फारुख शेख ।लोकमत न्यूज नेटवर्कपाटण: जिवती तालुक्यातील पाटण ग्रामपंचायत हद्दीत येणारे मौजा पाटागुडा (कुसूंबी) यांनी माणिकगड सिमेंट कंपनीच्या खदानीसाठी गेलेल्या जागेचा मोबदला मिळावा, यासाठी खदानीत झोपड्या थाटून आंदोलन केले. याचाच वचपा म्हणून कंपनी व कंपनीच्या अधिकाऱ्यांनी गेल्या चार महिन्यांपासून पाटागुडा (कुसूंबी) गावाचे पिण्याचे पाणी बंद केले आहे. नाईलाजाने गावकऱ्यांना तीन किमी पायदळ जावून नाल्यातील पाणी प्यावे लागत आहे.नाल्यातील पाणी प्यायल्याने अर्धे गाव आजारी पडले आहे. सन २०१७ साली तत्कालीन जिल्हाधिकारी आशुतोष सलील यांनी सीएसआर अंतर्गत माणिकगड सिमेंट गडचांदूर यांच्या सौजन्याने पाटागुडा येथे पाणी पुरवठा सुरु केला होता. ३५ घरांची वस्ती असलेल्या पाटागुडा (कुसूंबी) गावाची लोकसंख्या ८५ इतकी असून नाल्यातील गढूळ पाणी पिल्याने अर्धे गाव आजारी पडले आहे, अशी प्रतिक्रिया गावपाटील कर्णु सिडाम यांनी लोकमतशी बोलताना दिली.गेल्या चार महिन्यांपासून पाटागुडा (कुसूब) या गावाचा पाणी पुरवठा बंद असून आपण अनेकवेळा तक्रार केली. परंतु पूर आल्याने नाल्यातील पाईप वाहून गेले असे सांगण्यात येत आहे. पाणी पुरवठा तत्काळ सुरू करावा, अशी आमची मागणी आहे.- भीमराव पवार , उपसरपंच, पाटण
कंपनीने केले पाटागुडावासीयांचे पाणी बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 06, 2019 9:25 PM
फारुख शेख । लोकमत न्यूज नेटवर्क पाटण: जिवती तालुक्यातील पाटण ग्रामपंचायत हद्दीत येणारे मौजा पाटागुडा (कुसूंबी) यांनी माणिकगड सिमेंट ...
ठळक मुद्देगावकरी पितात नाल्यातील पाणी