आमदारांचे आश्वासन : परिवहन कर्मचाऱ्यांचा मेळावाचंद्रपूर : राज्य परिवहन (एस.टी) निवृत्त कर्मचारी संघटनेच्या प्रलंबित असलेल्या सर्व मागण्यांची पूर्तता पावसाळी अधिवेशनात पूर्ण करण्याचे आश्वासन आमदार नाना शामकुळे यांनी दिले. राज्य परिवहन (एस.टी) निवृत्त कर्मचारी संघटनेच्या वतीने चंद्रपूर येथे आयोजित प्रादेशिक मेळाव्याच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी मंचावर राज्य कार्यकारिणीचे अध्यक्ष दिनकर भाटे, सरचिटणीस एस. व्ही. विचारे, कोषाध्यक्ष एस. पी. कांदणकर, संंघटनमंत्री श्रीराम गादेवार, दिनकर पिंंपळे, वसंतराव पाटण, के. डी. यादव, हरिश्चंद्र जयपूरकर, कुसूम उदार व पी.व्ही. दुरुगकर यांची उपस्थिती होती.आमदार श्यामकुळे म्हणाले, स्वातंत्र्यानंतर खेडोपाडी चिखलाच्या रस्त्यातून पूर्ण महाराष्ट्रात जर कोणी सर्वात मोठी वाहतुक करीत असेल तर एस.टी. होय. एसटी संघटना सतत कर्मचाऱ्यांच्या प्रश्नाला घेवून शासनाशी लढा देत आहे, त्यांच्या लढ्याला नक्कीच यश येईल, असे त्यांनी सांगितले. याच कार्यक्रमात ७५ वर्षे पूर्ण केलेल्या जवळपास १२ सेवानिवृत्तांचा मान्यवरांच्या हस्ते पुष्पगुच्छ, शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे चंद्रपूर विभागाचे अध्यक्ष हरिश्चंद्र जयपूरकर यांनी प्रास्ताविक तर संचालन पी. व्ही. दुरूगकर यांनी केले. (स्थानिक प्रतिनिधी)
एसटी सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या मागण्या अधिवेशनात पूर्ण करु
By admin | Published: July 18, 2015 12:58 AM