शेतकऱ्यांनी दिल्लीच्या आंदोलनाला पाठिंबा देत आज भारत बंदची हाक दिली. भारत बंदच्या समर्थनात गोंडपिपरी काँग्रेस कमिटीने पाठिंबा देऊन तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले.
शेतकऱ्यांच्या मागण्या रास्त असून, अन्यायी कृषी कायदे रद्द करण्याची मागणी निवेदनाद्वारे तहसीलदारांमार्फत करण्यात आली. यावेळी इंधन, गॅसवाढीचादेखील निषेध करण्यात आला. यावेळी गोंडपिपरी तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तुकाराम झाडे, कृ.उ.बा.स उपसभापती अशोक रेचनकर, शहराध्यक्ष देवेंद्र बट्टे, युवक काँग्रेस तालुकाध्यक्ष संतोष बंडावार, जिल्हा सचिव कमलेश निमगडे, माजी उपसभापती रामचंद्र कुरवटकर, माजी तालुकाध्यक्ष राजीवसिंह चंदेल, विधानसभा प्रमुख सचिन फुलझेले, सरपंच देवीदास सातपुते, संजय गांधी निराधार योजना समिती अध्यक्ष विनोद नागापुरे, अस्लम शेख, नगारे, राजू झाडे, सुरगावचे सरपंच पोचुमल्ला उलेंदला, रेखा रामटेके, ग्रा. पं. सदस्य,अनिल झाडे, अनुसूचित जाती जमाती सेल तालुका अध्यक्ष गौतम झाडे, माजी उपसरपंच अभय शेंडे, माजी नगरसेवक प्रवीण नरशेटीवार, माजी उपसरपंच विलास चौधरी यांच्यासह तालुक्यातील अनेक काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.