शहरं
Join us  
Trending Stories
1
संजय शिरसाट यांच्या लेकाच्या वाहनावर हल्ला; उद्धव ठाकरे गटाच्या उमेदवारावर आरोप
2
बारामतीत हाय व्होल्टेज सामना: अजित पवारांनी बजावला मतदानाचा हक्क, मताधिक्याविषयी म्हणाले...
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : अजित पवारांसह अनेकांनी बजावला मतदानाचा हक्क; अनेक ठिकाणी ‘ईव्हीएम’मध्ये बिघाड!
4
A.R.Rahman divorce: "आम्हाला वाटलं होतं ३० वर्ष पूर्ण करू, पण...", ए. आर. रहमानचा २९ वर्षांचा संसार मोडला
5
मुंबई, ठाण्यात ठाकरे, शिंदेंची प्रतिष्ठा पणाला! ठाकरे बंधूंच्या मतदारसंघांकडे लक्ष
6
पराभव दिसू लागल्यानेच मविआकडून तावडेंवर हल्ला; देवेंद्र फडणवीसांचा आरोप
7
जनसुराज्य शक्ती पक्षाचे उमेदवार पादेश्वर महाराजांच्या गाडीवर दगडफेक; महाराज जखमी
8
नालासोपाऱ्यात कॅश ड्रामा! पैसे वाटपाच्या आरोपांवरून विनोद तावडेंना घेरले; तीन गुन्हे दाखल
9
जगभर : मुजतबा खामेनेई : ‘शांत’ डोक्याचा ‘सुप्रीम लीडर’!
10
Vaibhav Suryavanshi: १३ वर्षांच्या मुलाला उघडेल आयपीएलचं दार?
11
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: सकाळची वेळ नवीन कार्यारंभासाठी अनुकूल!
12
टक्का वाढला पाहिजे..! सर्वोच्च अधिकार नाकारून कसे चालेल...?
13
Maharashtra Assembly elections 2024: कोणत्या मुद्द्यांभोवती फिरली प्रचारचक्रे ? 
14
विशेष लेख: ‘अर्बन नक्षल’- भाजपच्या मानगुटीवरचे भूत 
15
नरेंद्र मोदी, राहुल गांधी, ठाकरे करणार कोथरुडात मतदान; नामसाधर्म्यामुळे प्रशासनाची धावपळ
16
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतदान; काँग्रेस-भाजपमध्ये लढत 
17
झारखंड : दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला; अंतिम टप्प्याचे आज ३८ जागांवर मतदान
18
वाशिम येथे मतदानास सुरुवात; मतदारांना मिळतेय सहकार्य
19
विशेष लेख: हवामानबदल रोखण्याचा ‘खर्च’ कोण उचलणार, यावर खडाजंगी
20
वरळीतील १,३३९ मतदारांच्या सोयीसाठी; चक्क उड्डाणपुलाखाली दोन मतदान केंद्रे

बार्टीतर्फे संविधान सप्ताह व प्रबोधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 06, 2020 4:30 AM

बांबू मिळत नसल्याने कामगार अडचणीत मूल : तालुक्यात बुरड कामगारांची संख्या बरीच आहे. मात्र, वन विभागाकडून निस्तार हक्काद्वारे ...

बांबू मिळत नसल्याने कामगार अडचणीत

मूल : तालुक्यात बुरड कामगारांची संख्या बरीच आहे. मात्र, वन विभागाकडून निस्तार हक्काद्वारे पुरेसा बांबू मिळत नाही. त्यामुळे कारागीर व शेतकऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. वनविभागाने ही समस्या सोडवावी, अशी मागणी बुरड बांधवाकडून होत आहे.

रस्ते, नाल्यांचे बांधकाम अजूनही अर्धवट

चंद्रपूर : बंगाली कॅम्प परिसरातील श्यामनगर, इंदिरानगर परिसरात मूलभूत सुविधांचा अभाव आहे. रस्ते, नाल्यांचे बांधकाम अर्धवट आहे. पावसाळ्यातील रस्त्यावर पाणी साचून राहते. त्यामुळे स्वच्छता मोहीम राबविण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

कुंभार समाजासाठी मंडळ स्थापन करावे

चिमूर : कुंभार समाजासाठी संत गोरोबा काका माती कला बोर्डाची स्थापना करावी, कुंभार समाजाचा एनटी प्रवर्गात समावेश करावा, मातीवर आकारली जाणारी रॉयल्टी संपूर्ण माफ करावी, वाहतूक व विटाभट्टी परवान्यातील जाचक अट रद्द करावी, कुंभार समाजाला ओळखपत्रावर परवाना व जळावू लाकूड देण्याची मागणी कुंभार समाज महासंघाने केली आहे.

दूरसंचार सेवा ग्राहकांसाठी डोकेदुखी

चिमूर : येथील दूरसंचार विभागाची सेवा अनियमित असल्याने नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. नेरी येथे एक राष्ट्रीयीकृत बँक, सीडीसीसी बँक शाखा, तीन ते चार पतसंस्था, शाळा, कॉलेज व महाविद्यालय आहेत. मात्र, सेवा योग्य नसल्याने ग्राहक हैराण आहेत.

वर्दळीच्या चौकात गतिरोधक उभारा

गडचांदूर : शहरातून गेलेल्या राजुरा-गोविंदपूर-आदिलाबाद राज्य महामार्गाला राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा मिळाला आहे. गडचांदूर रेल्वे क्रासिंग ते अल्ट्राटेक चौकापर्यंत महामार्गाचे चौपदरीकरण करण्यात आले. मात्र गतिरोधक नसल्याने हा महामार्ग धोकादायक ठरला आहे.

या महामार्गावर असलेल्या राजीव गांधी चौक (पेट्रोल पंप) संविधान चौक (बसस्थानक) व वीर बाबुराव शेडमाके चौक (सावित्रीबाई फुले विद्यालयजवळ) गतिरोधक नसल्याने वाहने सुसाट वेगाने चालविली जातात. हा महत्वाचा मार्ग आहे. त्यामुळे अपघात होत आहेत. हा प्रमुख मार्ग असल्याने नागिरकांना याच दिशेने जावे लागते. त्यामुळे पोलीस व बांधकाम विभागाने समस्येकडे लक्ष देऊन तिनही चौकात गतिरोधक उभारून वाहतूक शिपाई नियुक्ती करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

जिल्ह्यातील सौर दिवे दुरुस्त करावे

चंद्रपूर : शासनाने लाखो रुपये खर्च करून जिल्ह्यातील विविध गावांत सौर पथदिवे सुरु केले. मात्र यातील अर्धेअधीक सौरदिवे बंद अवस्थेत आहे. दरम्यान, काही सौर दिव्यांच्या बॅटरी चोरट्यांनी लंपास केल्या आहेत. संबंधित विभागाने याकडे लक्ष देवून सौरदिव्यांची दुरुस्ती करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

नव्या कनिष्ठ महाविद्यालयाची मागणी

कोरपना : तालुक्यातील कवठाळा व पार्डी येथे कनिष्ठ महाविद्यालय नसल्याने विद्यार्थ्यांची शैक्षणिक गैरसोय होत आहे. या विद्यार्थ्यांना गडचांदूर किंवा कोरपना येथे जाऊन पुढील शिक्षण पूर्ण करावे लागते. त्यामुळे परिसरात कनिष्ठ महाविद्यालयाची स्थापना करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

शासकीय कार्यालये कोरपना येथे आणावी

कोरपना : तालुका वैद्यकीय अधिकारी, सार्वजनिक बांधकाम उपविभाग, शाखा अभियंता पकडीगुडम सिंचन प्रकल्प, हिवताप निर्मूलन आरोग्य उपपथक कार्यालये गडचांदूर व उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय नांदा फाटा येथे आहे. सदर कार्यालय एकाच ठिकाणी कामे होण्यासाठी कोरपना मुख्यालय असणे आवश्यक आहे. त्यामुळे या कार्यालयाचे कोरपना येथे स्थानांतर करण्याची मागणी केली जात आहे.

रात्री उशिरापर्यंत चालतो व्यवसाय

चंद्रपूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने शिथिलता देत रात्री ९ वाजेपर्यंत दुकाने सुरु ठेवण्याची परवानगी दिली आहे. मात्र शहरातील काही व्यावसायिक रात्री उशिरापर्यंत आपले दुकान उघडे ठेवत असल्याने शहरातील सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित झाला आहे. याकडे पोलिसांनी लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे.

दत्तक घेऊन गावांचा विकास साधावा

चंद्रपूर : जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात उद्योग आहे. मात्र उद्योग परिसरातील गावांचा आजही पाहिजे तसा विकास झालेला नाही. त्यामुळे या उद्योगांनी गावांना दत्तक घेऊन गावांचा विकास साधावा, अशी मागणी ग्रामस्थांनी प्रशासनाकडे केली आहे. दरम्यान, चंद्रपूर, कोरपना, राजुरा, भद्रावती आदी तालुक्यात मोठ्या प्रमाणात उद्योग आहे. तर मूल, सावली, पोंभूर्णा, ब्रह्मपुरी, नागभीड या तालुक्यात अद्यापही पाहिजे तसे उद्योगच नसल्याने येथे बेरोजगारांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.

रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी

कोरपना : चंद्रपूर-कोरपना-आदिलाबाद आंतरराज्यीय व वणी मार्गाची दुरवस्था झाली आहे. रस्त्यावरील सोनुर्ली ते देवघाट, कोठोडा व वणी मार्गावरील कोरपना ते कोडशी(खुर्द) दरम्यान जागोजागी खड्डे पडले आहे. त्यामुळे या मार्गाने वाहतूक करताना वाहनाचलकांना कसरत करावी लागत आहे. याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाने लक्ष देण्याची गरज आहे.

तुकूम परिसरातील नागरिक त्रस्त

चंद्रपूर : शहरात रात्रीच्या वेळी मोकाट कुत्र्यांचा हैदोस वाढला आहे. यामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दुचाकीने जात असताना हे मोकाट कुत्रे अचानक गाडीवर झेप घेतात. यामुळे अपघातही वाढले आहेत. तुकूम परिसरात मोकाट कुत्रे मोठ्या प्रमाणात फिरत असल्याने संताप व्यक्त केला जात असून बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे.

स्वच्छता करण्याची मागणी

गोंडपिपरी : तालुक्यातील अनेक गावांमध्ये नियमित स्वच्छता होत नसल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे स्वच्छतेकडे लक्ष देण्याची मागणी केली जात आहे. देशात सगळीकडे स्वच्छता मोहीम राबविण्यात येत आहे. मात्र काही उपद्रवी नागरिकामुळे या योजनेचा बोजवारा उडताना दिसून येत आहे. त्यामुळे शहरात स्वच्छता मोहीम राबविण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

ग्रामीण भागात अवैध वाहतूक

जिवती : ग्रामीण मार्गावर अवैध वाहतुकीला ऊत आला. अवैध प्रवासी वाहतुकीमुळे अपघाताच्या घटना घडत आहेत. संबंधित विभागाने अवैध वाहतुकीवर आळा घालण्याची मागणी नागरिकांनी केली. लॉकडाऊन काळात वाहतूक बंद होती. दरम्यान, आता अवैध वाहतूक वाढली आहे.