ब्रह्मपुरी: संविधान कोणत्याही धर्माचा पुरस्कार करत नाही. देशाला संगठीत करणारे बलाढ्य संविधान डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला दिली असल्याने भारतीय संविधान देशाला एकात्म ठेवण्यास सक्षम असल्याचे उद्गार ज्येष्ठ आंबेडकरी विचारवंत प्रा.देविदास घोडेस्वार यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय आयोजित संविधानदिन समारोह कार्यक्रमाच्या प्रसंगी गुरूवारी व्यक्त केले आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मारोतराव कांबळे, प्रमुख अतिथी नानकजी रामटेके, माजी आयएएस अधिकारी तथा संस्थेचे सचिव प्रा. देवेश कांबळे, एस. के. कांबळे, सिग्धा कांबळे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अझीझूल हक उपस्थित होते.कार्यक्रमाची सुरुवात तथागत गौतम बुद्ध, ज्योतिराव फुले, व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करुन करण्यात आली. संविधान दिन हा भारतीयांच्या मुक्तीचा दिवस असल्याचे यावेळी नानक रामटेके यांनी सांगितले. मारोतराव कांबळे यांनीही विचार व्यक्त केले. प्रास्ताविक व पाहुण्यांचा परिचय प्रा. देवेश कांबळे, संचालन प्रा. जगदिश मेश्राम तर आभार प्राचार्य अझीझूल हक यांनी मानले. कार्यक्रमाला शहरातील निमंत्रित मंडळी, प्राध्यापक, शिक्षक बहुसंख्येनी उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)
संविधान देशाला एकात्म ठेवण्यास सक्षम- घोडेस्वार
By admin | Published: November 27, 2015 1:22 AM