शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
4
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
5
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
6
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
7
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

जिल्हा बंदला संमिश्र प्रतिसाद

By admin | Published: May 27, 2015 1:21 AM

केंद्रात मोदी सरकार स्थापनेला २६ मे रोजी वर्षपूर्ती झाली. मात्र मोदी सरकारने दिलेल्या आश्वासनांची पूर्तता न झाल्याने व जनविरोधी धोरणाने ...

चंद्रपूर : केंद्रात मोदी सरकार स्थापनेला २६ मे रोजी वर्षपूर्ती झाली. मात्र मोदी सरकारने दिलेल्या आश्वासनांची पूर्तता न झाल्याने व जनविरोधी धोरणाने त्रस्त जनतेच्या समस्या मांडण्यासाठी मंगळवारी जिल्हा काँग्रेसतर्फे जिल्हा बंदचे आयोजन केले होते. या बंदला जिल्ह्यात समिश्र प्रतिसाद मिळाला. तर काही ठिकाणी धरणे आंदोलन करून भाजप सरकारचा निषेध करण्यात आला. चंद्रपूर येथे नंदू नागरकर यांच्या नेतृत्वातील काँग्रेस गटाने ‘अच्छे दिनची पहिली पुण्यतिथी’ साजरी केली. त्यानंतर निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्याना निवेदन पाठविण्यात आले. यावेळी आमदार विजय वडेट्टीवार, नंदू नागरकर, ग्रामीण जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष प्रकाश देवतळे, विनायक बांगडे, सुभाषसिंह गौर, सुनिता लोढीया, अ‍ॅड. विजय मोगरे, अश्विनी खोब्रागडे, नंदा अल्लूरवार, महेश मेंढे यांच्यासह आदी पदाधिकारी उपस्थित होते.तर नरेश पुगलिया गटाने जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय या चालु सत्रात सुरू करावे या प्रमुख मागणीसह अन्य मागण्यांठी धरणे आंदोलन व जिल्हा बंद आंदोलन केले. आंदोलनात ज्येष्ठ नेते नरेश पुगलिया यांच्यासह चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष गजानन गावंडे, युवक काँग्रेसचे महासचिव राहूल पुगलिया, जिल्हा काँग्रेस कमिटीचे महासचिव अ‍ॅड. अविनाश ठावरी, मजदूर काँग्रेसचे अध्यक्ष चंद्रशेखर पोडे, एनएसयुआय अध्यक्ष स्वप्नील तिवारी, प्रा. प्रमोद राखुंडे, मनपा गटनेते प्रशांत दानव, अ‍ॅड. शिल्पा आंबेकर आदी सहभागी झाले होते. राजुरा : राजुरा शहरात बंद आणि धरणे आंदोलन करण्यात आले. माजी खासदार नरेश पुगलिया यांचे कार्यकर्ते शहरात फिरुन बंद यशस्वी केले तर राजुरा क्लबजवळ माजी आमदार सुभाष धोटे, माजी आमदार प्रभाकरराव मामुलकर, तालुका काँग्रेस कमिट अध्यक्ष दादा पाटील लांडे, न.प. उपाध्यक्ष अरुण धोटे यांच्या उपस्थितीत निषेध सभा झाली. शासन विरोधात घोषणा देऊन राजुऱ्यातील झोपडपट्टीवासीयांना जागा द्यावी अशी मागणी करण्यात आली. याप्रसंगी साईनाथ बुचे, अ‍ॅड. अरुण धोटे, जि.प. सदस्य अविनाश जाधव, राधा आत्राम, कल्पना सातपुते, भूविंदरसिंग घोतरा, सुधाकर लांडे, क्रिष्णा खामनकर, साधु जयस्वाल, कामगार सचिव अजय मानवटकर, संगिता गोगुलवार, उषा सिडाम, सपना खामनकर, फातिमा शेख, अनिता मरस्कोले यांच्यासह शेकडो काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते. ब्रह्मपुरी : जिल्ह्यातील विविध मागण्या संदर्भात स्थानिक शिवाजी चौक येथे धरणे आंदोलन करण्यात आले. मजूर काँग्रेसतर्फे आयोजित आंदोलनात गौरव पेपर मिलचे मजदूर मोठ्या संख्येने उपस्थित होते. धरणे आंदोलनात संजय हटवार, एच.एन. सिंह, श्रीकांत राय, बी.आर.पाटील, सोमेश्वर उपासे, किशोर जवादे, विजय तुमाणे, शालीक सहारे, सुखदेव सेलोटे, दर्शन नाकतोडे, योगीराज पारधी, दिलीप अंबादे, सुधाकर उपरे, उमेश खरकाटे, नानाजी तलमले यांचा समावेश होता. सावली : भाजप सरकारच्या निषेधार्थ सावली येथील काँग्रेस कमिटी सावलीच्या वतीने बंद पाळण्यात आला. तहसील कार्यालयासमोर काँग्रेस कमिटीचे कार्यकर्ता उत्तम गेडाम यांच्या नेतृत्त्वात धरणे आंदोलन करण्यात आला. तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. यावेळी बबन वाढई, मनोहर नन्नेवार, बबन वाढई यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती.भद्रावती : जिल्ह्यातील विविध मागण्यांसाठी भद्रावती काँग्रेस कमिटीने तहसीलदारामार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन दिले. भद्रावतीकरांनी बंदला अल्प प्रतिसाद देत प्रतिष्ठाणे बंद ठेवली होती. गांधी चौक येथील काँग्रेस कार्यालयापासून ते तहसील कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात आला. यावेळी डॉ. विजय देवतळे, धनंजय गुंडावार, प्रकाश दास, संजय दुबे, शामसुंदर पोडे, दिलीप ठेंगे, दिलीप मांढरे, धर्मराज गायकवाड, अजित चौधधरी, शेखर नक्षिणे, सुधाकर आत्राम, प्रेमदास पाटील आस्वले, जितेंद्र माहुरे, भगतसिंग मालुसरे, शंकर बोरघरे, साहेबराव ठाकरे, बंडू डोये, दीपक घोडमारे, पुष्पाताई ताटेवार, निर्मला कापकर, वंदना पेंदाम, अर्चना आरेकर आदी उपस्थित होते.बल्लारपूर : येथे बंद पाळून धरणे आंदोलन करण्यात आले. येथील बंदला व्यापारी वर्गाने उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. यावेळी प्रभारी तहसीलदार विकास अहीर यांना जिल्ह्यासह तालुक्याच्या मागण्यांचे निवेदन देण्यात आले. यावेळी तालुका काँग्रेस अध्यक्ष घनश्याम मुलचंदानी, नगराध्यक्ष छाया मडावी, गटनेता देवंद्र आर्य, वसंत मांढरे, नगरसेवक नासीर खान, जि.प. सदस्य रामभाऊ टोंगे, पं.स. उपसभापती अनकेश्वर मेश्राम, हरिश शेडाम, रजनी मुलचंदानी, डॉ. मधूकर बावणे, छबु मेश्राम, टी. पद्माराव, ईस्माईल ढाकवाला, विनोद आत्राम, नरसिंग रेब्बावार, अनिल खरतड, बंडू गौरकार, जयकरण बजगोती, अशोक खाडीलकर, आर.आर. यादव, भुपाल बोरकर, मल्लेश कोडारी, अ‍ॅड. मेघा भाले, अ‍ॅड. पवनमेश्राम, मयुर परसुटकर, राजू मारमवार, नावेद खान यांचा समावेश होता. (लोकमत चमू)