शहरं
Join us  
Trending Stories
1
नालासोपाऱ्यात कॅश ड्रामा! पैसे वाटपाच्या आरोपांवरून विनोद तावडेंना घेरले; तीन गुन्हे दाखल
2
Maharashtra Assembly elections 2024: कोणत्या मुद्द्यांभोवती फिरली प्रचारचक्रे ? 
3
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतदान; काँग्रेस-भाजपमध्ये लढत 
4
झारखंड : दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला; अंतिम टप्प्याचे आज ३८ जागांवर मतदान
5
ज्यांच्या बळावर मतदान, त्यांचाच हिरावला अधिकार; दोन हजार पोलिसांचे बॅलेटच आले नाहीत
6
विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज; किती वाजता सुरू होणार मतदान? ‘या’ गोष्टी लक्षात ठेवाच
7
हल्ले, मारहाणीच्या घटनांनी राजकीय वातावरण तापले; प्रचारादरम्यान काय-काय घडलं?
8
३५ हजार पोलिसांचा फौजफाटा मुंबईत सज्ज; चार हजार जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई
9
मुंबईकरांना पहाटेच भाजीपाला पोहोचणार; धान्य, मसाला, फळ मार्केट राहणार बंद
10
वरळीतील १,३३९ मतदारांच्या सोयीसाठी; चक्क उड्डाणपुलाखाली दोन मतदान केंद्रे
11
मतदान शांततेत पार पाडा, जबाबदारी निभावा; पोलिस महासंचालक संजय वर्मा यांचे आवाहन
12
सुप्रिया सुळे, नाना पटोलेंनी बिटकॉइन स्कॅम केला, निवडणुकीत परदेशी चलनाचा वापर; भाजपाचा आरोप
13
डहाणूचा बविआ उमेदवार भाजपात आला, त्याचाच राग ठाकूर पिता-पुत्रांनी काढला? चर्चांना उधाण
14
रोहित पवारांच्या कारखान्यातील अधिकाऱ्याला पैसे वाटताना पकडले; पोलिसात गुन्हा दाखल
15
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
16
भाई ठाकूर यांचे भाऊ ते बविआ प्रमुख; विरारमधील 'राडा' प्रकरणाने चर्चेत आलेले हितेंद्र ठाकूर कोण?
17
“निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यास त्याचे खापर विनोद तावडेंवर फोडले जाईल”: पृथ्वीराज चव्हाण
18
मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याने कारस्थान रचलं? विनोद तावडे म्हणाले, "मी तिकडे जाणार हे..."
19
Vinod Tawde: त्या हॉटेलात महिला, कोपऱ्या कोपऱ्यात लपलेल्या; क्षितीज ठाकुरांचे खळबळजनक आरोप
20
Maharashtra Assembly Election 2024 : लोकसभेवेळी धक्का देणारा मराठवाडा भाजपाला देणार साथ? हे मुद्दे ठरू शकतात 'मास्टर स्ट्रोक'

कंत्राटी कर्मचाऱ्यांचा एल्गार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2018 11:35 PM

शासनाने विविध विभागात स्थायी कर्मचाऱ्यांची नियुक्ती न करता कंत्राटी कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. आज ना उद्या आपण सेवेत निममित होवू, या आशेने राज्यभरात शेकडो कंत्राटी कर्मचारी विविध शासकीय विभागात कार्यरत आहेत.

ठळक मुद्दे९ फेब्रुवारीचे ‘ते’ परिपत्रक रद्द करा : जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला मोर्चा

आॅनलाईन लोकमतचंद्रपूर : शासनाने विविध विभागात स्थायी कर्मचाऱ्यांची नियुक्ती न करता कंत्राटी कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. आज ना उद्या आपण सेवेत निममित होवू, या आशेने राज्यभरात शेकडो कंत्राटी कर्मचारी विविध शासकीय विभागात कार्यरत आहेत. मात्र राज्य शासनाने ९ फेब्रुवारीला परिपत्रक काढून कंत्राटी पदावरील नेमणूका शासन सेवेत नियमित न करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाविरूद्ध एल्गार पुकारत जिल्ह्यातील २७०० कंत्राटी कर्मचाऱ्यांनी मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक देत रोष व्यक्त केला.चंद्रपूर जिल्हास्तरीय शासकीय कंत्राटी कर्मचारी समन्वय समितीच्या वतीने मोर्चाचे आयोजन केले होते. जिल्हा परिषदेसमोरून मोर्चाची सुरूवात झाली. मोर्चाचे नेतृत्व समितीचे संयोजक अ‍ॅड. शैलेश मुंजे, राकेश नाकाडे, बंडू हिरवे, विजय ढोले, गोविंद कुंभारे, पंकज शेंडे, सतीश वाढई, सारिका बद्देला यांनी केले. हा मोर्चा कस्तुरबा रोड मार्गे गांधी चौक, जटपुरा गेटवरून शासनाविरूद्ध घोषणा देत जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. येथे सभा झाली. यावेळी अनेकांनी मार्गदर्शन करून युती सरकारचा निषेध केला.गेल्या १५ ते २० वर्षांपासून नियमित कर्मचाऱ्यांप्रमाणे सेवा देत असून शासनाने दिलेली कामे वेळेवर पूर्ण केले जात आहे. केव्हा तरी शासन आम्हाला सेवेत नियमित करेल, या आशेवर कर्मचारी असताना युती शासनाने अटी शर्तीबाबत सेवेत कंत्राटी नियुक्त कर्मचाऱ्याला सेवेत कायम न करण्याचा परिपत्रक काढला आहे. त्यामुळे अनेक कर्मचाऱ्यांच्या कुटुंबावर उपासमारीची पाळी येणार आहे. शासनाने जाचक परिपत्रक रद्द करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.एका शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेवून मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना पाठविले आहे. या मोर्चात जिल्हाभरातील महिला व पुरूष अशा २ हजार ७०० कंत्राटी कर्मचाऱ्यांचा सहभाग होता.अशा आहेत मागण्याकंत्राटी कर्मचाऱ्यांना सेवेत नियमित करावे, तीन वर्षांनंतर पुनर्निवडीची अट रद्द करावी, नियमित कर्मचाऱ्यांप्रमाणे ३० दिवसांची वैद्यकीय रजा व वैद्यकीय देयकाची प्रतीपुर्ती द्यावी, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार समान काम-समान वेतन लागू करावे, भविष्य निर्वाह निधी लागू करावी.