राजेश मडावी।लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : विद्यार्थ्यांना बदलत्या शैक्षणिक क्षेत्रातील स्पर्धेवर मात करून यशाचे शिखर गाठण्यासाठी प्रयत्नांशिवाय पर्याय नाही. परंतु या प्रयत्नांसाठी अभ्यासासाठी आवश्यक मूलभूत सोईसुविधांची गरज आहे. बेरोजगारीचे ओझे दूर करून स्वत:ला गुणवत्तेच्यादृष्टीने सिद्ध करण्याकरिता पायाभूत सुविधा नसतील तर प्रयत्नाला मर्यादा येतात. निराशा वाट्याला येते. असे कदापि घडू नये. विद्यार्थी स्पर्धा परीक्षेसाठी सक्षम व्हावा आणि प्राविण्य मिळवून उच्च पदावर पोहोचावा या हेतुने पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी जिल्ह्यात अभ्यासिका व ग्रंथालये उभारण्याचा ंसंकल्प जाहीर केला होता. तो संकल्प पूर्णत्वास आला. शेकडो विद्यार्थी आपल्या स्वप्नांना आकार देण्यासाठी समृद्ध गं्रथसंपदेचा लाभ घेत आहेत. या अभ्यासिका तयार झाल्या नसत्या तर महागडी पुस्तके विकत घेणे शक्य झाले नसते, अशी प्रतिक्रिया विद्यार्थ्यांनी ‘लोकमत’ शी बोलताना व्यक्त केली.उद्योग आणि वनसंपदेमुळे जिल्ह्याची महाराष्टÑात ओळख आहे. मागील दोन दशकांमध्ये या जिल्ह्यातील शिक्षण क्षेत्रातही आमुलाग्र बदल झाले. कला, विज्ञान व वाणिज्य शाखेसोबतच व्यावसायिक अभ्यासक्रम शिकविणाऱ्या शिक्षण संस्थांची व्याप्ती वाढली. शिक्षणाच्या खासगीकरणामुळे सामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांना अधिक शुल्क मोजण्याची वेळ आली. शासनाने या धोरणांमध्ये बदल करण्याचे प्रयत्न सुरू ठेवले आहेत. पण खासगीकरण आता थांबणारे नाही, अशीच व्यवस्था बळकट होताना दिसते. त्यामुळे बदलत्या स्पर्धात्मक शैक्षणिक परिस्थितीत शिक्षण घेत असताना स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना उच्चपदावर पाहोचविण्यासाठी समृद्ध ग्रंथालय व अभ्यासिकांची नितांत गरज होती. राज्याचे अर्थ, नियोजन व वने मंत्री तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी विद्यार्थ्यांची हीच अपरिहार्य लक्षात घेऊन स्पर्धा परीक्षांसाठी अभ्यासिका व गं्रथालय उभारण्याचा संकल्प २०१६ मध्ये जाहीर केला होता. दरम्यान २०१७ मध्येच या स्वप्नपूर्ती झाली. त्यामुळे जिल्ह्यातील शेकडो विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची तयारी करण्याची संधी मिळाली आहे. चंद्रपुरात २ कोटी ६५ लाख रूपये खर्च करून कर्मयोगी बाबा आमटे स्मृती अभ्यासिका सुरू करण्यात आली. या अभ्यासिकाच्या तळमजल्यावर ५० संगणक क्षमता असलेली ई- लायब्ररी सुरू आहे. २० हजार पुस्तके असलेल्या बुक रॅक्स विद्यार्थ्यांचे लक्ष वेधून घेतात. अभ्यासिका चालविण्यासाठी भारतीय सद्विचार प्रसारक मंडळाकडे जबाबदारी दिली. नाममात्र शुल्क आकारून स्पर्धा परीक्षेचे ग्रंथ व अभ्यासिका उपलब्ध करून दिली जाते. २४६ विद्यार्थी अभ्यासिकेचा लाभ घेत आहेत. ९ फेब्रुवारी २०१७ ला अभ्यासिकाचे लोकार्पण झाले होते.बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे ग्रंथालयडॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे मानसपूत्र बॅरि. राजभाऊ खोब्रागडे यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ चंद्रपुरातील बाबूपेठ येथे १४ जुलै २०१७ ला देखणे सभागृह आणि समृद्ध ग्रंथालय उभारण्यात आले. उपेक्षित समाज घटकांतील विद्यार्थ्यांसोबतच सर्व समूहातील विद्यार्थी या ग्रंथालयात अभ्यास करून स्पर्धा परीक्षांची तयारी करीत आहेत. स्पर्धा परीक्षा व वैचारिक ग्रंथ संपदा ग्रंथालयात उपलब्ध आहे. विद्यार्थ्यांच्या आयुष्याला आकार देण्यासाठी हे ग्रंथालय उपयुक्त ठरले. महापुरूषांची जीवनचरित्रे, विज्ञान, पर्यावरण, कथा, कविता, कादंबरी तसेच शासकीय व खासगी क्षेत्रातील नोकरीसाठी अत्यावश्यक असलेली पुस्तके ग्रंथालयालया वाचायला मिळतात. हे ग्रंथालय ज्ञानसमृद्धीसाठी पे्ररणादायी आहे, असे मत सिद्धांत देवगडे या विद्यार्थ्याने व्यक्त केले.ग्रामीण भागातील प्रेरणादायी ज्ञानकेंद्रेमूल शहरात डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी वाचनालयाची उभारणी करण्यात आली. ग्रामीण व शहरातील विद्यार्थ्यांना या ग्रंथालयाच्या माध्यमातून पाठ्यपुस्तकांच्या पलिकडे नवनवे ज्ञान प्राप्त करण्याची संधी मिळाली आहे. ४ एप्रिल २०१८ ला मुख्यमंत्री देवेंद्र फ डणवीस यांच्या हस्ते वाचनालयाचे उद्घाटन झाले. ग्रामीण भागातील विद्यार्थी स्पर्धेला सामोरे जावा. यशस्वी व्हावा. यासाठी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी विशेषत्वाने पुढाकार घेतला होता. त्याचेच फ लित म्हणून हे वाचनालय ज्ञानाचे अद्ययावत केंद्र म्हणून महत्त्वाचे कार्य करीत आहे. याशिवाय, चंद्रपुरातील भानापेठ वॉर्डातही ३९. ४५ लाखांची अद्ययावत अभ्यासिका विद्यार्थ्यांसाठी बांधण्यात आली आहे. यातून विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांसाठी उर्जा मिळत आहे.
ग्रंथालयातून घडत आहेत स्पर्धाक्षम विद्यार्थी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2018 10:59 PM
विद्यार्थ्यांना बदलत्या शैक्षणिक क्षेत्रातील स्पर्धेवर मात करून यशाचे शिखर गाठण्यासाठी प्रयत्नांशिवाय पर्याय नाही. परंतु या प्रयत्नांसाठी अभ्यासासाठी आवश्यक मूलभूत सोईसुविधांची गरज आहे.
ठळक मुद्देहजारो ग्रंथांची सुविधासामान्य विद्यार्थ्यांचे स्वप्न पूर्ण होणारसुसज्ज अभ्यासिकांमुळे संपली निराशा