शहरं
Join us  
Trending Stories
1
जाना था जापान, पहुंच गए चीन...! पंकजा मुंडेंसोबत असेच घडले, हेलिकॉप्टर सिडकोऐवजी सायखेड्याला पोहोचले
2
उद्धव ठाकरेंचा मनसेला मोठा धक्का; राज ठाकरेंचा नाशिकमधील विश्वासू शिलेदार फोडला
3
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्लेनमध्ये तांत्रिक बिघाड, देवघर एअरपोर्टवर थांबलं विमानात
4
हिंगोलीत निवडणूक अधिकाऱ्यांकडून अमित शाहांच्या बॅगांची तपासणी;म्हणाले, "लोकशाहीसाठी आपण..."
5
Maharashtra Election 2024: महायुतीतील मैत्रीपूर्ण लढतीच्या साठमारीत अपक्ष करणार का 'विक्रम'?
6
अब्दुल सत्तारांच्या पराभवासाठी सिल्लोडमध्ये उद्धव ठाकरेंची भाजपला साद
7
Ajay Gupta : कल्पकतेला सॅल्यूट! व्हीलचेअरवर असतानाही मानली नाही हार; उभं केलं १०० कोटींचं साम्राज्य
8
कर्नाटकच्या विरोधी पक्षनेत्याला हनीट्रॅपमध्ये अडकवून HIV बाधित करण्याचा होता प्लॅन? पोलीस निरीक्षकाला अटक
9
महाराष्ट्रात योगी आदित्यनाथ यांनी खरंच बुलडोझरवर चढून प्रचार केला का? जाणून घ्या सत्य
10
भाषण करताना सुरू झाला पाऊस, निवडणुकीचा निकाल चांगला लागणार, शरद पवारांचं विधान
11
Maharashtra Election 2024 Live Updates: अमित शाहांचा उद्धव ठाकरेंना सवाल; "खरी शिवसेना कधीही..."
12
"...अन् दुसऱ्याच दिवशी भाजपात गेले"; शरद पवारांनी सांगितला संजय पाटलांचा इतिहास
13
गुजरातच्या पोरबंदर किनाऱ्यावर 700 किलो ड्रग्ज जप्त, NCB आणि नौदलाची मोठी कारवाई
14
Mumbai Metro 3 Fire BREAKING: मेट्रो-३ च्या बीकेसी स्टेशनला आग, सर्व फेऱ्या रद्द; प्रवासी सुखरुप
15
“राहुल गांधींच्या सभांना प्रचंड प्रतिसाद, PM मोदींचं रिकाम्या खुर्च्यांना संबोधन”: चेन्नीथला
16
भाजपकडून मुख्यमंत्रिपदासाठी विनोद तावडे, पंकजा मुंडे, चंद्रशेखर बावनकुळेंचीही चर्चा
17
एकदम कडक! WhatsApp वर येणार दमदार फीचर; मेसेजची 'ही' मोठी समस्या होणार दूर
18
Raamdeo Agrawal on Share Market : शेअर बाजारातील घसरणीचा टप्पा हा तात्पुरता, परदेशी गुंतवणूकदार बाजारात परतणार : रामदेव अग्रवाल
19
Video: तेल, तूप, साखर, मीठ... खच्चून महिन्याला ५०० रुपये खर्च, वर १००० उरतात; कोल्हापुरात उमेदवाराच्या सुनेचे वक्तव्य 
20
विधेयक फाडलं अन् संसदेत केला आगळावेगळा डान्स; महिला खासदाराचा व्हिडिओ व्हायरल

Chandrapur: आनंदाच्या भरात काँग्रेस आणि भाजपचे जिल्हाध्यक्ष बेफाम नाचले, व्हायरल व्हिडीओची राजकीय वर्तुळात चर्चा

By राजेश भोजेकर | Published: April 30, 2023 11:31 AM

Chandrapur: आनंद गगनात मावेनासा झालेले चंद्रपूर जिल्हा काँग्रेस पक्षाचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे व भाजपचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांनी ढोल, ताशाच्या ठेक्यावर गुलाल उधळीत केलेला डान्स राजकीय वर्तुळात चर्चेला आहे.

- राजेश भोजेकरचंद्रपूर : भाजपशी अभद्र युती करून स्वपक्षीय खासदार बाळू धानोरकर समर्थित चंद्रपूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती दिनेश चोखारे गटाचा पराभव केल्यानंतर आनंद गगनात मावेनासा झालेले चंद्रपूर जिल्हा काँग्रेस पक्षाचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे व भाजपचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांनी ढोल, ताशाच्या ठेक्यावर गुलाल उधळीत केलेला डान्स राजकीय वर्तुळात चर्चेला आहे.

चंद्रपूर बाजार समितीच्या निवडणूकीसाठी काँग्रेसचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे व भाजपचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांनी एकत्र येत काँग्रेस आणि भाजप अशी अभद्र युती करून निवडणूक लढविली. खासदार धानोरकर यांच्या पराभवासाठी या युतीला आजी माजी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार व विजय वडेट्टीवार यांचा आशीर्वाद होता हे काही लपून राहिलेले नाही. या निवडणूकीत १८ पैकी १२ संचालक भाजप व काँग्रेसच्या युतीचे निवडुन आले.

दरम्यान, खासदार धानोरकर समर्थित चोखारे गटाचा भाजप काँग्रेस अभद्र युतीने पराभव करताच काँग्रेसचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे व भाजपचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांनी एकत्र गुलाल उधळीत ढोल ताशांच्या तालावर ठेका धरून विजयोत्सव साजरा केला. मात्र, हा विजयोत्सव साजरा करता आपण काँग्रेस आणि भाजपचे जिल्हाध्यक्ष असल्याचे विसरून गेले. काँग्रेस आणि भाजप हे दोन्ही पक्ष राजकीय विरोधक आहेत. मात्र, चंद्रपूर बाजार समितीच्या निवडणूकीत ही ओळख पुसली गेली. खासदार धानोरकर गटाच्या दिनेश चोखारे यांचा पराभव होताच काँग्रेसचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे व भाजपचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांनी कार्यकत्र्यांसह एकत्र येत गुलाल उधळीत ढोल ताशांच्या तालावर ठेका धरून विजयोत्सव साजरा केला. या विजयोत्सवाची चित्रफित समाजमाध्यमावर व्हायरल झाली आहे.

टॅग्स :congressकाँग्रेसBJPभाजपा