लोकमत न्यूज नेटवर्कघनश्याम नवघडेचंद्रपूर- गिरगाव परिसरात धुमाकूळ घालणाऱ्या वाघिणीचा बंदोबस्त करण्याची सशर्त परवानगी नागपूरच्या कार्यालयाने प्रदान केली आहे. मंगळवारच्या तारखेत ही परवानगी असली तरी तळोधीच्या वनपरिक्षेत्राधिकाऱ्यांना ही परवानगी बुधवारी दुपारनंतर मिळाली अशी माहिती आहे.गेल्या पंधरा दिवसांपासून गिरगाव परिसरात एका वाघिणीचा तिच्या चार पिल्लांसह धुमाकूळ सुरू आहे .दोन गोºहे ठार करून दोन शेतकऱ्यांवर हल्ल्याचा प्रयत्नही या वाघिणीने केला होता. परिणामी संपूर्ण गिरगाव परिसर दहशतीखाली आला होता. एवढेच नाही तर जंगल परिसरातील शेतकऱ्यांनी शेतावर जाणेही बंद केले होते. दरम्यान गिरगाववासियांनी एकत्र येऊन वाघिणीचा बंदोबस्त करा अशी एकमुखी मागणी करून वनाधिकाऱ्यांना निवेदनही दिले होते. या वाघिणीच्या कारवायांची दखल पालकमंत्री व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनीसुद्धा घेतली. त्यांनीही वाघिणीचा बंदोबस्त करण्याचे निर्देश दिले होते. या घडामोडीनंतर तळोधीच्या वनपरिक्षेत्राधिकारी अभिलाषा सोनटक्के यांनी नागपूरच्या कार्यालयाकडे वाघिणीच्या बंदोबस्ताची परवानगी मागितली होती.व तसा प्रस्तावही सादर केला होता.सोनटक्के यांनी प्रस्ताव सादर केल्यानंतर तीन दिवसातच नागापूरच्या कार्यालयाने बंदोबस्तास परवानगी दिली असली तरी अनेक अटी व शर्ती घालून दिल्या आहेत. एकदमच या वाघिणीला बेशुद्ध करता येणार नाही. अगोदर या वाघिणीला हुसकावण्याचा प्रयत्न वनविभागाला करावा लागणार आहे. यासाठी विविध मार्गाचा अवलंब करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. यात तिचा जंगलाच्या दिशेला हाकारा करणे, फटाके फोडणे, नाली साफ करणे आदी मार्गांचा समावेश आहे. या उपायांना जर ती बधली नाही व पुन्हा त्याच परिसरात तिचा वावर दिसला तरच तिला बेशुद्ध करून पकडता येणार आहे. यातही उल्लेखनीय बाब अशी की ही परवानगी १० एप्रिल २०१८ पर्यंतच आहे.समितीच्या शिफारशीनुसारवाघिणीचा बंदोबस्त करण्यासाठी काय काय उपाययोजना कराव्या लागतील याच्या शिफारशीसाठी एका समितीचे गठण करण्यात आले होते. या समतिीत सरपंच , उपसरपंच , पोलिस पाटील ,डी एफ ओ, आर एफ ओ यांचा समावेश करण्यात आला होता .या समितीने केलेल्या शिफारशीनुसार ही परवानगी देण्यात आली.
चंद्रपूर जिल्ह्यात धुमाकूळ घालणाऱ्या वाघिणीचा बंदोबस्त करण्याची सशर्त परवानगी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2018 3:52 PM
गिरगाव परिसरात धुमाकूळ घालणाऱ्या वाघिणीचा बंदोबस्त करण्याची सशर्त परवानगी नागपूरच्या कार्यालयाने प्रदान केली आहे. मंगळवारच्या तारखेत ही परवानगी असली तरी तळोधीच्या वनपरिक्षेत्राधिकाऱ्यांना ही परवानगी बुधवारी दुपारनंतर मिळाली अशी माहिती आहे.
ठळक मुद्दे पिल्लांजवळच करावे लागणार बेशुद्ध पिल्लांना एका जागेवर ठेवून जर ती भक्षासाठी काही अंतरावर गेली व ती दिसून आली तरी तिला बेशुद्ध करता येणार नाही. बेशुद्ध करतेवेळी तिची पिल्ले तिच्याजवळ असणे गरजेचे आहे.