लोकमत न्यूज नेटवर्कब्रह्मपुरी : केंद्र सरकारने पेट्रोल, डिझेल, गॅस सिलिंंडरच्या किंमतीत भरमसाठ वाढ केल्याने सर्वसामान्य नागरिकांचे कंबरडे मोडले आहे. महागाईमुळे जनता होरपळून निघत असून भाजप सरकारचे धोरण जनसामान्यांच्या विरोधात आहेत. केंद्र सरकारने केलेली पेट्रोल, डिझेल, गॅस सिलिंडरची दरवाढ मागे घ्यावी, या मागणीसाठी शुक्रवारी ब्रह्मपुरीत काँग्रेसतर्फे घंटानाद आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात शेकडो नागरिकांचा सहभाग होता.घंटनाद आंदोलनाचे नेतृत्व आ. विजय वडेट्टीवार यांनी केले. ‘अच्छे दिन’ चे स्वप्न दाखवून सत्तेवर आलेल्या भाजप सरकारने गरीब शेतकरी व सामान्य जनतेला खोटी आश्वासने देऊन महागाईच्या खाईत टाकले आहे. काँग्रेस सरकारने पेट्रोल, डिझेल, गॅस सिलिंडर दरवाढ करताना ४० वर्ष लागले. तर सध्याच्या सरकारने ४० महिन्यात दर दुप्पट करून जनतेची लूट केल्याचा आरोप घंटनाद आंदोलनात आ. वडेट्टीवार यांनी केला.शेतकºयांची कर्जमाफी केवळ पोकळ आश्वासन असून आॅनलाईनच्या नावाखाली फसवणूक करीत असल्याचा प्रकार सर्वत्र दिसून येत आहे. त्यामुळे घंटनांद आंदोलनाच्या माध्यमातून केंद्र सरकारचा जाहीर निषेध करण्यात आला आहे. सकाळी शिवाजी चौकात काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते हजारोच्या संख्येने जमा होऊन घंटानादचा गजर करीत होते. शिवाजी चौकात या घंटानांद आंदोलनाचे जाहीर सभेत रूपांतर झाले. त्यानंतर तहसिलदार विद्यासागर चव्हान यांनी स्वत: येऊन आंदोलकांचे निवेदन स्वीकारले.या आंदोलनात जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे, काँग्रेस पक्षाचे जिल्हा निवडणूक निर्वाचन प्रभारी रामगोपाल भवनिया, तालुकाध्यक्ष खोमराज तिडके, शहराध्यक्ष बाळू राऊत, जि.प. सदस्य प्रा. राजेश कांबळे, नितीन उराडे, प्रा. सुभाष बजाज, विलास विखार, प्रमोद चिमूरकर, स्मिता पारधी, थानेश्वर कायरकर, प्रतिभा फुलझेले, रोहित एरगेल्लवार, नलिनी सावरकर, सुचित्रा ठाकरे, मोटघरे, पेशने, लोनबले, ठाकूर, अनेक गावातील सरपंच, उपसरपंच, काँग्रेस कमिटीचे पदाधिकारी व अन्य कार्यकर्ते मोठ्या संख्येनी उपस्थित होते. शासनाने आंदोलनाची दखल न घेतल्यास आणखी तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.
काँग्रेसचा घंटानाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2017 11:48 PM
केंद्र सरकारने पेट्रोल, डिझेल, गॅस सिलिंंडरच्या किंमतीत भरमसाठ वाढ केल्याने सर्वसामान्य नागरिकांचे कंबरडे मोडले आहे.
ठळक मुद्देराज्य व केंद्र शासनाचा निषेध : पेट्रोल, डिझेल, गॅस सिलिंडरची दरवाढ कमी करा