मागील कित्येक दिवसापासून नळातून गढूळ व दूषित पाणी येत आहे. गढूळ पाणीपुरवठा ग्रामपंचायत मार्फत होत असून सुद्धा याकडे सरपंच व ग्रामसेवक यांचे दुर्लक्ष होत आहे. यावर अजूनपर्यंत कोणत्याही उपाययोजना केल्या नाही, असा आरोप ग्रामपंचायत सदस्य बंडू निखाते यांनी केला आहे. शुद्ध पाणी येत नसल्याने साथीचे रोग पसरु शकते. डेंग्यू, हिवताप असे विविध रोग होऊ शकतात. रस्ते साफ सफाई, बुजालेल्या नाल्या दुरूस्ती कराव्या, जेणेकरून पाणी साचून राहणार नाही. गावात जंतुनाशक फवारणी करावी. जेणेकरून साथीचे रोग होणार नाही. तसेच गावातील सार्वजनिक ठिकाणी होत असलेले अवैध धंदे बंद करण्यात यावे. सर्वप्रथम ग्रामपंचायतीने नागरिकांना शुद्ध पाणीपुरवठा करावा, अशी मागणी चंदनखेडा येथील नागरिक करीत आहे.
दूषित पाण्यामुळे आरोग्य धोक्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2021 4:19 AM