लोकमत न्यूज नेटवर्कबल्लारपूर : काँग्रेस पक्ष सर्वसामान्याचा आहे. काँग्रेसची विचारसरणी धर्मनिरपेक्ष असल्याने सर्व घटकांना न्याय देणारा आहे. प्रस्थापित केंद्र व राज्य सरकार सामाजिक धुर्वीकरण करून सामाजिक सलोखा धोक्यात आणत आहे. सत्तेवर येण्यासाठी जनतेला खोटी आश्वासने दिली. आता जनता विद्यमान सरकारच्या कारभाराला कंटाळली असून काँग्रेसकडे आशेनी पाहत आहे. येथील नवनिर्मित महात्मा गांधी भवन कार्यकर्त्यांना उर्जा देणारे ठरणार आहे, असे प्रतिपादन विधानसभेतील काँग्रेसचे उपगटनेते आमदार विजय वडेट्टीवार यांनी येथे बुधवारी केले.शहर काँग्रेस कमिटीच्या वतने वस्ती भागातील सिंधीभवन जवळील महात्मा गांधी भवनाचे नुतनीकरण करण्यात आले. यावेळी नवीन वास्तचे लोकार्पण त्यांच्या हस्ते करण्यात आले. दरम्यान कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना आमदार वडेट्टीवार बोलत होते. यावेळी मंचावर प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष प्रकाश देवतळे, डॉ. रजनी हजारे, घनश्याम मुलचंदानी, अब्दुल करीम, हरिश कोत्तावार, माजी जि.प. अध्यक्ष प्रकाश पाटील मारकवार, शिवा राव, शाकीर मलक, देवेंद्र आर्य, प्राणेश अमराज, नगरसेवक भास्कर माकोडे, अफसाना सय्यद यांची उपस्थिती होती.यावेळी बल्लारपूर तालुका काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून कोठारी येथील विनोद बुटले यांना विजय वडेट्टीवार व प्रकाश देवतळे यांनी नियुक्ती पत्र प्रदान करून गौरविण्यात आले. प्रास्ताविक अब्दूल करीम यांनी, संचालन नरेश मुंधडा तर आभार अनिल खरतडे यांनी मानले. यावेळी कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.नेताजींना विसरलेसदर कार्यक्रमाच्या दिवशी नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती होती. देशाच्या जडणघडणीमध्ये नेताजींचे मोठे योगदान आहे. काँग्रेस पक्षाच्या विकासासाठी नेताजींचा त्याग असूनही यावेळी त्यांचा विसर पडल्याचा कार्यकर्त्यांमध्ये सूर होता.
गांधी भवनातून काँग्रेस कार्यकर्त्यांना ऊर्जा मिळणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 26, 2019 1:01 AM
काँग्रेस पक्ष सर्वसामान्याचा आहे. काँग्रेसची विचारसरणी धर्मनिरपेक्ष असल्याने सर्व घटकांना न्याय देणारा आहे. प्रस्थापित केंद्र व राज्य सरकार सामाजिक धुर्वीकरण करून सामाजिक सलोखा धोक्यात आणत आहे. सत्तेवर येण्यासाठी जनतेला खोटी आश्वासने दिली.
ठळक मुद्देविजय वडेट्टीवार : बल्लारपूर येथे नुतनीकरण वास्तूचे लोकार्पण