नवरगाव ग्रामपंचायतीमध्ये तीन गटांकडून निवडणूक लढली गेली. यामध्ये काँग्रेस गटाचे राहुल बोडणे, पंकज उईके, पवन जैस्वाल, स्वाती विनोद लोणकर, रागिणी लोखंडे, सविता चौके, सरिता सोनवाने असे आठ सदस्य, भाजप गटाचे ज्ञानेश्वर कंकलवार, भोला इदुलवार, शोभा दुर्कीवार, दीपक चहान्दे, श्रीकांत हेडावू, वैशाली मेश्राम, पूजा पंचवटे आदी सात सदस्य आणि गोपाल चिलबुले गटाचे सुरेश गिरडकर, श्वेता कामडी असे दोन सदस्य निवडून आले होते. मात्र कुणाकडेही स्पष्ट बहुमत नसल्याने काँग्रेस गटाकडून सरपंच पदासाठी राहुल बोडणे, तर भाजप गटाकडून ज्ञानेश्वर कंकलवार यांनी फाॅर्म भरला आणि उपसरपंच पदासाठी चिलबुले गटाकडून निवडून आलेल्या, परंतु वेळेवर काँग्रेस पक्षात समाविष्ट झालेल्या श्वेता कामडी यांनी फाॅर्म भरला, तर भाजप गटाकडून दीपक चहान्दे यांनी फाॅर्म भरला. राहुल बोडणे हे नऊ-सात आणि उपसरपंचपदी श्वेता कामडी नऊ-सात मताने विजयी झाल्या.
नवरगाव ग्रामपंचायतीत काँग्रेसचे वर्चस्व
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2021 4:50 AM