आज अन्नत्याग सत्याग्रहाचा नववा दिवस असून, इको-प्रोचे अध्यक्ष बंडू धोतरे रुग्णालयात दाखल आहेत. रामाळा तलाव प्रदूषणमुक्त करण्यास खोलीकरण व सौंदर्यीकरणाबाबत सोमवारी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्यासोबत झालेल्या चर्चेनुसार रामाळा तलाव संवर्धनाची कामे दोन टप्प्यात होण्याची गरज आहे. तसा प्रस्तावसुद्धा पर्यावरण व पर्यटन मंत्रालयास पाठवाविण्यात यावा. मात्र, ज्या मागण्यांना घेऊन रामाळा तलाव संवर्धनाकरिता सुरू असलेले अन्नत्याग सत्याग्रह आता जनआंदोलन झाले असून, सर्वप्रथम खोलीकरण आणि नाले वळती करण्यास नाले बांधकाम करण्यास प्राधान्य देण्याची विनंती मागणी बंडू धोतरे यांनी केली आहे.
राज्य शासनाकडून ५०-६० कोटीचा निधी एकट्या रामाळा तलावास मिळणे शक्य नाही. रामाला तलाव जलप्रदूषणाने शहरातील जलप्रदूषण चिंतेची बाब झाली आहे. शहरातील प्रदूषणात प्रचंड मोठी वाढ झाली आहे. भूजलाचासुद्धा अपव्यय होत आहे. करिता पर्यावरणाचे संतुलन राखण्यास अस्तित्वास असलेल्या जलस्त्रोताचे संवर्धन करणे क्रमप्राप्त आहे. याकरिता रामाळा तलावाचे संवर्धन खनिज विकास निधीतून करणे गरजेचे आहे, असे इको-प्रोचे अध्यक्ष बंडू धोतरे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना पाठविलेल्या निवेदनात म्हटले आहे.
बाॅक्स
धमेंद्र लुनावट यांचे अन्नत्याग
रामाळा तलावाच्या संवर्धनासाठी आंदोलन सुरू असून बंडू धोतरे यांची प्रकृती बिघडल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, आता धमेंद्र लुनावत यांनी अन्नत्याग आंदोलन सुरु केले आहे. आंदोलनाला विविध राजकीय, सामाजिक संस्थांनी पाठिंबा दिला आहे.