लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : वनविभागाने ५० कोटी वृक्ष लागवडीचा संकल्प केला असून चंद्रपूर जिल्ह्याचे वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातून यावर्षीच्या ३३ कोटी वृक्ष लागवड अभियाना- संदर्भात जिल्ह्याचा विभागनिहाय आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी बैठक पार पडली.महाराष्ट्र वन विभागाने ५० कोटी वृक्ष लागवडीचे लक्ष ठेवलेले होते. यामध्ये वर्ष २०१६मध्ये दोन कोटी वृक्ष लागवड तर २०१७ मध्ये चार कोटी वृक्ष लागवड करण्यात आले. तसेच २०१८ मध्ये १३ कोटी वृक्ष लागवड करण्यात आले. या वर्षीही वृक्षांची लागवड करण्याची मोहीम येत्या १ जुलैपासून सुरू करण्यात येणार आहे. वनविभागाने यावर्षी ३३ कोटी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट जुलै-आॅगस्ट आणि सप्टेंबर या ३ महिन्यांत साध्य करण्यासाठी जिल्हानिहाय उद्दिष्ट ठरवून दिले आहे.चंद्रपूर जिल्ह्यामध्ये एकूण १३ लक्ष ८७ हजार ८०० वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. यामध्ये जिल्हा प्रशासनातील सर्व विभागांना जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष्य वाटून दिलेले असून साध्य व शिल्लक उद्दिष्टांचा आढावा यावेळी जिल्हाधिकारी यांनी घेतला.शिल्लक लक्ष्यांक पूर्ण करून त्याची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयाला २५ एप्रिलपर्यंत सादर करावी, अशा सूचना त्यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना दिल्या. सोबतच या बैठकीत कन्या वन समृद्धी योजनेचा आढावा घेण्यात आला. बैठकीला वनविभाग, महावितरण विभाग, आदिवासी विभाग आणि इतर विभागाचे अधिकाऱ्यांची उपस्थिती होती.संस्थांची घेणार दखलया ३३ कोटी वृक्षलागवड मोहिमेत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शासकीय तथा खाजगी संस्थांची जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत दखल घेतल्या जाणार आहे. विशेष म्हणजे, जास्तीत जास्त संस्था संघटनांनी वृक्ष लागवडीसाठी प्रयत्न करावे, असे आवाहनही जिल्हाधिकाºयांनी बैठकीप्रसंगी केले.
३३ कोटी वृक्ष लागवड कार्यक्रमाचे उद्दिष्ट पूर्ण करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2019 12:18 AM
वनविभागाने ५० कोटी वृक्ष लागवडीचा संकल्प केला असून चंद्रपूर जिल्ह्याचे वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातून यावर्षीच्या ३३ कोटी वृक्ष लागवड अभियाना- संदर्भात जिल्ह्याचा विभागनिहाय आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी बैठक पार पडली.
ठळक मुद्देजिल्हाधिकारी : शिल्लक लक्ष्यांक २५ पर्यंत सादर करण्याचे आदेश