शहरं
Join us  
Trending Stories
1
महाविकास आघाडीच्या या कृत्याला जनता माफ करणार नाही; PM नरेंद्र मोदींचा हल्लाबोल
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :"देशाचे सहकार मंत्री कारखाने बुडवणाऱ्यांच्या प्रचाराला..."; जयंत पाटलांचा अमित शाहांना खोचक टोला
3
"पाकिस्तानचा अजेंडा देशात वाढवू नका"; पंतप्रधान मोदींचा महाविकास आघाडीला इशारा
4
"...तोपर्यंत राजकारण करत राहीन"; निवृत्तीच्या चर्चांवर शरद पवारांचं मोठं विधान
5
लेकीच्या जन्मानंतर पहिल्यांदाच रणवीर-दीपिका झाले स्पॉट, लेक दुआचीही दिसली झलक, पाहा व्हिडिओ
6
Chhagan Bhujbal मला आधीच क्लीनचीट मिळालेय, पुन्हा तुरुंगात जाण्याची भीती नाही; छगन भुजबळांकडून आरोपांचा इन्कार
7
Fact Check:डोनाल्ड ट्रम्प यांच्या भाषणात PM मोदींच्या नावाची घोषणाबाजी झाल्याचा दावा खोटा
8
आता याचं काय करायचं? KL राहुल विचित्र पद्धतीने झाला बोल्ड; चाहत्यांनी लावला डोक्यालाच हात
9
अजित पवारांचे सूर बदलले, बटेंगे तो कटेंगेला थेट उत्तर; बारामतीत मला कुणाची सभा नको
10
स्वामीभक्त शंकर महाराज यांचे मद्यपान, धूम्रपान हे फक्त बाह्यरूप; पहा त्यांचे अंतरंग!
11
उर्फी जावेदने उडवली तृप्ती डिमरीच्या डान्सची खिल्ली, म्हणाली, "इतकी छान अभिनेत्री पण..."
12
अनिल अंबानींना मोठा झटका, रिलायन्स पॉवरचे शेअर्स आपटले; ३ वर्षांच्या बॅननं वाढवलं टेन्शन
13
जम्मू-काश्मीर विधानसभेत पुन्हा गदारोळ, भाजप आणि एनसी आमदारांमध्ये खडाजंगी
14
जान्हवी कपूर पोहोचली हैदराबादच्या अंजनेय स्वामी मंदिरात, अर्धा तास केली विधीवत पूजा
15
विजय वडेट्टीवार यांच्या नामनिर्देशनपत्राला हायकोर्टात आव्हान, आज सुनावणी होणार
16
Ola ची शानदार ऑफर, Ather आणि TVS चं वाढलं टेन्शन; 15 हजार रुपये मिळतेय स्वस्त!
17
मावळमध्ये सुनील शेळकेंच्या अडचणींत भर; आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल!
18
"आधी मोदी-शाह-अदाणी यांना साफ करा"; संजय राऊतांचे राज ठाकरेंना आव्हान
19
राहुल गांधीच्या संविधान सन्मान कार्यक्रमाकडे ओबीसी संघटनांनी फिरवली पाठ!
20
"ईडीपासून सुटकेसाठी भाजपसोबत आलो"; भुजबळांच्या नावाने पुस्तकात दावा, राजकीय वर्तुळात चर्चा

शहिदांच्या मानवंदनेसाठी होणार चिमूर जिल्ह्याची निर्मिती

By admin | Published: July 23, 2016 1:45 AM

देशाच्या स्वातंत्र लढ्यामध्ये इंग्रजाविरूद्ध ‘चले जाव’ आंदोलन करून १६ आॅगस्ट १९४२ रोजी इंग्रजांविरूद्ध मोठे आव्हान उभे करण्यात आले.

जिल्ह्याची मागणी ३६ वर्षे जुनी : सरकारच्या धोरणाने चिमूरकरांच्या आशा पल्लवित राजकुमार चुनारकर चिमूर देशाच्या स्वातंत्र लढ्यामध्ये इंग्रजाविरूद्ध ‘चले जाव’ आंदोलन करून १६ आॅगस्ट १९४२ रोजी इंग्रजांविरूद्ध मोठे आव्हान उभे करण्यात आले. या आंदोलनात अनेक क्रांतिकारक, महिला शहीद झाल्या. या आंदोलनांमुळे चिमूर शहर तीन दिवस स्वतंत्र होते. या स्वातंत्र्याच्या आंदोलनाची मुहूर्तमेढ चिमूर शहरातून रोवली गेली. त्यानंतर देशभरात आंदोलन होऊन भारत स्वतंत्र झाला. चिमूरकरांच्या क्रांतिकारी कामगिरीची दखल घेऊन चिमूरला क्रांती जिल्हा घोषित करावा, ही मागणी ३६ वर्षे जुनी आहे. शासनाच्या नविन जिल्हे निर्माण करण्याच्या हालचालींना वेग आला असून जिल्हा निर्मितीला मतदार संघाच्या निकषात चिमूर शहर बसत असल्याने व स्वातंत्र्य लढ्यातील कामगिरी विचारात घेऊन चिमूरला जिल्हा घोषित करून शहिदांना मानवंदना देणार काय? तसेच शासनाच्या जिल्हा निर्मितीसाठी मतदारसंघाचा निकष ठेवल्याने चिमूरकरांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. देशात इंग्रज राजवट असताना इंग्रजाविरूद्धचे पहिले आंदोलन चिमूर शहरात १६ आॅगस्ट १९४२ रोजी झाले होते. त्याद्वारे देशात स्वातंत्र्य लढ्याची ‘मुहूर्तमेढ’ चिमुरातून रोवल्या गेली. त्यासाठी अनेकांनी आपली प्राणाची आहुती दिली. तसेच इंग्रज राजवटीत चिमूर जिल्हा असल्याचे स्वातंत्र्यसंग्राम सैनिक दाखले देत आहेत. मात्र स्वातंत्र्यानंतर चिमूर जिल्ह्याचा दर्जा काढण्यात आला. यापूर्वी चिमूरला जिल्ह्याचा दर्जा असल्याने शासनाचे लोकसभा क्षेत्रसुद्धा चिमूरच्या नावावर होते. याचाच अर्थ चिमूर हे जिल्ह्याचे ठिकाण होते, हे यावरून सिद्ध होते. कारण आजही प्रत्येक जिल्हा स्थळ हे लोकसभेचा मतदारसंघ आहे. स्वतंत्र भारतात चिमूरला जिल्हा न दिल्याने चिमूर जिल्हा घोषित करावा, यासाठी ३६ वर्षांपासून शासन दरबारी नागरिक निवेदन, आंदोलन करीत आहेत. आजही जिल्ह्यासाठी काहीही करण्याची तयारी चिमूरकर करीत आहेत. चिमूर जिल्हा निर्मितीसाठी १९८० पासून धरणे, आंदोलन, मोर्चे, उपोषण करत अनेकदा शिष्टमंडळाद्वारे मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आली आहेत. मात्र राजकीय पुढाऱ्यांनी आज करू, उद्या करू, असे आश्वासनेच दिली आहेत. चिमूर क्रांती जिल्हा निर्मितीचा प्रश्न चिमूर व तालुक्यातील नागरिकांसाटी भावनिक प्रश्न असल्याने या मागणीकरिता सर्वपक्षीय मोर्चाचे आयोजन ५ जानेवारी २००० रोजी करण्यात आले होते. त्यामध्ये हजारो नागरिकांच्या जमावाने तहसील कार्यालयाची राख रांगोळी केली होती. या आंदोलनामध्ये अनेकांना तुरुंगामध्ये डांबण्यात आले होते. असा हा आंदोलनाचा क्रम आजही सुरूच आहे. शिवसेनेच्या वतीने जिल्हा निर्मितीसाठी मोर्चा काढण्यात आला. प्रशासकीय भवनावर ‘चिमूर क्रांती जिल्हा’ असा प्रतिकात्मक फलक लावला गेला. या दरम्यान तोडफोड झाली. त्यामध्ये गजानन बुटकेसह अनेकांना जेलमध्ये जावे लागले. चिमूर जिल्हा निर्मितीसाठी सर्वपक्षिय कृती समिती कार्यरत आहे. या समितीकडून प्रत्येक अधिवेशनात मुख्यमंत्री व महसूल मंत्री यांना निवेदन देऊन चर्चा करण्यात येत आहे. या समितीमध्ये स्वातंत्र्य सैनिकांसह सर्वच राजकीय पुढाऱ्यांचा सहभाग असतो. या समितीचे कार्य नरेंद्र बडे (राजूरकर) यांच्या अध्यक्षतेखाली सुरू आहे. चिमूरकरांनी जिल्ह्याच्या मागणीसाठी अनेक राजकीय पुढाऱ्याच्या सभा उधळल्या आहेत. भाजपाच्या विदर्भ वेगळा करण्यासाठी असलेल्या सकारात्मक भूमिकेमुळे व राज्यात २२ जिल्हे निर्मितीबाबत शासन स्तरावर सुरू असलेल्या हालचालीमुळे नुकत्याच शासनाने जिल्हा निर्मितीसाठी मतदार संघाना निकष लावल्याने चिमूर हे लोकसभा मतदार संघासह विधानसभा क्षेत्रही आहे. तर भाजपाची देशात व राज्यात भाजपाची सत्ता असल्याने व चिमूरचे आमदार कीर्तीकुमार भांगडिया हे भाजपाचे असल्याने चिमूरचा जिल्हा प्रश्न सभागृहात मांडून नक्कीच जिल्हा निर्मिती करून शहिदांना मानवंदना देण्यासाठी प्रयत्न करीत असल्याची विश्वसनीय माहिती आहे. त्यामुळे येत्या काळात चिमूर क्रांती जिल्हा निर्मितीसाठी शासन शहिदांना मानवंदना देणार असल्याचे राजकीय वर्तुळासह सर्वसामान्यांकडून बोलल्या जात आहे.