पंचायत समितीचे माजी सभापती तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक संजय मारकवार यांनी सन २०१९ पासून पुढाकार घेऊन संबंधित शेतकऱ्यांना सोबत घेऊन त्यांच्या शिष्टमंडळाच्या वतीने सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता प्रशांत वसुले यांना लेखी निवेदन दिले. शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी केली होती. अनेकदा पाठपुरावाही केला होता. शेतकऱ्यांची समस्या समजून घेऊन उपविभागीय अभियंता प्रशांत वसुले यांनीही बांधकाम विभागाच्या वरिष्ठांकडे सतत तग लावून जिकिरीचे प्रयत्न केले. आणि जिल्हाधिकारी यांच्या मार्फतीने तसा प्रस्ताव शासनाकडे सादर करण्यात आला. काँग्रेसचे नेते तथा विद्यमान सी.डी.सी.सी. बँकेचे अध्यक्ष संतोषसिंह रावत यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आणि कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती घनश्याम येनुरकर, संचालक राकेश रत्नावार, शांताराम कामडे, सरपंच अनिल निकेसर, चांगदेव कावळे, सतत पाठपुरावा केल्यामुळे ९ मार्च २०२१ ला प्रस्तावास मंजुरी देण्यात आली.
रस्त्यासाठी शेती गेलेल्या १६ शेतकऱ्यांना मिळणार मोबदला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 15, 2021 4:28 AM