लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रांताध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांची जनसंघर्ष यात्रा शनिवारी चंद्रपूर जिल्ह्यात दाखल होत आहे. या यात्रेचे स्वागत करण्यासाठी काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी ठिकठिकाणी जय्यत तयारी पूर्ण केली आहे. चंद्रपूरसह चिमूर, वरोरा येथे यात्रेच्या आगमनानंतर जाहीर सभा आयोजित करण्यात आल्या आहेत.या संघर्ष यात्रेत प्रदेश काँग्रेसचे प्रांताध्यक्ष खा. अशोक चव्हाण, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, विधान परिषदेचे काँग्रेसचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव माजी मंत्री बाळासाहेब थोरात, विधान परिषदेचे माजी उपसभापती माणिकराव ठाकरे, आ. आरिफ नसीम खान, विधान परिषदेचे उपगटनेते आ. विजय वडेट्टीवार, काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे, कमिटीचे शहर अध्यक्ष नंदू नागरकर उपस्थित राहणार आहेत.चंद्रपूर येथे जनसंघर्ष यात्रेचे आगमन होताच कोहीनूर क्रीडांगणाच्या पटांगणावर सायंकाळी ६ वाजता जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे. यावेळी बाईक रॅलीही काढण्यात येणार आहे. या सभेसाठी स्थानिक पदाधिकाºयांनी जय्यत तयारी केली आहे.तत्पूर्वी जनसंघर्ष यात्रेचे दुपारी २.१५ वाजता चिमूर येथे आगमन होईल. त्यानंतर तिथे जाहीर सभा होणार आहे. ही सभा आटोपताच सायंकाळी ५ वाजता जनसंघर्ष यात्रा वरोरा येथे येईल. याठिकाणी यात्रेचे जल्लोषात स्वागत करण्यात येणार आहे.रविवारी ब्रह्मपुरीत सभारविवारी सकाळी जनसंघर्ष यात्रा गडचिरोली येथे जाणार आहे. त्यानंतर दुपारी २ वाजता ही यात्रा ब्रह्मपुरी येथे जाईल. ब्रह्मपुरी येथे दुपारी २ ते ४ वाजेपर्यंत जाहीर सभेचे आयोजन केले आहे. आ. विजय वडेट्टीवार या आयोजनासाठी स्वत: लक्ष ठेवून आहेत.
काँग्रेसची जनसंघर्ष यात्रा आज चंद्रपुरात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2019 10:23 PM
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रांताध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांची जनसंघर्ष यात्रा शनिवारी चंद्रपूर जिल्ह्यात दाखल होत आहे. या यात्रेचे स्वागत करण्यासाठी काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी ठिकठिकाणी जय्यत तयारी पूर्ण केली आहे. चंद्रपूरसह चिमूर, वरोरा येथे यात्रेच्या आगमनानंतर जाहीर सभा आयोजित करण्यात आल्या आहेत.
ठळक मुद्देजय्यत तयारी : चंद्रपूर व चिमुरात सभा, वरोऱ्यात स्वागत