लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : जिल्ह्यातील वरोरा तालुक्यातील मार्डा गावालगत वर्धा नदीवर महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने (एमआयडीसी) पॉवर प्लाँटसाठी बंधारा बांधलेला आहे. यावर अंदाजे ३०० कोटी रुपयांचा खर्च झाला. या धरणात आता जूनमध्येही मुबलक पाणी आहे. यामुळे उद्योगासह शेतकऱ्यांना सिंचन सुविधासाठी पाणी उपलब्ध झाले. याच धर्तीवर जिल्ह्यातील लहान-मोठ्या सर्व नद्यांवर बंधारे बांधावे, अशी मागणी माजी खासदार नरेश पुगलिया यांनी पत्रकार परिषदेत केली.आजघडीला शहरासह ग्रामीण भागात पाणी टंचाई समस्या उग्र झाली आहे. शेतकरी चिंताग्रस्त आहे. मोठी धरणे बांधण्यापेक्षा नद्यावरील बंधारे उपयुक्त ठरत आहेत. शेतकऱ्यांनी बंधाऱ्यातील पाणी स्वखर्चाने विद्युत पंप अथवा डिझेल पंप, सौर ऊर्जाद्वारा पाण्याचा सिंचनासाठी उपयोग केल्यास पाईप लाईन पंपाच्या खर्चावार व्यक्तीगतसाठी ५० टक्के तर सामूहिक गट शेतकºयांना ९० टक्के सवलत राज्य शासनाने दिल्यास शेतकऱ्यांना फायदेशीर ठरणार आहे.जिल्ह्यातील नद्यांच्या घाटावरुन लिलावाच्या माध्यामतून मोठ्या प्रमाणात रेतीचे उत्खनन केले जाते. यामुळे जिल्हा प्रशासनाला दरवर्षी २० ते २५ कोटी रुपयांचा महसूल मिळतो. जिल्ह्यातील उद्योग, महानगरपालिका, नगरपरिषद, ग्रामपंचायतीना पाण्याची आवश्यकता भासते. याद्वारे जवळपास ६० कोटीवर रुपयांचा महसूल सिंचाई विभागाला मिळतो.हा सगळा महसूल जिल्ह्यातील नद्यांमुळे मिळतो. मात्र नद्यांची देखभाल, सफाईकडे जाणिवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे. मोठमोठी धरणे बांधकामावर हजारो कोटी रुपयाचा खर्च राज्य सरकार करते. मात्र २० वर्षापर्यंत काम पूर्णत्वास जात नाही. त्यात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केला जातो. भंडारा जिल्ह्यातील इंदिरा सागर प्रकल्प (गोसीखुर्द) धरणावर आजतागायत ११ हजार कोटी रुपयांचा खर्च झाला. आत देखील सात ते आठ हजार कोटी रुपये खर्च बांधकामावर अपेक्षित असून सिंचनाचे लाभक्षेत्र फार कमी आहे. यातील भ्रष्टाचाराचे प्रकरण उच्च न्यायालयात प्रलंबित आहे, अशी माहितीही पुगलिया यांनी यावेळी दिली.यावेळी नरेश पुगलिया यांनी मार्डा येथील बंधाऱ्याची पाहणी केली व तिथेच पत्रकार परिषदेत वरील माहिती दिली. यावेळी मनपा गटनेते सुरेश महाकूलकर, देवेंद्र बेले, अॅड. अविनाश ठावरी, सुभाष माथनकर, अशोक नागापुरे, वसंत मांढरे, रामभाऊ टोंगे, प्रविण पडवेकर, मार्डाच्या सरपंच योगिता पिंपळशेंडे, प्रकाश मुथा, बंडू टिपले, गणेश चवले, शंकर जोगी आदी उपस्थित होते.जून महिन्यातही मार्डा बंधाऱ्यात मुबलक पाणीराज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार हे जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. त्यांनी वरोरा तालुक्यातील मार्डा येथील बंधाऱ्याला भेट देवून अवलोकन करावे. सोबत संबंधित अधिकाऱ्यांना घ्यावे, म्हणजे त्यांना बंधाऱ्याचे महत्व लक्षात येईल. जून महिन्यात देखील या बंधाऱ्यामुळे २० ते २५ किमी बँक वॉटर उपलब्ध आहे. वरोरा तालुक्यातील काही गावातील शेतकरी सिंचनासाठी पाण्याचा उपयोग घेत आहे. असेच बंधारे राज्य सरकारने महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ एमआयडीसी म्हाडा, उद्योग, महानगरपालिका, जिल्हापरिषद, नगरपरिषद यांच्या माध्यमातून बांधल्यास शेतीसाठी, उद्योग व पिण्याच्या पाण्याची सोय जिल्ह्यासाठी होणार असून भूजल पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे, असेही यावेळी नरेश पुगलिया यांनी सांगितले.
जिल्ह्यातील लहान-मोठ्या नद्यांवर बंधारे बांधावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 02, 2019 11:34 PM
जिल्ह्यातील वरोरा तालुक्यातील मार्डा गावालगत वर्धा नदीवर महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने (एमआयडीसी) पॉवर प्लाँटसाठी बंधारा बांधलेला आहे. यावर अंदाजे ३०० कोटी रुपयांचा खर्च झाला. या धरणात आता जूनमध्येही मुबलक पाणी आहे. यामुळे उद्योगासह शेतकऱ्यांना सिंचन सुविधासाठी पाणी उपलब्ध झाले.
ठळक मुद्देनरेश पुगलिया यांची मागणी : मार्डा येथील बंधाऱ्याची केली पाहणी