लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यात डेंग्यू, मलेरिया, टायफाईड, स्क्रब टायफस, स्वाईन फ्ल्यू यारख्या साथीच्या रोगांचे थैमान सुरू आहे. चंद्रपूर जिल्हा सामान्य रूग्णालय, जिल्हयातील ग्रामीण रूग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्रे याठिकाणी मोठ्या प्रमाणावर साथीच्या रोगांचे रूग्ण आढळून आले आहेत. या विषयासंदर्भात गंभीरपणे लक्ष देत जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीने आढावा बैठक घेऊन साथीचे रोग आटोक्यात आणण्याच्या दृष्टीने उपाययोजना करण्याचे निर्देश राज्याचे अर्थमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिले आहे.गेल्या काही दिवसांपासून चंद्रपूर शहर तसेच जिल्हयातील सर्वच भागांमध्ये साथीच्या रोगांची लागण झाल्यामुळे रूग्णसंख्या वाढत असल्याचे निदर्शनास आले आहे. या पार्श्वभूमीवर पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी जिल्हाधिकाºयांना आढावा बैठक घेऊन उपाययोजना करण्याचे निर्देश दिले आहेत. प्रामुख्याने दूषित पाण्यामुळे साथीचे रोग उद्भवले असल्याने त्या दृष्टीने उपाययोजनांची दिशा निश्चित करण्याची आवश्यकता असल्याचे ना. मुनगंटीवार यांनी सांगितले आहे.जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधी, आरोग्य विभागाचे सर्व संबंधित अधिकारी यांच्या उपस्थितीत सदर बैठक घेण्याचे निर्देश पालकमंत्री यांनी दिले आहेत. रूग्णालये आणि प्राथमिक आरोग्य केंद्रे याठिकाणी वैद्यकीय अधिकाºयांची नियमित उपस्थिती हा अतिशय महत्त्वाचा विषय असून रूग्णांची हेळसांड व हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही, असेही ना. मुनगंटीवार यांनी बजावले आहे. त्यामुळे या साथीच्या आजारांकडे गंभीरपणे लक्ष देण्यात यावे. त्याचप्रमाणे जिल्हा सामान्य रूग्णालय, ग्रामीण रूग्णालये, उपजिल्हा रूग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्रे याठिकाणी औषधांचा तुटवडा जाणवत असल्याच्या रूग्णांच्या तक्रारी असून रूग्णांना औषधांची कमतरता भासू नये, याकडेही प्रामुख्याने लक्ष देण्याचे निर्देश ना. मुनगंटीवार यांनी दिले आहे.
साथीचे आजार वाढले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2018 10:24 PM
चंद्रपूर जिल्ह्यात डेंग्यू, मलेरिया, टायफाईड, स्क्रब टायफस, स्वाईन फ्ल्यू यारख्या साथीच्या रोगांचे थैमान सुरू आहे. चंद्रपूर जिल्हा सामान्य रूग्णालय, जिल्हयातील ग्रामीण रूग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्रे याठिकाणी मोठ्या प्रमाणावर साथीच्या रोगांचे रूग्ण आढळून आले आहेत.
ठळक मुद्देपालकमंत्री गंभीर : तातडीने आढावा बैठक घेण्याचे निर्देश