चिमूर : देशभरात पेट्रोल व डिझेलसह अन्य जीवनावश्यक वस्तूंचे भाव गगनाला भिडले आहेत. केंद्र सरकार याकडे दुर्लक्ष करीत आहे. काँग्रेसच्या वतीने आतापर्यंत अनेक आंदोलने करण्यात आली, तरीही निर्ढावलेल्या केंद्र सरकारला जाग आली नाही. दिवसेंदिवस जीवनावश्यक वस्तूंचे भाव अधिकच वाढतच आहेत. त्यामुळे केंद्रातील भाजप सरकारचा निषेध करण्यासोबतच जीवनावश्यक वस्तूंचे दर कमी करण्यात यावेत, याकरिता तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने सायकल रॅली काढून केंद्र सरकारचा निषेध करण्यात आला.
या आंदोलनाचे नेतृत्व जि. प. गटनेता डॉ. सतीश वारजूकर यांनी केले. वारजूकर भवनापासून ते हजारे पेट्रोल पंपापर्यंत ही सायकल रॅली काढून केंद्र सरकारचा निषेध केला. यावेळी चिमूर तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष संजय घुटके, चंद्रपूर जिल्हा काँग्रेस कमिटी सरचिटणीस विजय पाटील गावंडे, चिमूर पंचायत समिती उपसभापती रोशन ढोक, तालुका उपाध्यक्ष विजय डांबरे, उपाध्यक्ष राजू चौधरी, युवक काँग्रेस अध्यक्ष प्रशांत डवले, पप्पू शेख, संदीप कावरे, नितीन कटारे, विलास मोहिनकर, राणी थुटे, अभिलाषा शिरभय्ये, ममता भिमटे, दीक्षा भगत, नाजेमा पठाण, रामदास चौधरी, प्रवीण जीवतोडे, शुभम पारखी, प्रमोद धाबेकर, पवन बंडे, अमित मेश्राम उपस्थित होते.