लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : कर्जमाफी, स्वामीनाथन आयोगाची अंमलबजावणी व इतर मागण्यांच्या पूर्ततेसाठी राज्यभरात सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनात चंद्रपूर जिल्ह्यातील विविध राजकीय पक्षांनी सहभागी होत जिल्हा बंदचे आवाहन केले होते. याला संमिश्र प्रतिसाद मिळाला असून अनेक तालुक्यातील व्यापारी प्रतिष्ठाने, पेट्रोलपंप बंद होते.आज बुधवारी सकाळी ८ वाजता स्थानिक गांधी चौकात विविध राजकीय व सामाजिक संघटनांचे पदाधिकारी तथा कार्यकर्ते उपस्थित झाले. गांधी चौक ते जटपुरा गेट मार्गे रॅली काढण्यात आली व रॅलीच्या माध्यमातून व्यापारी वर्गाला बंदचे आवाहन करण्यात आले. वेगवेगळ्या पक्षाचे कार्यकर्ते गटागटाने शहरातील विविध भागात फिरत होते व बंद यशस्वी करण्याकरिता प्रयत्नरत होते. यावेळी आमदार बाळु धानोरकर, राहुल पुगलिया, शिवसेना जिल्हा प्रमुख सतिश भिवगडे, किशोर जोरगेवार, चंद्रपूर शहर विकास आघाडीचे गटनेता नगरसेवक पप्पू देशमुख, संदिप गिऱ्हे, रमेशचंद्र दहिवडे, किशोर पोतनवार, सुरेश पचारे, गजानन गावंडे, नंदु नागरकर, वसंत मांढरे, संदिप गड्डमवार, राजेंद्र वैद्य, डॉ. सुरेश महाकुळकर, देवेंद्र बेले, प्रवीण खोब्रागडे, देशक खोब्रागडे, सुनिता लोढीया, भारती दुधानी, बेबी उईके, हिराचंद बोरकुटे, चंद्रकांत पोडे, नामदेव कन्नाके, विशाल निंबाळकर, निलेश मानकर, संगीता भोयर, सायली येरणे, स्नेहल रामटेके, निलेश खोब्रागडे, संजय महाडोळे आदी अनेक राजकीय व सामाजिक संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. रॅलीच्या पूर्वी उपस्थित पदाधिकाऱ्यांनी समुहाला संबोधित केले. शेतकऱ्यांच्या विविध समस्यांवर प्रकाश टाकला. मोदी सरकार व महाराष्ट्र सरकारचा निषेध करण्यात आला.संपूर्ण कर्जमुक्ती झालीच पाहिजे - चटपराज्यात शेतकरी हवालदिल झाले असून त्यांना संपुर्ण कर्जमुक्ती दिलीच पाहिजे, असे मत यावेळी शेतकरी संघटनेचे माजी आमदार अॅड. वामनराव चटप व्यक्त केले. राज्यातील शेतकऱ्यांना संरक्षण मिळणे गरजेचे असून जोपर्यंत शेतकऱ्यांना कर्जमुक्ती देणार नाही, तोपर्यंत काँग्रेसचे आंदोलन सुरूच राहील, असे नगराध्यक्ष अरुण धोटे यांनी सांगितले.
जिल्हा बंदला संमिश्र प्रतिसाद
By admin | Published: June 08, 2017 12:35 AM