रवी रणदिवे।लोकमत न्यूज नेटवर्कब्रह्मपुरी : शासनाकडून येणारा निधी रखडल्याने ब्रह्मपुरी नगर परिषद अंतर्गत येणाऱ्या ३७५ घरांचे बांधकाम रखडले आहे. कार्यारंभाचा आदेश मिळाल्यानंतर लाभार्थ्यांनी घरकुलांचेही कामही सुरु केले होते. मात्र निधी मिळत नसल्याने त्यांना उघड्यावर राहण्याची वेळ आली आहे.सर्वांना पक्क्या घरात राहता यावे, यासाठी शासनाने आवास योजना सुरु केली. या योजनेतंर्गत शहरातील २०१८-२०१९ या वर्षात ६४२ घरकुल मंजूर झाले. सदर लाभार्थ्यांची पाहणी करून ३७५ लाभार्थ्यांना अनुदानाचे वाटप करण्यात येऊन कार्यारंभ आदेश देण्यात आला. त्यानुसार लाभार्थ्यांनी प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली. अनेकांचे घराचे बांधकाम अर्धवट झाले आहे. मात्र अनुदान मिळत नसल्याने रखडल्याने लाभार्थ्यांना धनादेशासाठी न. प. कडे चकरा माराव्या लागत आहे.अनेक लाभार्थ्यांनी आपले राहते घर पाडून तात्पुरते घर बांधून राहण्याची व्यवस्था केली. येत्या काही दिवसांत पावसाळ्याला सुरुवात होणार आहे. त्यामुळे लाभार्थ्यांची धाकधूक अधिकच वाढली आहे. घराकुलाचा धनादेश मिळेल या आशेने लाभार्थ्यांनी उधारीवर साहित्यांची खरेदी केली. दुकानदार आता वसुलीसाठी लाभार्थ्यांकडे तगादा लावत आहे. त्यामुळे घरकुलांचा प्रलंबित निधी त्वरीत देण्यात यावा, अशी मागणी घरकूल लाभार्थ्यांकडून होत आहे.पालकमंत्र्यांना साकडेलाभार्थ्यांच्या घराचे बांधकाम अर्धवट असल्याने त्यांना उघड्यावर राहण्याची वेळ आली आहे. त्यामुळे शासनाने निधीची पुर्तता करावी, व घरकूल लाभार्थ्यांना उर्वरीत धनादेश देण्यात यावे, अशी मागणी बांधकाम सभापती विलास विखार यांनी पालकमंत्र्यांकडे केली आहे.
निधीअभावी रखडले ३७५ घरकुलांचे बांधकाम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2020 5:00 AM
सर्वांना पक्क्या घरात राहता यावे, यासाठी शासनाने आवास योजना सुरु केली. या योजनेतंर्गत शहरातील २०१८-२०१९ या वर्षात ६४२ घरकुल मंजूर झाले. सदर लाभार्थ्यांची पाहणी करून ३७५ लाभार्थ्यांना अनुदानाचे वाटप करण्यात येऊन कार्यारंभ आदेश देण्यात आला. त्यानुसार लाभार्थ्यांनी प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली. अनेकांचे घराचे बांधकाम अर्धवट झाले आहे. मात्र अनुदान मिळत नसल्याने रखडल्याने लाभार्थ्यांना धनादेशासाठी न. प. कडे चकरा माराव्या लागत आहे.
ठळक मुद्देब्रह्मपुरी नगरपरिषद : धनादेशासाठी लाभार्थ्यांच्या पालिकेकडे चकरा