लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : मागील काही माहिन्यांपासून ग्रामपंचायतीचे आरटीजीएस अडकले आहे. परिणामी आपले सरकार सेवा केंद्रांतर्गत काम करणाऱ्या संगणक परिचालकाचे मानधान अडकले आहे. परिणामी संगणक परिचालकांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे संगणक परिचालकांनी मानधनाच्या मागणीसाठी जिल्हा परिषदेसमोर ठिय्या आंदोलन केले.जिल्ह्यातील ७०० ग्रामपंचायतीत ‘आपले सरकार सेवा केंद्रे’ आहेत. या केंद्रांचा कारभार संगणक परिचालकांच्या माध्यमातून सुरू आहे. संगणक परिचालकाद्वारे दाखले देण्याच्या कामासह अनेक कामे केली जातात. राज्य शासनाने नियुक्तीच्या वेळेस संगणक परिचालकांना सहा हजार रुपये मानधन ठरविले. संगणक परिचालकांचे काम एका खासगी कंपनीच्या देखरेखीखाली चालते, ही कंपनीच संगणक परिचालकांचे मानधन देते. मात्र, त्यासाठी ग्रामपंचायतींना त्यांच्या मानधनाची रक्कम जिल्हा परिषदेकडे आरटीजीएस करावी लागते. जिल्हा परिषद त्या कंपनीकडे ही रक्कम आरटीजीएसच्या माध्यमातून वळती करते. त्यानंतर संगणक परिचालकांच्या खात्यात मानधनाची रक्कम जमा होते. मात्र, मोजक्याच ग्रामपंचायतींनी आरटीजीएसची प्रक्रिया पूर्ण केली.तीनशे ते चारशे ग्रामपंचायतींनी अजूनही आरटीजीएस केले नाही. परिणामी गेल्या जून महिन्यापासून ६०० संगणक परिचालकांना मानधन मिळाले नाही. मानधन देण्याबाबत वारंवार विनंती करण्यात आली. मात्र, त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले.त्यामुळे महाराष्ट्र राज्य संगणक परिचालक संघटनेच्या माध्यमातून जि. प. समोर ठिय्या आंदोलन केले. शिष्टमंडळाने उपमुख्य कार्यपालन अधिकाऱ्यांची भेट घेवून निवेदन दिले.
संगणक चालकांचा जिल्हा परिषदेत ठिय्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2018 10:41 PM
मागील काही माहिन्यांपासून ग्रामपंचायतीचे आरटीजीएस अडकले आहे. परिणामी आपले सरकार सेवा केंद्रांतर्गत काम करणाऱ्या संगणक परिचालकाचे मानधान अडकले आहे. परिणामी संगणक परिचालकांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे संगणक परिचालकांनी मानधनाच्या मागणीसाठी जिल्हा परिषदेसमोर ठिय्या आंदोलन केले.
ठळक मुद्देथकीत मानधन द्या : मुख्य कार्यपालन अधिकाऱ्यांना निवेदन