चंद्रपूर : कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी मतभेद विसरून पक्ष संघटनेच्या कामाला लागावे. हे काम करीत असताना सदैव जनतेच्या पाठीशी उभे राहावे, असे आवाहन माणिकराव ठाकरे यांनी येथे केले. चंद्रपूर जिल्हा कॉंग्रेस कमिटी शहर व ग्रामिणच्यावतीने शेतकऱ्यांच्या मदतीसाठी अभियान राबविण्याच्या दृष्टीने येथील कॉंग्रेस सेवादल कार्यालयात सभेचे आयोजन केले होते. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर माजी मंत्री नितीन राऊत, आमदार विजय वडेट्टीवार, माजी आमदार सुभाष धोटे, माजी आमदार एस.क्यू. झामा, माजी जिल्हाध्यक्ष विनायक बांगडे, चंद्रपूर जिल्हा कॉंग्रेस कमिटी (ग्रामीण) चे अध्यक्ष नंदू नागरकर, चंद्रपूर जिल्हा कॉंग्रेस कमिटी (शहर)चे अध्यक्ष प्रकाश देवतळ आदी यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी नंदू नागरकर यांनी प्रास्ताविकातून चंद्रपूर जिल्ह्यातील ंअनेक समस्या मांडल्या.याप्रसंगी माजी मंत्री नितीन राऊत, आमदार विजय वडेट्टीवार यांनीही मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे संचालन अॅड. विजय मोगरे यांनी केले. यावेळी केशव रामटेके, श्याम राजुरकर, निखिल धनवलकर, शाकीर मलक, दीपक कटकोजवार, विरेंद्र लोढीया, राजू सारीडेक, संजय रत्नपारखी, पंकज टापरे, सागर वानखेडे, सुलेमान अली, सुरेश दुर्शेलवार, राजा काझी, वैशाली गेडाम, अन्वर अली मुन्ना शहा, दिनेश शेडमाके, प्रमोद कावळे, सुनीता धोटे आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)
कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी जनतेच्या पाठीशी राहावे-माणिकराव ठाकरे
By admin | Published: January 17, 2015 10:56 PM