ंचंद्रपूर : भाजपाप्रणित केंद्र सरकारच्या स्थापनेला दोन वर्षे पूर्ण झाल्यानिमीत्त एकीकडे भाजपा सरकार आनंदोत्सव साजता करीत असताना चंद्रपुरात काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी निदर्शने आणि नारेबाजी केली. चंद्रपूर जिल्हा शहर काँग्रेस कमेटीच्या वतीने गुरूवारी जटपुरा गेटवर सरकारच्या विरोधात पदाधिकारी आणि कार्यकत्यारंनी नारेबाजी करीत विरोध दर्शविला. सरकारच्या चुकीच्या धोरणांचा यावेळी निषेध करून निर्शने केली.राजकारण, देशाची आंतरराष्ट्रीय स्तरावर बदनामी, आर्थिक असफलता, धार्मिक दहशदवादाला आश्रय आदी विषयांचा यात समावेश होता.या संदर्भात आपली भूमिका मांडण्यासाठी चंद्रपूर महानगर अध्यक्ष नंदू नागरकर यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत सरकारच्या धोरणांचा निषेध नोंदविला. ते म्हणाले, भाजपा सरकारने ‘भारत माता की जय’ या घोषणेमुळे विवाद निर्माण केला, लव जिहाद, घर वापसी, बीफ बॅन आदी मुद्यांना प्रोत्साहन देवून अल्पसंख्यांक समाजाच्या मनात भीती निर्माण केली. विदेशातून काळा पैसा परत आणणे, महागाईवर नियंत्रण, शेतकऱ्यांच्या समस्या, दुष्काळावर मात या बाबतीत हे सरकार मागे पडले. पत्रकार परिषदेला काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष विनायक बांगडे, सुनीता लोढीया, सुभाषसिंग गौर आदी प्रामुख्याने उपस्थित होते. (जिल्हा प्रतिनिधी)
सरकारच्या विरोधात काँग्रेसची निदर्शने
By admin | Published: May 27, 2016 1:11 AM