूरचे सचिव प्रा. डॉ. अनिल चिताडे, प्रा. स्मिता चिताडे, जेष्ठ पत्रकार वसंत खेडेकर, सुधीर कोरडे, डी. के. आरीकर, सुधाकर बोरकर, राजेश नागापूरे उपस्थित होते.या विवाह सोहळ्यात पाच जोडप्यांना विवाह बंधनात बांधण्यात आले. विवाह विधी रोकडे महाराज यांनी पार पाडली. यावेळी वर-वधूंच्या मातापित्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच समाजाचे जेष्ठ नागरिक आनंदराव चौधरी, खंडूजी कुडे व विठोबा शेरकी यांचाही सत्कार करण्यात आला.प्रास्ताविक व स्वागतपर भाषण अरुण धोटे यांनी केले. संचालन प्रा. अनिल चौखुंडे व आभार नेमाजी झाडे यांनी मानले. यावेळी सांस्कृतिक कार्यक्रमही घेण्यात आले. यशस्वीतेकरिता नेमाजी झाडे, प्रा. धर्मराज काळे, रूपेश चुधरी, बंडू भोज, विठ्ठल पाल, वासुदेव चापले, राजेश चौधरी, विलास चापले, मारोती रोहणे, मधुकर सत्रे, विजय कुडे, भास्कर चौधरी, रमेश कुडे, कुणाल कुडे, लोभदास ठाकरे, भाऊजी जाबोर, लटारी जवादे, सुनील ठाकरे यांच्यासह खैरे कुणबी समाजबांधवानी सहकार्य केले.
समाजाचे सभा-मेळावे जनजागृतीचे प्रभावी माध्यम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2018 12:53 AM
विवाह सोहळे कमी खर्चात व्हावेत, याकरिता सामूहिक विवाहाची पद्धत आता सर्वच समाजात रूढ झाली आहे. या उपक्रमाद्वारे समाज संगठीत होत असून वैचारिक देवाणघेवाण होत आहे. यातून चांगला संदेश जातो.
ठळक मुद्देहंसराज अहीर : राजुरा येथे खैरे कुणबी समाजाचा सामूहिक विवाह मेळावा