लोकमत न्यूज नेटवर्कवरोरा : शहरापासून पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या महाराष्टÑ राज्य औद्योगिक विकास मंडळ असलेल्या महामंडळ वसाहतीत कोळशापासून वीज निर्मिती करणाºया दोन कंपन्या असून त्यातील वर्धा पॉवर प्लांट या कंपनीतील धूरयंत्रामध्ये बिघाड झाल्याने राखमिश्रीत धूर परिसरात पसरत आहे.दिवसेंदिवस त्याचे प्रमाणही वाढत आहे. आतातर वाहन चालकाच्या डोळ्यातही राख जात आहे. कंपनी व्यवस्थापन पर्यावरण खात्याने दिलेले नियम धाब्यावर बसवून नागरिकांच्या जीवाशी खेळत आहे. त्यामुळे संताप व्यक्त केला जात आहे.जवळपास एक महिन्यापासून साई वर्धा पॉवर प्लांट या कंपनीतील धूर शुद्धीकरण यंत्र खराब झाल्याने व योग्य ते नियम पाळले जात नसल्याने कंपनीतील धूर परिसरातील व शहरातील नागरिकांच्या दारी येत आहे. त्यामुळे नागरिकांना आरोग्याच्या अनेक समस्या भेडसावत आहे. या सर्व समस्या असतानाही स्थानिक लोकप्रतिनिधी, प्रशासन, पर्यावरण विभाग बघ्याची भूमिका बजावत असून कंपनीतील धूर डोळ्यात गेल्यामुळे वाहन चालकाचा एखादा मोठा अपघात झाल्यानंतर प्रशासनाला जाग येईल का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.गेल्या महिन्यात कंपनीतील दीडशे कुशल कामगारांना कुठलीही पूर्वसूचना न देता कामावरुन कमी केले व त्यांच्या जागी अकुशल कामगाराची भरती केल्याने कंपनीतील यंत्राच्या मेंटनन्सची समस्या उद्भवत असल्याचे बोलत जात आहे. याबाबत वर्धा पॉवर प्लांट कंपनीचे व्यवस्थापक रोहित उपाध्यक्ष यांना विचारणा केली असता धूर शुद्धीकरण यंत्र खराब झाले होते व ते नवीन लावून घेतले आहे. काही वेळ धूर बाहेर निघेल. नंतर ते आपोआप बंद होईल, असे सांगितले.
कंपनीची राख नागरिकांच्या डोळ्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2017 10:38 PM
शहरापासून पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या महाराष्टÑ राज्य औद्योगिक विकास मंडळ असलेल्या महामंडळ वसाहतीत कोळशापासून वीज निर्मिती करणाºया .....
ठळक मुद्देप्रशासनाचे दुर्लक्ष : नागरिकांचे आरोग्य धोक्यात