शहरं
Join us  
Trending Stories
1
मी कुठे सांगतो माझा प्रचार करा, विरोध अपेक्षितच; नवाब मलिक भाजप नेत्यांवर कडाडले
2
ऐन दिवाळीत नेते बंडोबांना थंडोबा करण्याच्या मोहिमेवर; महायुती, महाआघाडीसाठी पुढील ४ दिवस वाटाघाटीचे
3
सदा सरवणकरांनी घेतली मुख्यमंत्री शिंदेंची भेट, माहिमच्या जागेवर चर्चा, मोठा निर्णय होणार?
4
आजचे राशीभविष्य : आज अवैध कामांपासून दूर राहावे, क्रोध आणि वाणीवर संयम ठेवावा लागेल
5
दिवाळी झटका! LPG सिलिंडरचा भाव वाढला, पटापट चेक करा दिल्ली ते मुंबईपर्यंतचे नवे दर
6
२४ तासांत १०० विमानांना बॉम्बची धमकी, एअर इंडियाच्या ३६, विस्ताराच्या ३५ फेऱ्यांवर परिणाम  
7
नेपाळी नोटेवरील नकाशात दाखवली तीन भारतीय क्षेत्रे, नोटा छापण्याचे कंत्राट दिले चिनी कंपनीला
8
'बिग बॉस' फेम अभिनेत्रीने गाठला दिवाळीचा मुहुर्त, घरी आणली नवी कोरी मर्सिडीज
9
मनोज जरांगेंचे ‘एमएमडी’ समीकरण; विधानसभा लढवण्याची घोषणा
10
मुंबईकरांना भुरळ लाइटवेट दागिन्यांची! धनत्रयोदशीला बाजारात २५० कोटींची उलाढाल
11
निवडणुकीतील गैरप्रकार थांबवा, अन्यथा कारवाई, मुख्य निवडणूक अधिकारी चोक्कलिंगम यांचा इशारा
12
राज्यातील बेरोजगारीवर न बोलणारे हे कसले सरकार? काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा सवाल
13
पाकिस्तानसह जगभर दिवाळीची धूम, अमेरिकेत शाळांना सुट्टी
14
राज्यात आलेली सर्वाधिक परकीय गुंतवणूक फडणवीसांच्या नावावर
15
आयपीएल रिटेंशन : रोहित शर्मा मुंबईकडेच; माही केवळ ४ कोटींमध्ये खेळणार
16
राहुल गांधींचे महाराष्ट्रातील ‘गॅरंटी कार्ड’ही फ्लॉप होणार : देवेंद्र फडणवीस 
17
समतोल ‘मन’ हेही ‘धन’; आज त्याची पूजा करू या!
18
मध्य रेल्वेने प्रवाशांना धरले वेठीस; ४ दिवस सुटीचे वेळापत्रक लागू
19
19 मिनिटांत 22 किलोमीटरचे अंतर पार अन् मिळाले जीवदान
20
खंडणीसाठी धमकावल्याप्रकरणी छोटा राजन टोळीचे ५ जण अटकेत

रखडलेली पाणी पुरवठा योजना पूर्ण करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 03, 2018 11:01 PM

जिल्ह्यात यावर्षी कमी पाऊस पडल्याने जलसंकटाची शक्यता आहे. त्यामुळे दुर्गम भाग आणि फ्लोराईड प्रदूषित गावांतील रखडलेल्या योजना तातडीने पूर्ण करा, असे निर्देश केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयातील बचत साफल्य सभागृहात शनिवारी आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते

ठळक मुद्देहंसराज अहीर : जिल्हाधिकारी कार्यालयात विकासाचा आढावा

आॅनलाईन लोकमतचंद्रपूर : जिल्ह्यात यावर्षी कमी पाऊस पडल्याने जलसंकटाची शक्यता आहे. त्यामुळे दुर्गम भाग आणि फ्लोराईड प्रदूषित गावांतील रखडलेल्या योजना तातडीने पूर्ण करा, असे निर्देश केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयातील बचत साफल्य सभागृहात शनिवारी आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होतेयावेळी वनविकास महामंडळाचे अध्यक्ष चंदनसिंह चंदेल, आमदार नानाभाऊ शामकुळे, आमदार अ‍ॅड. संजय धोटे, जिल्हा परिषदचे अध्यक्ष देवराव भोंगळे, मूलच्या नगराध्यक्ष रत्नमाला भोयर, वरोºयाचे नगराध्यक्ष अहतेशाम अली, जिल्हाधिकारी आशुतोष सलिल, मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र पापळकर, अप्पर जिल्हाधिकारी सचिन कलंत्रे, अप्पर मुख्य कार्यकारी अधिकारी शिवदास, निवासी उपजिल्हाधिकारी वैभव नावडकर, जिल्हा परिषद सभापती अर्चना जिवतोडे उपस्थित होते. पाणी पुरवठा, राष्ट्रीय ग्रामीण जीवनोन्नती अभियान, मामा तलाव, प्रधानमंत्री खनिज विकास निधी, कृषी, पशुसंर्धन जीवन प्राधिकरण विभाग, ग्रामीण पाणी पुरवठा, मुख्यमंत्री पेयजल योजनांचा आढावा घेण्यात आला. ना. अहीर म्हणाले, जिल्ह्यात ७१ योजना रखडल्या आहेत. यातील काही योजना उन्हाळयात सुरू व्हावे, यासाठी कार्यकारी अभियत्यांनी पुढील १५ दिवसात कार्यवाही करावे.करंजी येथील सरपंच ज्योती जिजकरे यांनी वडकोली, जोगापूर, करंजी आदी गावांतील पाणी टंचाईचे वास्तव मांडले. आमदार अ‍ॅड. संजय धोटे यांनी पाण्याचे नवे स्त्रोत शोधण्यामध्ये दिंगाई होत असल्याचे निर्देशनास आणून दिले. यावेळी सहाय्यक प्रकल्प अधिकाऱ्यांनी सादरीकरण केले. मामा तलावाच्या उपयोगीता आणि पूर्णक्षमतेने सुरु करण्याबाबतच्या शक्यतेवरही यावेळी चर्चा झाली. या संदर्भात सादरीकरण करण्यात आले. जिल्ह्यात ४९३ पैकी ११४ मामा तलाव पूर्ण क्षमतेने सुरु असल्याची माहिती बैठकीत देण्यात आली. यावेळी स्थानिक स्वराज्य संस्थांचे पदाधिकारी, शेतकरी प्रतिनिधी, सरपंच व सभापती वंदना पिंपळशेडे, विद्या कांबळे, रोहनी देवतळे, पुजा डोहणे, छाया शेंडे, दीपक सातपुते, सुनील सुपारे, श्याम रणदिवे, रजनी भडके उपस्थित होते.कृषी विभागाचा निधी खर्च कराकृषी विभागाच्या अखर्चित निधी तातडीने संबंधित योजनांवर खर्च करण्याचे निर्देश केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहिर यांनी दिले. कृषी योजनांची अंमलबजाणी करण्यासाठी कृषी सहाय्यक, कृषिमित्रांनी संयुक्त प्रयत्न करावे. दुभत्या जनावंराची संख्या वाढविण्यास शेतकऱ्यांना प्रोत्साहन द्यावे, अशी सूचनाही बैठकीत केली.