शहरं
Join us  
Trending Stories
1
"शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही", उदय सामंतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण 
2
बाईकची टाकी फुल ठेवा, जास्त मायलेज मिळवा...! खरोखरच असे होते? तुम्हीही १००-२०० चेच भरता का...
3
“भाजपा नेहमीच नवीन नेतृत्वाचा शोध घेत असते, राजस्थान-मध्य प्रदेशप्रमाणे...”: चंद्रकांत पाटील
4
IND vs PAK: भारताचा १३ वर्षीय वैभव सूर्यवंशी आता पाकिस्तानला चोपणार, सामना कधी?
5
पत्रकारानं थेट प्रश्न विचारला, अजित दादांनी मिश्किल उत्तर दिलं; म्हणाले, "मी काही ज्योतिष नाही..."! नेमकं काय घढलं?
6
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
7
बांगलादेशात 'इस्कॉन'च्या चिन्मय कृष्ण दास यांना अटक, शेख हसिना यूनुस सरकाविरोधात आक्रमक
8
भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...
9
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
10
७.८३ टक्के मतं कशी वाढली? नाना पटोलेंच्या आरोपांवर निवडणूक आयोग म्हणतं, "हे सामान्य आहे कारण..."
11
EVM वर पराभवाचे खापर, धनजंय मुंडेंचे काँग्रेसला खुले आव्हान; म्हणाले, “मान्य करा की...”
12
मृत्यूच्या १५ मिनिटं आधी सृष्टी आई, मावशीशी आनंदाने बोलली अन्...; कुटुंबीयांचा गंभीर आरोप
13
अजित पवारांची राष्ट्रवादी मोठा विस्तार करणार, दिल्लीतही निवडणूक लढणार; प्रफुल्ल पटेलांची मोठी घोषणा
14
SA vs SL Test : श्रीलंकेचा संघ ४२ धावांत All Out! ६४ ओव्हर्समध्ये पडल्या २० विकेट्स
15
'ये है मोहोब्बते' फेम अभिनेत्याचा झाला साखरपुडा, होणाऱ्या बायकोसाठी लिहिली सुंदर पोस्ट
16
“लिहून ठेवा, एक दिवस उद्धव ठाकरे कुटुंबाला घेऊन देश सोडून निघून जातील”: रामदास कदम
17
रोहित शर्माची ऑस्ट्रेलियन संसदेत 'बोलंदाजी'; शेअर केल्या ऑस्ट्रेलियन दौऱ्यातील खास गोष्टी
18
बच्चू कडू यांचे राणा दाम्पत्यास आव्हान; म्हणाले, "पुन्हा निवडणूक घ्या..."
19
मराठी सिनेमे डब का होत नाहीत? नाना पाटेकरांनी व्यक्त केली खंत; 'फुलवंती' चं नाव घेत म्हणाले...
20
शुक्र-अरुण ग्रहाचा नवपंचम योग: ६ राशींना वरदान, हाती लागेल घबाड; व्हाल मालामाल, शुभ-लाभ काळ!

सत्तेसाठी व्यूहरचना सुरू

By admin | Published: October 25, 2015 12:54 AM

तालुका स्तरावरील मोठी ग्रामपंचायत असलेल्या गोंंडपिंपरी ग्रामपंचायतीला गेल्या जून महिन्यात नगरपंचायतीचा दर्जा मिळाला.

प्रभागनिहाय आरक्षण जाहीर : गोंडपिंपरी नगरपंचायत निवडणूकगोंडपिंपरी : तालुका स्तरावरील मोठी ग्रामपंचायत असलेल्या गोंंडपिंपरी ग्रामपंचायतीला गेल्या जून महिन्यात नगरपंचायतीचा दर्जा मिळाला. आगामी काही दिवसांमध्ये निवडणूक विभागामार्फत नगरपंचायत निवडणूक होऊ घातली आहे. कुठल्याही स्थितीत सत्ता आपल्याच हाती राहावी म्हणून राजकीय मातब्बरांनी कंबर कसली असून व्यूहरचना आखण्यास सुरूवातही केली आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी महसूल विभागामार्फत नगराचे प्रभागवार आरक्षण सोडत प्रक्रिया पार पडली असल्याने शहरात निवडणूक रणधुमाळीचे चित्र उभे झाले आहे. जिल्हा सीमेवर वसलेला तसेच आदिवाहीबहुल, नक्षलग्रस्त व अतिदुर्गम विस्तारित तालुका म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गोंडपिंंपरी तालुक्यात राजकीय सत्ता स्थापनेसाठी नेहमीच चढाओढीसह स्पर्धा होत असते. यात काँग्रेस, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, शेतकरी संघटना व इतर राजकीय पक्षांची या शहरावर विशिष्ट भाग व जाती समुदायात चांगली पकड आहे. तत्पूर्वी येथे ग्रामपंचायत कालावधीत झालेला भ्रष्टाचार, शहरातील विविध समस्या, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आदी कारणांमुळे तसेच अपुऱ्या निधीमुळे गावातील विकास कामे रखडली होती. त्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून गोंडपिंपरी नगर पंचायत व्हावी, ही ग्रामस्थांची मागणी शासनाने पूर्ण केल्याने आता प्रशासनानेही निवडणूकीची तयारी चालविली आहे. त्या पार्श्वभूमीेवर सर्वपक्षीय राजकारण्यांनी या नगरपंचायतीत सत्ता आपल्या हाती राहावी म्हणून जोरदार रणनीती आखण्यास सुरूवात केली आहे.एकीकडे राजकीय मंडळी तडजोडीच्या राजकारणात गुंतली असताना प्रभागनिहाय आरक्षण सोडतीनंतर पक्ष बंडखोरी, अपक्ष उमेदवारी लढविण्याची भाऊगर्दी तसेच नशीब आजमाऊ पहाणााऱ्यांची अति उत्सुकता शिगेला पोहचली असल्याचे चित्र दिसून येत आहे. तालुका स्तरावर राजकीयदृष्ट्या प्रतिष्ठेची निवडणूक समजल्या जाणाऱ्या या निवडणुकीत काही मातब्बरही उमेदवारी अर्ज दाखल करणार असून शहराच्या कानाकोपऱ्यात निवडणुकीच्या चर्चेला उधाण येऊन वारे वाहत आहे. नागरिकांमध्येही चांगला उमेदवार कोण राहणार, शहर विकासाची सुत्रे कुणाच्या हाती सोपवावी, याची कुजबुज सुरू असल्याचे दिसून येत आहे. (तालुका प्रतिनिधी)