लोकमत न्यूज नेटवर्कचिमूर : केंद्रातील भाजपा सरकारने आमची सरकार आल्यावर काळा धन आणू, नोटबंदीने दहशतवाद संपेल व देशातील काळेधन बाहेर मिळेल, अशा मोठ्या बाता केल्या. मात्र सर्व फोल ठरले आहे. काँग्रेसने सरसकट कर्जमाफी केली होती. मात्र भाजपच्या राज्य सरकारने भेदभाव करणारी कर्जमाफी जाहीर केली. ही कर्जमाफी फसवी असल्याचा आरोप खनिकर्म महामंडळाचे माजी अध्यक्ष डॉ. अविनाश वारजुकर यांनी महागाई विरोधात आयोजित घंटानाद आंदोलनात केले.घंटानाद आंदोलनाची सुरुवात काँग्रेस कार्यालयापासून झाली व उपविभागीय अधिकारी कार्यालयापुढे शासनविरोधी घोषणा देण्यात आल्या. हे आंदोलन डॉ. अविनाश वारजुकर यांच्या मार्गदर्शनाखाली व जिल्हा परिषदेतील काँग्रेसचे गटनेते डॉ. सतिश वारजुकर यांच्या नेतृत्वात करण्यात आले.घंटानाद आंदोलनात डॉ. सतिश वारजुकर यांनी भाववाढीशिवाय या भाजपा सरकारने कोणतेही काम केले नसल्याचा आरोप करीत सामान्य जनतेची लूट चालली असल्याचे सांगितले. याप्रसंगी ज्येष्ठ काँग्रेस कार्यकर्ता विजय गावंडे, प्रा.श्याम राऊत, संजय डोंगरे, विजय डाबरे यांनी केंद्र व राज्य शासनाच्या धोरणावर यावेळी कडाडून टिका केली.काँग्रेस कार्यालयापासून सुरु झालेले घंटानाद आंदोलनाची सांगता उपविभागीय अधिकारी कार्यालयात झाली. यावेळी प्रामुख्याने पंचायत समिती उपसभापती शांताराम सेलवटकर, काँग्रेस गट नेता रोशन ढोक, पंचायत समिती सदस्य भावना बावनकर, नगरसेवक कदीर शेख, विनोद ढाकूनकर, कल्पना इंदूरकर, काँग्रेस कमिटी महिला अध्यक्षा सविता चौधरी, योगिता थुटे, शंकरपूरच्या सरपंच दिक्षा भगत, उपसरपंच लिलाधर बन्सोड, अरविंद रेवतकर, अविनाश अगडे व काँग्रेस कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.
महागाईविरोधात काँग्रेस रस्त्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 30, 2017 12:12 AM
केंद्रातील भाजपा सरकारने आमची सरकार आल्यावर काळा धन आणू, नोटबंदीने दहशतवाद संपेल व देशातील काळेधन बाहेर मिळेल, अशा मोठ्या बाता केल्या. मात्र सर्व फोल ठरले आहे.
ठळक मुद्देचिमूर येथे घंटानाद आंदोलनाने केला निषेध