लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : भारताचे व्यवहार नीट चालण्यासाठी संविधान निर्मिती झालेली आहे. त्यामुळे प्रत्येकांनी कायद्याच्या चौकटीतच व्यवहार केले पाहिजे. कुटुंबातून बालकांवर हिंसाचार वाढत चाललेले आहे. अशा वेळेत न्याय मागून बालके सुरक्षित होऊ शकतात, असे प्रतिपादन अॅड. पाथर्डे यांनी केले.चांदा शिक्षण प्रसारक मंडळ, चंद्रपूरद्वारा संचालित जनता महाविद्यालय, चंद्रपूर येथील राष्टÑीय सेवा योजना विभाग व जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने संस्थेचे सचिव प्राचार्य डॉ. अशोक जीवतोडे व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एम. सुभाष यांच्या मार्गदर्शनात महाविद्यालयाच्या सभागृहात कायदेविषयक शिबिर पार पडले. यावेळी ते बोलत होते.कार्यक्रमाला अध्यक्षस्थानी कला शाखेचे उपप्राचार्य प्रा. के. सी. धानोरकर होते. तर मंचावर दुसरे सह दिवाणी न्यायाधीश (वरिष्ठस्तर) तथा जिल्हा विधी सेवा प्राधीकरणाचे प्रभारी सचिव सी. आर. बलवानी, राष्टÑीय सेवा योजना अधिकारी डॉ. मिलिंद जांभूळकर, अॅड. वर्षा जामदार, अॅड. पाथर्डे, महिला सेलच्या अध्यक्षा डॉ. अनिता हुडा, डॉ. वाय. वाय. दुधपचारे उपस्थित होते.१८ वर्षाखालील बालक तर त्यावरील प्रौढ, असा कायद्याने भेद केलेला आहे. कुटुंबातील बालके बिघडू नये, असे प्रयत्न केले पाहिजे. बालकांना सर्व संधी मिळाल्या पाहिजे. न्यायाच्या संघर्षात सापडलेला बालक सामाजिक परिस्थितीचा बळी असतो, असे मत अॅड. वर्षा जामदार यांनी बालकांचे हक्क या विषयावर मार्गदर्शन करताना व्यक्त केले.बेटी बचाओ, बेटी पढाओ, या विषयावरील ‘मुझे आवाज उठाने दो’ ही प्रेरणादायी कविता सी. आर. न्यायाधीश बलवाणी यांनी उपस्थितांना ऐकविली. मुले वडीलांच्या विरोधात संपत्तीसाठी केस दाखल करतात. मात्र मुली तसे करीत नाही. जी स्त्री जगाचा उध्दार करते, तिला गर्भात मारणे, भ्रृण हत्या करणे कितपत चांगले आहे ?या मार्गदर्शन शिबिराला एकाही व्यक्तीने सकारात्मक प्रतिसाद दिला तर या शिबिराची यशस्वीता ठरेल, असे मत व्यक्त केले.
भारताचे व्यवहार नीट चालण्यासाठी संविधान निर्मिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 03, 2017 1:17 AM
भारताचे व्यवहार नीट चालण्यासाठी संविधान निर्मिती झालेली आहे. त्यामुळे प्रत्येकांनी कायद्याच्या चौकटीतच व्यवहार केले पाहिजे.
ठळक मुद्देपाथर्डे यांचे प्रतिपादन : कायदेविषयक मार्गदर्शन शिबिर