शहरं
Join us  
Trending Stories
1
"लष्कर-ए-तैयबाचा सीईओ बोलतोय...", रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला धमकीचा फोन
2
साहेबांच्या कारकिर्दीपेक्षा अधिक कामे माझ्या काळात; अजित पवारांचा दावा
3
मोठा हलगर्जीपणा! रुग्णालयात मृत्यूनंतर रुग्णाचा डोळाच गायब; डॉक्टर म्हणतात, उंदराने कुरतडला
4
लुटेरी दुल्हन! लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी नवरीने रचला भयंकर कट; मौल्यवान वस्तू घेऊन गायब
5
Navneet Rana : नवनीत राणांच्या प्रचारसभेत मोठा राडा; अंगावर खुर्च्या फेकण्याचा प्रयत्न! 
6
"उद्या ते असेही म्हणतील की, मी जातगणनेस विरोध करतो"; राहुल गांधींचे भाजपवर टीकास्त्र
7
मणिपूरमध्ये हिंसाचाराचा आगडोंब, ३ मंत्री आणि ६ आमदारांच्या घरांवर हल्ला, ५ जिल्ह्यांत संचारबंदी 
8
Chikhli Vidhan sabha 2024: तुल्यबळ वाटणारी लढत अखेरच्या टप्प्यात घेतेय वेगळे वळण!
9
मैत्रीसाठी काहीपण! अक्षय कुमारसाठी धावून आला अजय देवगण, दिग्दर्शित करणार सिनेमा
10
निशाणी आहे चपला; घालायच्या कशा?; उमेदवाराचा सवाल, निवडणूक आयोगाने दिले उत्तर
11
भाजपने अनेक राज्यांत भ्रष्टाचारातून सत्ता मिळवली, मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचा मोठा आरोप
12
Mumbadevi Vidhan Sabha 2024: शायना एन.सी. विरुद्ध अमीन पटेल; गड राखण्याचे काँग्रेससमोर आव्हान! 
13
Maharashtra Election 2024 Live Updates: बारामती हेलिपॅडवर निवडणूक आयोगाकडून शरद पवारांच्या बॅगेची तपासणी
14
योगी आदित्यनाथ यांची आज कोल्हापुरात सभा, तपोवन मैदान सभेसाठी सज्ज
15
Maharashtra Election 2024: जातीय दुभंगाला सोयाबीनचा तडक! मराठवाड्यातील लढतींचा लक्ष्यवेध
16
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
17
इस्राइलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या निवासस्थानावर बॉम्बहल्ला
18
"मराठा समाजाला आरक्षण आमच्या सरकारनेच दिले"; रावसाहेब दानवे यांची विशेष मुलाखत   
19
Maharashtra Vidhan Sabha 2024: 'भाजपच्या बोलण्यातून दिसतेय भेदरलेली स्थिती'; सचिन पायलट यांचा दावा
20
आजचे राशीभविष्य - १७ नोव्हेंबर २०२४, आर्थिक लाभाचा़ दिवस, घरात शांतता व आनंदाचे वातावरण राहील

वीज बिलावरून ग्राहक व वीज कंपनीत बेबनाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2018 11:12 PM

महावितरण कंपनीने वीज मीटर फॉल्टी लावल्याने चुकीचे बिल येत आहे. यासंदर्भात वारंवार तक्रार करूनही दुरूस्ती करण्यात आली नाही, असा आरोप करून स्रेहनगर येथील भाऊराव देवाजी कोरडे यांनी शुक्रवारपासून चंद्रपूर परिमंडळ कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले.

ठळक मुद्देग्राहकाचे उपोषण सुरूच : वीज कंपनीने चुकीचे बिल पाठविल्याचा आरोप

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : महावितरण कंपनीने वीज मीटर फॉल्टी लावल्याने चुकीचे बिल येत आहे. यासंदर्भात वारंवार तक्रार करूनही दुरूस्ती करण्यात आली नाही, असा आरोप करून स्रेहनगर येथील भाऊराव देवाजी कोरडे यांनी शुक्रवारपासून चंद्रपूर परिमंडळ कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले.भाऊराव कोरडे यांनी निवेदनात म्हटले की, वीज कंपनीच्या रामनगर वितरण केंद्राने मार्च २०१० ला मीटर लावून दिले. त्या महिन्यापासूनच मीटर फॉल्टी होते. त्यामुळे हे मीटर वेगाने फिरत असल्याने महावितरण कंपनीने जास्तीचे बिल पाठविले. पण, बिलाचा भरणा केला. दरम्यान, वीज मीटर बदलून देण्याची वारंवार मागणी केली होती. मात्र, त्याकडे दुर्लक्ष करून कंपनीने बिल पाठविणे सुरूच ठेवले. त्यानंतर मीटरची गुणवत्ता चाचणीबाबत माहिती अधिकार कायद्याअंतर्गत माहिती मागितली. पण, हा अहवाल देण्यात आला नाही, असा आरोप कोरडे यांनी केला. कंपनीने हा अन्याय दूर करावा, या मागणीसाठी शुक्रवारपासून उपोषण सुरू केले. यासंदर्भात कार्यकारी अभियंता अविनाश कुºहेकर यांना विचारणा केली असता ते म्हणाले, वीजवितरण कंपनीने वीजमीटर टेस्टींग तसेच ऐक्यूचेकद्वारा तपासणी केली. शिवाय वीजनियामक आयोगाकडूनही प्राप्त झालेला वीजमीटर बरोबर म्हणजे तांत्रिकदृष्ट्या योग्य असल्याचा दाखलाही त्यांना देण्यात आला. थकीत वीज बिलापोटी महावितरण कंपनीद्वारा वीजपुरवठा खंडित केल्यावरही कोरडे यांनी स्वत:च वीज यंत्रणेशी छेडछाड करीत परस्पर वीजजोडणी केली. त्यामुळे त्यांच्याविरूद्ध वीजकायदा कलम१३८ अंतर्गत त्यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. १०० ते १५० असा सरासारी वापर तसेच उन्हाळयात २००ते ३०० युनिटदरम्यान वीजवापर असून महावितरणने कोरडे यांना विनंती करूनही थकीत वीजबिलाचे १६ हजार ५४० रूपये एप्रिल २०१७ ते मे २०१८ असे एकून १४ महिन्यांचे वीजबिल न भरता महावितरणवरच ५३ हजार २६० रुपये असल्याचे पत्र महावितरणला दिले आहे. कोरडे यांनी २९ फे ब्रुवारी २०१६ ला मीटर बदलविणे व तपासणीकरीता अर्ज केला. त्यानुसार त्यांच्या समक्ष तपासणी करून मीटर योग्य असल्याचा अहवाल दिला. कंपनीच्या प्रचलित नियमानुसार मीटर तपासणी लॅबमध्ये पाठविण्याकरिता वाणिज्य परिपत्रकाची सत्यप्रतही पाठविली. एमईआरसीच्या मंजुरीप्रमाणे वाणिज्य परिपत्रकाअन्वये कोरडे यांच्या बिलात कोणतीही चूक नसल्याचे कळविले होते. परंतु, तीन महिन्यांचे १ हजार ९१० रूपयांचे संग्रहित परंतु संयुक्तिक वीज बिल भरून त्यानंतरचे संयुक्तिक वीज बिल भरणे बंद केले. उपोषण करून कंपनीला वठीस धरत असल्याची माहिती वीज वितरण कंपनीने दिली.वीज कंपनीला वेठीस धरण्याचा प्रकार - कुऱ्हेकररामनगर वीज वितरण केंद्रातील सहायक अभियंत्यांनी विद्युत कायद्यानुसार १५ दिवसांची विद्युत पुरवठा खंडित करण्याची नोटीस दिली. पण, ग्राहकाचे पूर्ण समाधान व्हावे, या हेतूने पुरवठा खंडित करण्याआधी ग्राहकासमक्ष मीटर तपासणी केली. त्यात मीटर योग्य असल्याचे निष्कर्ष येवूनही कोरडे यांनी बिल भरण्यास नकार दिला. त्यामुळे २९ सप्टेंबर २०१७ ला ग्राहकासमक्ष पुरवठा खंडितकरण्यात आला. बिल भरल्यानंतरच पुरवठा सुरळीत करण्याचे वीज वितरण कंपनीने कळविले होते. एवढेच नव्हे तर महावितरणने कोरडे यांनी स्वत: व जाणकार प्रतिनिधींसमक्ष मिटरची पुन्हा तपासणी केली जाईल व त्यासाठी एक दिवस अगोदर भेटून कळवावे, असे पत्र देण्यात आले होते. पण या पत्राची दखल घेतली नाही. विभागीय व उपविभागीय कार्यालयात हजर झाले नाही. दरम्यान, ४ जून २०१८ ला कोरडे यांच्या वीज पुरवठ्याची पथकाने पाहणी केली असता त्यांनी अवैधरित्या वीज जोडणी करून स्वत:चा पुरवठा सुरू केल्याचे तपासणीत आढळले. त्यामुळे ५ जून २०१८ ला कायमस्वरूपी ख्ांडित करून ९ जून २०१८ ला वीजकायदा २००३ च्या कलम १३८ नुसार शहर ठाण्यात कोरडे यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला, अशी माहिती कार्यकारी अभियंता अभियंता कुऱ्हेकर यांनी दिली.