शहरातील प्रत्येक नागरिकांच्या घरी जाऊन कचरा गोळा करण्याकरिता नगरपरिषदेनी चंद्रपूर येथील युवक कल्याण सुशिक्षित बेरोजगार सेवा सहकारी संस्था मर्यादित चंद्रपूर यांना काम दिले. त्यांच्याकडून शहरातील कचरा गोळा केला जातो. त्यासाठी सहा घंटा गाडी, पिकअप व दोन ट्रॅक्टर असून घंटागाडीवर काम करण्यासाठी ड्रायवरसह एक कामगार आणि ट्रॅक्टरवर ड्रायव्हरसह चार किंवा पाच कामगार असणे गरजेचे आहे. परंतु मागील अनेक दिवसांपासून काही घंटागाडीत फक्त ड्रायव्हरच येतो आणि ट्रॅक्टरवर दोनच कामगार असतात. दररोज घरोघरी जाऊन कचरा उचलणे आवश्यक आहे. परंतु एक किंवा दोन दिवसाआड घंटागाडी कचरा उचलण्यासाठी जात असते. याकडे संबंधित अधिकारी व कर्मचारी यांचे अजिबात लक्ष नाही. याचा मनस्ताप नागरिकांना सहन करावा लागत आहे. मागील अनेक महिन्यांपासून असाच प्रकार सुरू आहे.
280821\img_20210815_062654.jpg
कचरा संकलन करणारे वाहन