ब्रह्मपुरी : मागील वर्षी आलेल्या पुराने ब्रम्हपुरी - आरमोरी महामार्ग उखडला होता. त्यामुळे एकाच बाजूने रहदारी सुरू आहे. त्यामुळे येथे अनेक अपघाताच्या घटना घडत आहेत. त्यामुळे या महामार्गाची दुरुस्ती शक्य तेवढ्या लवकर करा, अशी सूचना पोलीस निरीक्षक रोशन यादव यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना केली.
ब्रह्मपुरी - आरमोरी महामार्गावरील रणमोचन ते जुगनाळा फाट्याजवळील जवळपास ३०० ते ४०० मीटर एक पदरी रोड मागील वर्षी ऑगस्ट महिन्यात वैनगंगा नदीला आलेल्या महापुरात वाहून गेला. त्यामुळे सदर महामार्गावरून केवळ एकाच बाजूने वाहतूक सुरू असून याठिकाणी बरेचसे अपघात घडले आहेत. यात बऱ्याच लोकांना जीव गमवावा लागला असून ५ ते ६ व्यक्तींना अपंगत्व आलेले आहे. गेल्या दोन दिवसांपूर्वी दोन व्यक्तींना आपला जीव गमवावा लागला असून एकाला अपंगत्व आले आहे.
संभाव्य धोका लक्षात घेता ब्रह्मपुरी आरमोरी महामार्गाची आठ ते दहा दिवसात दुरुस्तीचे काम पूर्ण करावे अशा सूचना पोलीस निरीक्षक रोशन यादव यांनी प्रत्यक्ष घटनास्थळावर पाहणी करुन दिल्या. यावेळी अभियंता गुरुवे, शाखा अभियंता आवळे, मे. अजवानी प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे व्यवस्थापक दिलीपकुमार वाघ, मस्के उपस्थित होते.
कोट
येथील अपघाताचे वाढते प्रमाण लक्षात घेऊन संबंधित कंपनीने तातडीने रोडचे काम पूर्ण करणे गरजेचे आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाची ही नैतिक जबाबदारी आहे.
-रोशन यादव, ठाणेदार,
पोलीस ठाणे, ब्रह्मपुरी.
190821\img-20210819-wa0190.jpg
पाहणी करताना यादव यांच्यासह सा. बा. विभागाचे अधिकारी