शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदी काेण? दिल्ली दरबारी अडीच तास खलबते; २ डिसेंबरला शपथविधी!
2
Today Daily Horoscope: जाणून घ्या, कसा असेल आजचा दिवस, काय सांगते तुमची राशी?
3
उत्तरेतील वारे, महाराष्ट्र गारठला; अनेक शहरांचा पारा आला १५ अंश सेल्सिअसखाली 
4
पदवी अभ्यासक्रम अवधी कमी-जास्त करता येणार; विद्यार्थ्यांसाठी UGC ची नवीन योजना काय?
5
भाजपच्या अभूतपूर्व यशाचे ‘रहस्य’ काय?; 'सागर' बंगल्यावर पडद्यामागे घडलेल्या गोष्टी
6
कुजबुज! निकाल लागले, आचारसंहिता संपली तरीही विजयी मिरवणूक नाही, कारण... 
7
नव्या ‘एलएनजी’ बस मुंबईत धावणार की नाशिकमध्ये?; प्रतिगाडी ५.१५ लाखांचा खर्च अपेक्षित
8
कोस्टल रोडचा खर्च १३०० कोटींनी वाढला; एकूण खर्च गेला १४ हजार काेटींवर
9
समुद्रतळातून काढला तब्बल ३०० किलो प्लास्टिक कचरा; भारतातील पहिलाच प्रयोग मालवणमध्ये यशस्वी
10
जमीन व्यवहारातील फसवणूक आता टळणार; राज्यात 'ॲग्रिस्टॅक' योजना राबवणार
11
‘जात’ जाते कधी, येते कधी?; सर्वोच्च न्यायालयाचा निकाल नवे आकलन देणारा ठरलाय
12
सोशल मीडियाच्या राक्षसाने मुलांना गिळू नये, म्हणून...
13
“भाजपा नेहमीच नवीन नेतृत्वाचा शोध घेत असते, राजस्थान-मध्य प्रदेशप्रमाणे...”: चंद्रकांत पाटील
14
"शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही", उदय सामंतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण 
15
IND vs PAK: भारताचा १३ वर्षीय वैभव सूर्यवंशी आता पाकिस्तानला चोपणार, सामना कधी?
16
पत्रकारानं थेट प्रश्न विचारला, अजित दादांनी मिश्किल उत्तर दिलं; म्हणाले, "मी काही ज्योतिष नाही..."! नेमकं काय घढलं?
17
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
18
बांगलादेशात 'इस्कॉन'च्या चिन्मय कृष्ण दास यांना अटक, शेख हसिना यूनुस सरकाविरोधात आक्रमक
19
भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...
20
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान

१२ दिवसांपासून कंत्राटी कामगारांचे आंदोलन सुरुच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 03, 2018 11:11 PM

येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील शेकडो कंत्राटी कामगार व कर्मचाऱ्यांचे मागील चार महिन्यांपासून वेतन थकित आहे. त्यामुळे थकित वेतनाच्या मागणीसाठी प्रहार संघटनेच्या नेतृत्वात कंत्राटी कामगारांचे कामबंद आंदोलन मागील १२ दिवसांपासून सुरु आहे.

ठळक मुद्देचार महिन्याचे वेतन थकीत : जिल्हा सामान्य रुग्णालयातील कर्मचारी

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील शेकडो कंत्राटी कामगार व कर्मचाऱ्यांचे मागील चार महिन्यांपासून वेतन थकित आहे. त्यामुळे थकित वेतनाच्या मागणीसाठी प्रहार संघटनेच्या नेतृत्वात कंत्राटी कामगारांचे कामबंद आंदोलन मागील १२ दिवसांपासून सुरु आहे.शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात जवळपास साडेचारशे कंत्राटी कामगार कार्यरत आहेत. मात्र या कामगारांचे मागील चार महिन्यांपासूनचे वेतन थकित आहे. त्यामुळे कामगारांना विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे थकित वेतनाच्या मागणीसाठी प्रहार संघटनेचे नगरसेवक पप्पू देशमुख यांनी सातत्याने पाठपुरावा केला. याबाबत त्यांनी मागील महिन्यात पत्र देऊन थकित वेतन तातडीने देण्याची मागणी केली होती. त्यानंतर कामगारातर्फे विनावेतन एक तास अधिक काम करून ‘काम दान’ आंदोलन केले. त्यामुळे थकित वेतनासाठी कंत्राटी कामगारांना २३ आॅगस्टपासून आंदोलन सुरु केले. मात्र त्यांची दखल घेण्यात आली नाही. त्यामुळे प्रहार संघटनेच्या वतीने गांधी चौकातून कंत्राटी कामगारांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर झाडू मोर्चा काढला. यांची दखल घेत कंत्राटदाराकडे ८० लाख रुपये वळते करण्यात आले. मात्र अद्यापही वेतन देण्यात आले नाही. शासनाच्या नियमानुसार प्रत्येक महिन्यांच्या सात तारखेला वेतन देण्याचा नियम आहे. मात्र शासकीय कर्मचारी वगळता कंत्राटी कामगारांचे वेतन प्रलंबित ठेवण्यात येते. त्यामुळे त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो.