शहरं
Join us  
Trending Stories
1
संजय शिरसाट यांच्या लेकाच्या वाहनावर हल्ला; उद्धव ठाकरे गटाच्या उमेदवारावर आरोप
2
बारामतीत हाय व्होल्टेज सामना: अजित पवारांनी बजावला मतदानाचा हक्क, मताधिक्याविषयी म्हणाले...
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : अजित पवारांसह अनेकांनी बजावला मतदानाचा हक्क; अनेक ठिकाणी ‘ईव्हीएम’मध्ये बिघाड!
4
A.R.Rahman divorce: "आम्हाला वाटलं होतं ३० वर्ष पूर्ण करू, पण...", ए. आर. रहमानचा २९ वर्षांचा संसार मोडला
5
मुंबई, ठाण्यात ठाकरे, शिंदेंची प्रतिष्ठा पणाला! ठाकरे बंधूंच्या मतदारसंघांकडे लक्ष
6
पराभव दिसू लागल्यानेच मविआकडून तावडेंवर हल्ला; देवेंद्र फडणवीसांचा आरोप
7
जनसुराज्य शक्ती पक्षाचे उमेदवार पादेश्वर महाराजांच्या गाडीवर दगडफेक; महाराज जखमी
8
नालासोपाऱ्यात कॅश ड्रामा! पैसे वाटपाच्या आरोपांवरून विनोद तावडेंना घेरले; तीन गुन्हे दाखल
9
जगभर : मुजतबा खामेनेई : ‘शांत’ डोक्याचा ‘सुप्रीम लीडर’!
10
Vaibhav Suryavanshi: १३ वर्षांच्या मुलाला उघडेल आयपीएलचं दार?
11
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: सकाळची वेळ नवीन कार्यारंभासाठी अनुकूल!
12
टक्का वाढला पाहिजे..! सर्वोच्च अधिकार नाकारून कसे चालेल...?
13
Maharashtra Assembly elections 2024: कोणत्या मुद्द्यांभोवती फिरली प्रचारचक्रे ? 
14
विशेष लेख: ‘अर्बन नक्षल’- भाजपच्या मानगुटीवरचे भूत 
15
नरेंद्र मोदी, राहुल गांधी, ठाकरे करणार कोथरुडात मतदान; नामसाधर्म्यामुळे प्रशासनाची धावपळ
16
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतदान; काँग्रेस-भाजपमध्ये लढत 
17
झारखंड : दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला; अंतिम टप्प्याचे आज ३८ जागांवर मतदान
18
वाशिम येथे मतदानास सुरुवात; मतदारांना मिळतेय सहकार्य
19
विशेष लेख: हवामानबदल रोखण्याचा ‘खर्च’ कोण उचलणार, यावर खडाजंगी
20
वरळीतील १,३३९ मतदारांच्या सोयीसाठी; चक्क उड्डाणपुलाखाली दोन मतदान केंद्रे

सावलीत काँग्रेस तर चिमूर व पोंभुर्ण्यात भाजप

By admin | Published: December 01, 2015 5:18 AM

चिमूर नगरपालिका आणि सावली व पोंभुर्णा नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष पदासाठी सोमवारी निवडणूक घेण्यात आली.

मिरवणुकीतून जल्लोष : नगर पालिका व नगर पंचायत निवडणूकचंद्रपूर : चिमूर नगरपालिका आणि सावली व पोंभुर्णा नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष पदासाठी सोमवारी निवडणूक घेण्यात आली. यात चिमूर व पोंभुर्णा येथे भाजपाचे तर सावलीमध्ये काँग्रेसचे नगराध्यक्ष विराजमान झाले. पोंभुर्णा नगर पंचायतीवरभाजपाचा झेंडापोंभुर्णा : पोंभुर्णा नगर पंचायतीमध्ये पार पडलेल्या नगराध्यक्ष पदाच्या व उपनगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत भाजपाने आपले वर्चस्व कायम ठेवले असून नगर अध्यक्षपदी भाजपाचे तालुकाध्यक्ष गजानन गोरंटीवार तर उपनगराध्यक्षपदी भाजपाचे तालुका महामंत्री ईश्वर नैताम हे निवडून आले आहेत. दोघांनाही १७ पैकी ११ मते मिळाली आहेत.राज्याचे अर्थमंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या बल्लारपूर निर्वाचन क्षेत्रातील पोंभुर्णा नगर पंचायतीच्या नगराध्यक्षपदाची निवडणूक सोमवारला नगर पंचायत कार्यालयात १२ वाजता निवडणूक निर्णय अधिकारी कल्पना निळ व तहसीलदार हरीश गाडे यांच्या उपस्थितीत घेण्यात आली. यावेळी नवनिर्वाचित १७ सदस्य उपस्थित होते. यामध्ये भाजापकडे दहा, काँग्रेस पाच तर अपक्ष दोन अशी बलाबल संख्या होती. भाजपातर्फे नगराध्यक्षपदासाठी गजानन गोरंटीवार यांना १७ पैकी ११ मते मिळाली तर काँग्रेसचे प्रतिस्पर्धी उमेदवार अमीक अतीक अहमद शब्बीर अहमद कुरेशी यांना सहा मते मिळाली. उपाध्यक्ष पदासाठी भाजपाचे ईश्वर नैताम यांना १७ पैकी ११ मते तर काँग्रेसच्या प्रतिस्पर्धी उमेदवार सविता गेडाम यांना सहा मते मिळाली. त्यामुळे या ठिकाणी भाजपाला आपले वर्चस्व टिकवून ठेवण्यात यश प्राप्त झाले आहे.निवडणुकीचा निकाल जाहीर होताच भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जल्लोषात नवनिर्वाचित अध्यक्ष गजानन गोरंटीवार तर उपाध्यक्ष ईश्वर नैताम यांचे स्वागत करून फटाक्याच्या व ढोलताशाच्या गजरात त्यांचे जंगी स्वागत केले.यावेळी जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते प्रमोद कडू, सरचिटणीस देवराव भोंगळे, पं.स. सभापती बापूजी चिंचोळकर, उपसभापती महेश रणदिवे, कृउबा सभापती राहुल संतोषवार, जि.प. सदस्या अल्का आत्राम, कृउबा संचालक नंदकिशोर तुम्मुलवार, अजित मंगलगिरीवार, पं.स. सदस्या भारती कन्नाके, ओमदेव पाल, वर्षा मोहुर्ले, बबन गोरंतवार, रूषी कोटरंगे, अजय लोणारे, दिलीप मॅकलवार, अशोक सातपुते, मारोती मोहुर्ले, दीपक मोगरकर, बंडू बुरांडे, प्रवीण चिचघरे, राजू धोडरे, रवी गेडाम, ईक्बाल कुरेशी तथा बहुसंख्य भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. सावलीत काँग्रेसने गड जिंकलासावली : सावली नगरपंचायत नगराध्यक्षपदाकरिता आज दुपारी १ वाजता नगर पंचायत सभागृहात मतदान झाले. यामध्ये नगराध्यक्षपदाकरिता काँग्रेसच्या रजनी राजेश्वर भडके तर उपनगराध्यक्षपदाकरिता काँग्रेसचेच विलास त्र्यंबक यासलवार विजयी झाले. दोघांनाही १७ पैकी ११ मते मिळाली. यात प्रतिस्पर्धी संगिता प्रितम गेडाम व कुसुम शंकर रस्से यांना ६ मतांवरच समाधान मानावे लागले. १ नोव्हेंबरला १७ प्रभागाकरिता १७ नगरसेवकासाठी मतदान झाले. यात काँग्रेस दहा, राष्ट्रवादी पाच, बसपा एक, अपक्ष १ असे उमेदवार निवडून आले. काँग्रेसकडे हक्काचे बहुमत असतानासुद्धा ऐनवेळेवर एका अपक्ष नगरसेवकाची भर पडली. त्या तुलनेत राष्ट्रवादीकडे पाच नगरसेवक होते. नगराध्यक्षपदाकरिता अविरोध निवड होऊ नये म्हणून राष्ट्रवादीने बहुजन समाज पार्टीची साथ घेवून अनुसूचित जातीच्या स्त्री उमेदवारी नसल्याने बसपाची साथ घेतली. नगराध्यक्ष पदाकरिता फार्म भरला. परंतु त्या नगरसेविकेला पाच मतांनी पराभव पत्करावा लागला.यात नगराध्यक्ष म्हणून रजनी भडके व उपनगराध्यक्ष म्हणून विलास त्र्यंबक यासलवार यांनी प्रतिस्पर्धी नगरसेवकावर पाच मतांनी विजय मिळविला व आपले स्थान पक्के केले. तसेच काँग्रेस पक्षाने स्विकृत सदस्य म्हणून संदीप बाबूराव पुण्यपकार तर राष्ट्रवादी पक्षाकडून राकेश रमेश ताटकोंडावार यांची निवड करण्यात आली. आमदार विजय वडेट्टीवार यांच्या समक्ष ही निवडणूक पार पडली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून मनिषा दांडगे होत्या. (लोकमत चमू)चिमूर नगरपालिकेत भाजपाचे नगराध्यक्षनवनिर्मित चिमूर नगर परिषदेची पहिली सार्वत्रिक निवडणूक झाल्यानंतर नगराध्यक्ष व उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीत भाजपाच्या शिल्पा राचलवार या दहा मते घेऊन विजयी झाल्या. तर तुषार शिंदे हे उपाध्यक्ष पदावर अविरोध निवडून आले. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून उपविभागीय अधिकारी संगिता राठोड उपस्थित होत्या. नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत नगर परिषदेवर भाजपाने सत्ता बळकावली असून नगराध्यक्ष शिल्पा राचलवार, छाया कंर्चलावर, हेमलता नन्नावरे, भारती गोडे, जयश्री निवटे, उषा हिवरकर, तुषार शिंदे, नितीन कटारे, तुषार काळे, सतीश जाधव हे दहा नगर सेवक भाजपाचे आमदार कीर्तीकुमार भांगडिया यांच्या खेम्यात असल्याने भाजपाचा झेंडा रोवण्यात आला. तर उपाध्यक्ष पदावर तुषार शिंदे हे अविरोध निवडून आले. काँग्रेसकडून नगराधयक्षपदाच्या उमेदवारीत श्रद्धा प्रदीप बंडे रिंगणात होत्या. त्यांना केवळ सात मते मिळाली. सात मते काँग्रेस-शिवसेना आघाडीची होती. या निवडणुकीत स्वीकृत सदस्य म्हणून भाजपाचे संजय खाटिक तर काँग्रेसकडून विनोद ढाकूणकर यांची निवड करण्यात आली. भाजपाच्या वतीने आतिषबाजी व मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीत डॉ.शाम हटवादे, निलम राचलवार, डॉ.देवनाथ गंधारे, विलास बंडे, अविनाश रासेकर, मनोज हजारे, यशवंत वाघे, अ‍ॅड. नवयुग कामडी, विनोद शिरपूरवार आदी हजर होते.