सरपंच निवडणुकीचा निकाल
सिंदेवाही : तालुक्यातल्या ४४ ग्रामपंचायतींपैकी रविवारी १५ ग्रामपंचायतींच्या निवडणुका पार पडल्या. त्यात तालुक्यात सर्वात श्रीमंत असणारी लोनवाही ग्रामपंचायत ही काँग्रेसच्या ताब्यात आली. पळसगाव या ग्रामपंचायतीवर बंडखोर काँग्रेसचे सरपंच तर उपसरपंच भाजपचे झाले. १५ पैकी ११ ठिकाणी कॉंग्रेसने तर चार ग्रामपंचायतींवर भाजपाने वर्चस्व स्थापित केले.
लोनवाही- सरपंच नेहा समर्थ, उपसरपंच रमाकांत बोरकर (काँग्रेस) पळसगाव- सरपंच जगदीश कांबळी (बंडखोर काँग्रेस), उपसरपंच संतोष गायकवाड (भाजप) मरेगाव- सरपंच देवानंद सहारे, उपसरपंच पूजा वाकळे (काँग्रेस) गडबोरी- शीतल उपकार, उपसरपंच जगदीश बनकर (भाजप) रामाडा- सरपंच अरविंद मेश्राम, उपसरपंच संजना बहिर वार (काँग्रेस) देलनवाडी- सरपंच अश्विनी डोंगरवार, उपसरपंच ताराचंद अर्जुन कार (काँग्रेस) भेंडाळा- सरपंच राजू बनसोड, उपसरपंच त्रिशरण गणवीर( भाजप) मुरमाडी- सरपंच रुपाली रत्ना वार, उपसरपंच नीलकंठ जांभुळे (काँग्रेस) वाकल- सरपंच राहुल पंचभाई, उपसरपंच दिनेश मांदाडे (काँग्रेस) कुकड हेटी- सरपंच रामचंद्र श्रीरामे, उपसरपंच उज्ज्वला तोरण कर (काँग्रेस) गुंजेवाही- सरपंच वसंत टेकाम, उपसरपंच शालिनी गुरनुले (भाजप) अंतरगाव- सरपंच दीपाली ढाले, उपसरपंच प्रवीण कामडी (काँग्रेस) वासेरा- सरपंच महेश बोरकर, उपसरपंच मंदा मुनघाटे (भाजप) चीकमारा- सरपंच विजय ठीक रे, उपसरपंच शीतल लोणारे (काँग्रेस) कन्नड गाव- सरपंच जोशना मडावी, उपसरपंच श्रीकांत मोहरले (काँग्रेस) यांची निवड करण्यात आली आहे.