साईनाथ कुचनकार/ चंद्रपूर
चंद्रपूर : जिल्ह्यातील निवडणूक झालेल्या बाजार समितींपैकी सहा बाजार समितीच्या सभापती, उपसभापतिपदासाठी शुक्रवारी निवडणूक पार पडली. राजकीय पक्षांनी ही निवडणूक विविध पॅनलच्या माध्यमातून लढविली असली तरी जिल्ह्यात बाजार समितीमध्ये काँग्रेसचे वर्चस्व बघायला मिळत आहे. दरम्यान, वरोरा बाजार समितीमध्ये दोन्ही पॅनलकडे समसमान संचालक असल्याने येथे ईश्वर चिठ्ठीने सभापती, उपसभापतींची निवडणूक करण्यात आली.कोरपना : सभापती अशोक बावणे, उपसभापती वंदना बल्कीमूल : सभापती राकेश रत्नावार, उपसभापती राजेंद्र कन्नमवारवरोरा: सभापती विजय देवतळे, उपसभापतीपदी जयंत टेमुर्डेचंद्रपूर : सभापती गंगाधर वैद्य, उपसभापती गोविंदा पोडेचिमूर :सभापती मंगेश धाडसे, उपसभापती रवींद्र पंधरेब्रह्मपुरी: सभापती प्रभाकर सेलोकर, उपसभापती सुनीता तिडके